AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वेळ आलेली, नवऱ्यासोबत गच्चीवर बोलता, बोलता कधी आयुष्य संपलं तिलाच नाही कळलं

मनाला चटका लावणारी घटना, जे घडलं ते खूपच धक्कादायक. अबीरामी आणि प्रवीण फेरफटका मारण्यासाठी म्हणून गच्चीवर गेले होते. गच्चीच्या कठड्यावर बसून दोघांना गप्पा मारताना नातेवाईकांनी पाहिलं होतं.

वेळ आलेली, नवऱ्यासोबत गच्चीवर बोलता, बोलता कधी आयुष्य संपलं तिलाच नाही कळलं
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Mar 23, 2023 | 11:20 PM
Share

चेन्नई : आयुष्याच काही खरं नसतं. वेळ आली असेल, तर कधी काय घडेल ते सांगता येत नाही. ध्यानी, मनी नसताना एखादी व्यक्ती अचानक जगाचा निरोप घेते. आजारपण, अपघातच नाही, तर एखाद्या चांगल्या प्रसंगातही मनाला चटका लावणारी घटना घडते. आपल्या हाती फक्त, हे असं कसं झालं? एवढच म्हणण उरतं. अशीच एक धक्कादायक घटना सोमवारी रात्री चेन्नईच्या तिरुमुल्लैवोयलमध्ये घडली.

एका 25 वर्षीय महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला. ती घराच्या गच्चीवर बसली होती. त्यावेळी काळाने तिला गाठलं.

घातपाताची शक्यता ?

अबीरामी असं मृत महिलेच नाव आहे. ती घरच्या गच्चीच्या कठड्यावर बसून नवऱ्यासोबत गप्पा मारत होती. त्यावेळी अबीरामीचा मृत्यू झाला. अबीरामीचा तोल जाऊन ती खाली पडली. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी घातपाताची शक्यता फेटाळून लावली आहे.

हातात मोबाइल फोन होता

ही दुर्देवी घटना घडली, तेव्हा अबीरामीपासून तिचा नवरा लांब बसला होता. त्यामुळे तिला वाचवता येणं शक्य नव्हतं. अबीरामी खाली पडली, त्यावेळी तिच्या हातात मोबाइल फोन होता. दुसऱ्या मजल्यावर टेरेस आहे. त्याची भिंत मोठी नव्हती. त्यामुळे तिला बॅलन्स करता आला नाही. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

दोघांना गप्पा मारताना नातेवाईकांनी पाहिलेलं

अबीरामी आणि प्रवीण कुमार यांच्या लग्नाला फक्त अडीच वर्ष झाली होती. अबीरामाच्या भावाचा बर्थ डे होता. त्यामुळे सगळे कुटुंबीय एकत्र जमले होते. रात्रीच्या जेवणानंतर अबीरामी आणि प्रवीण फेरफटका मारण्यासाठी म्हणून गच्चीवर गेले होते. गच्चीच्या कठड्यावर बसून दोघांना गप्पा मारताना नातेवाईकांनी पाहिलं होतं.

एका शेडवर आदळली

अबीरामी गच्चीवरुन खाली पडल्यानंतर प्रवीणने लगेच घरात असलेल्या नातेवाईकांना याची कल्पना दिली. ते सर्व अबीरामीच्या मदतीसाठी धावले. अबीरामी वरुन खाली पडताना एका शेडवर आदळली. त्यानंतर डोक्यावर पडली. मृत्यूच कारण काय?

तिला आधी जवळच्या खासगी रुग्णालयात नेलं. त्यानंतर तिला राजीव गांधी सरकारी रुग्णालयात हलवलं. तिथे तिला मृत घोषित करण्यात आलं. तिच्या डोक्याला भरपूर मार लागला. बराच रक्तस्त्राव झालेला, असं पोलिसांनी सांगितलं.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.