धक्कादायक : परभणीत रेल्वे विभागानं Child Labor लावले? 39 अंश तापमानात रुळांवर गिट्टी उचलतायत पोरं!

बाल कामगार कायद्याचा भंग करणाऱ्यांना 3 महिन्यांपासून ते 1 वर्षापर्यंत तुरुंगवास व त्यासोबत 10 हजार ते 20,000 रुपये दंड होऊ शकतो.

धक्कादायक : परभणीत रेल्वे विभागानं Child Labor लावले? 39 अंश तापमानात रुळांवर गिट्टी उचलतायत पोरं!
मानवत रोड स्टेशन परिसरातील दृश्यImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 17, 2022 | 12:53 PM

परभणीः परभणी जिल्ह्यातील मानवत रोड रेल्वे स्टेशनमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे भर उन्हात लहान मुलांना कामगारांप्रमाणे (Child Labor case) कामाला लावल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. 14 वर्षे वयाखालील मुलांना शिक्षणाचा हक्क (Right to education) असून त्यांना कामावर ठेवणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. तरीही कायद्याचा भंग लहान मुलांना रेल्वे स्टेशन परिसरात भर उन्हात कामाला लावल्याचं उघडकीस आलं आहे. परभणी जिल्ह्यातील मानवत रोड (Manwat Road station) येथील रेल्वेस्थानकात नांदेड-मनमाड या मार्गावर जुनी पटरी बदलण्याचे काम करण्यात येत आहे. या कामावर लहान मुलेही गिट्टी उचलण्याचे, रुळांना ऑइल लावण्याचे काम करत असल्याचे आढळले आहे. हा प्रकार पाहून नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

काय घडला नेमका प्रकार?

परभणी जिल्ह्यातील मानवतरोड येथील रेल्वे स्थानकात नांदेड-मनमाड या मार्गावर जुनी पटरी बदलण्याचे काम करण्यात येत आहे. या कामासाठी कंत्राटदाराने मध्यपर्देश येथील कामगार आणले आहेत. हे कामगार रेल्वे उड्डाणपुलाखाली कोप्या करून राहत आहेत. शोकांतिका म्हणजे संबंधित कंत्राटदार 10 ते 15 वर्ष वयोगटातील मुलांकडून भर उन्हात काम करुन घेत आहे. ही अल्पवयीन मुले-मुली 39 अंश सेल्सियस तापमानात पटरीवरील गिट्टी उचलणे, रुळांना ऑइल लावणे अशी कामे करत असून रेल्वे प्रसासनाचे या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. रेल्वे विभागाकडून बालकांच्या होणाऱ्या शोषणावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

काय आहे कायदा?

बाल कामगार बंदी नियमन कायदा 1986 नुसार, 14 वर्षाखालील मुलांचे जीवन आणि आरोग्यास घातक असलेल्या व्यवसायांमध्ये नोकरी देणे बेकायदेशीर आहे. अशा 65 व्यवसायांची यादी करण्यात आली आहे. ज्या आस्थापनांमध्ये मुलांना कामावर ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. अशा सर्व कारखान्यांवर हा अधिनियम नियंत्रण ठेवतो. कायद्याचा भंग करणाऱ्यांना 3 महिन्यांपासून ते 1 वर्षापर्यंत तुरुंगवास व त्यासोबत 10 हजार ते 20,000 रुपये दंड होऊ शकतो.

इतर बातम्या-

Aurangabad Fire | पैठण रोडवरील सागर हॉटेलमध्ये सिलिंडरला आग VIDEO, सुदैवाने जीवितहानी नाही

Agricultural Pump : राज्य सरकारचा निर्णय अन् स्थानिक पातळीवर अंमलबजावणी, रब्बी पिकांना मिळणार का संजीवनी?

Non Stop LIVE Update
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.