AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Breaking… 48 तासात लहान मुले अचानक गायब, नवी मुंबई हादरली; ‘या’ परिसरातून…

नवी मुंबईतून धक्कादायक बातमी आहे. सर्वांच्या पायाखालची वाळू सरकेल अशी घटना घडली आहेत. नवी मुंबईतून अचानक काही अल्पवयीन मुले गायब झाली आहेत. ही सर्व मुले लहान आहेत. त्यांचं अपहरण झालं असावं असा संशय मुलांच्या पालकांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रारही देण्यात आली आहे. अचानक मुलं गायब झाल्याने नवी मुंबईत खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

Breaking... 48 तासात लहान मुले अचानक गायब, नवी मुंबई हादरली; 'या' परिसरातून...
navi mumbai policeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 06, 2023 | 10:39 AM
Share

रवी खरात, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नवी मुंबई | 6 डिसेंबर 2023 : नवी मुंबईच नव्हे तर मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी आहे. नवी मुंबईतून अचानक लहान मुले बेपत्ता होत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही मुलगी अगदी कोवळ्या वयाची आहेत. मुलं गायब होत असल्याने पालकही हादरून गेले आहेत. मुलांचं अपहरण होत असल्याची या पालकांची तक्रार आहे. तर अचानक होत असलेल्या या प्रकारामुळे पोलीसही हादरून गेले आहेत.

नवी मुंबई शहरातून मागील 48 तासात सहा अल्पवयीन मुले बेपत्ता झाली आहेत. मुले अचानक बेपत्ता होत असल्यामुळे पालक चिंतीत झाले आहेत. गायब झालेली ही सहाही मुले 12 ते 15 वयोगटाची आहेत. बेपत्ता मुलांचे अपहरण झाल्याची या पालकांची तक्रार आहे. या पालकांनी पोलीस ठाण्यात तशी तक्रारही दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे नवी मुंबईतील पनवेल, कामोठे, कोपर खैरणे, रबाळे, कळंबोली आदी परिसरातील ही मुले असून याच परिसरातून ही मुले गायब झाली आहेत.

भीतीचे वातावरण

ही सर्व मुले 3 आणि 4 डिसेंबर रोजी गायब झाले आहेत. या सहा मुलांपैकी एक मुलगा कौपरखैरणेमधून गायब झाला होता. दुसरा 12 वर्षाचा एक मुलगाही असाच बेपत्ता झाला होता. नंतर तो ठाणे रेल्वे स्टेशनवर सापडला. गायब झालेल्या मुलांपैकी काही मुलं शाळेत गेल्यावर गायब झाली. कुणी मित्राच्या घरी कार्यक्रमाला तर कुणी वाढदिवसाला गेलेले असताना गायब झाले आहेत. रबाळेतील एक मुलगा तर सार्वजनिक शौचालयात गेला होता. तिथून तो गायब झाला आहे. मुलं अशी अचानक गायब झाल्याने पालक चांगलेच हादरले आहेत. मुलांचं अपहरण करून त्यांचं काही बरंवाईट तर झालं नाही ना? अशी शंका पालक व्यक्त करत आहेत. मात्र मुलं अशी अचानक बेपत्ता होत असल्याने नवी मुंबईत भीतीचे वातावरण पसरले आहे.

अधिवेशनात मुद्दा गाजणार?

दरम्यान, उद्यापासून राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात मुलं गायब होण्याचा मुद्दा गाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नवी मुंबईच नव्हे तर या आधी कल्याण आणि टिटवाळ्यातूनही मुलं गायब झाली होती. त्यांचं अपहरण केल्याचं समोर आलं होतं.

अपहरण केलेल्या मुलीचा मृत्यू

दरम्यान, कल्याणमध्ये तीन महिन्यापूर्वी एक अल्पवयीन मुलगी गायब झाली होती. नोव्हेंबरमध्ये त्या मुलीचा मृतदेह आढळून आला. या मुलीचा मृत्यू संशयास्पद असल्याचं सांगितलं जात होतं. या मुलीने घरातच जीवन संपवल्याचं आढळून आलं होतं. या प्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

टिटवाळ्यात अपहरण

टिटवाळ्यातील बनेली गावातूनही 25 ऑगस्ट रोजी तीन मुलांचं अपहरण झाल्याची चर्चा होती. ही तिन्ही मुले खेळण्यासाठी घराच्या बाहेर पडली होती. त्यावेळी त्यांचं अपहरण झालं असावं असं त्यांच्या कुटुंबीयांचं म्हणणं होतं. याप्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रारही दाखल केली होती. या प्रकारामुळे टिटवाळ्यातही भीतीचं वातावरण होतं.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...