Maharashtra Breaking News Live :  जवाहरलाल नेहरूं यांच्यामुळेच पाकव्याप्त काश्मीर तयार, अमित शाह यांचा आरोप

| Updated on: Dec 06, 2023 | 9:11 PM

Maharashtra Breaking News Live Updates : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील.... राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी.... तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील आज घडणाऱ्या घडामोडी, महत्वाच्या बातम्या... वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News Live :  जवाहरलाल नेहरूं यांच्यामुळेच पाकव्याप्त काश्मीर तयार, अमित शाह यांचा आरोप

मुंबई | 06 डिसेंबर 2023 : आज 6 डिसेंबर… भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 67 वा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी त्यांचे अनुयायी चैत्याभूमीवर येत आहेत. तर मराठा आरक्षणासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. आज सुप्रीम कोर्टात महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे.  मराठा आरक्षण प्रश्नी क्युरिटिव्ह सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. महाराष्ट्र सरकार नागपुरात मुक्कामी आहे… संत्रानगरीत उद्यापासून विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. ओबीसी, मराठा आरक्षण, अवकाळीची मदत, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी या मुद्द्यांवरून या अधिवेशनात खडाजंगी होण्याची शक्यता आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 06 Dec 2023 08:37 PM (IST)

    गडचिरोली पोलिसांना मोठं यश! 2 लाखांचं बक्षीस असलेल्या माओवाद्याला अटक

    गडचिरोली | गडचिरोली पोलीस दलाने एका जहाल माओवाद्यास अटक केली आहे. या माओवाद्यावर महाराष्ट्र शासनाने 2 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. माओवादी 02 ते 08 डिसेंबर रोजी दरम्यान हे पीएलजीए सप्ताह साजरा करतात. या दरम्यान सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, पोलीस दलावर हल्ले करुन त्यांच्या जवळील शस्त्रे लुटून नेणे, रस्ते आणि इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळा आणून जाळपोळ करणे देशविघातक कृत्य करत असतात. आज या जहाल माओवादी नामे महेंन्द्र किष्टय्या वेलादी दामरंचा जवळ असलेल्या इंद्रावती नदीजवळ पोलीस पार्टीनी अटक केली. जाळपोळ, दोन चकमक, दोन खून असे सहा गुन्हे नक्षलवाद्यावर दाखल आहेत.

  • 06 Dec 2023 08:22 PM (IST)

    ललित पाटील प्रकरणात महिला अधिकाऱ्यासह एक पोलीस कर्मचारी बडतर्फ

    पुणे :  ललित पाटील प्रकरणात महिला अधिकाऱ्यासह एका पोलीस कर्मचाऱ्याला पोलीस आयुक्तांनी बडतर्फ केलं आहे. पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून दोन पोलीस कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलंय. ललित पाटील प्रकरणी आत्तापर्यंत 4 पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आलाय. मोहिनी डोंगरे आणि जनार्दन काळे असं बडतर्स करण्यात आलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. ललित पाटील प्रकरणात अनेक पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आलाय.

  • 06 Dec 2023 06:51 PM (IST)

    मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देणार  - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मराठा समाजाला टिकेल असं आरक्षण देण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे.  - एकनाथ शिंदे

  • 06 Dec 2023 06:44 PM (IST)

    शेतकऱ्यांना वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही - एकनाथ शिंदे

    आमच्या सरकारने सर्व नियम बाजुला करुन मदत केली. शेतकऱ्यांबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही. जे घराच्या बाहेर पडले नाही. ते बांधावर जाण्याच्या बाता करत आहेत. - एकनाथ शिंदे

  • 06 Dec 2023 06:39 PM (IST)

    विदर्भाच्या प्रश्नांना प्राधान्य दिले पाहिजे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    नागपूरचे हे अधिवेशन आमच्या सरकारचे दुसरे अधिवेशन आहे. विदर्भाच्या प्रश्नांना प्राधान्य दिले पाहिजे. विदर्भाच्या विकासासाठी सर्व काही केले जाईल - एकनाथ शिंदे

  • 06 Dec 2023 06:28 PM (IST)

    पुढच्या वेळेस चहापान ऐवजी पानसुपारीचा कार्यक्रम ठेवावे लागेल - अजित पवार

    विरोधीपक्षाने दिलेले पत्र वाचले. चहापान चर्चेसाठी निमित्त असतं. पंरतू विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. पुढच्या वेळेस पानसुपारीचा कार्यक्रम ठेवावे लागेल - अजित पवार

  • 06 Dec 2023 06:25 PM (IST)

    सर्वप्रकारच्या चर्चेसाठी आम्ही तयार - फडणवीस

    सर्वप्रकारच्या चर्चेसाठी आम्ही तयार आहोत. सर्व प्रश्नावर चर्चा झाली पाहिजे. जी मागणी होईल त्यावर चर्चा करायला तयार आहोत. शेतकऱ्यांचं भलं झाले पाहिजे अशा अर्थाने सकारात्मक चर्चा झाली पाहिजे. जनतेला काय हवंय हे विरोधकांना कळलं पाहिजे. - फडणवीस

  • 06 Dec 2023 06:22 PM (IST)

    क्राईम बाबत महाराष्ट्र आठव्या क्रमांकावर - फडणवीस

    लोकसंख्येच्या तुलनेने क्राईम बाबत महाराष्ट्र आठव्या क्रमांकावर आहे. खुनामध्ये १७ व्या स्थानावर आहे. बलात्काराच्या घटनेत महाराष्ट्र १२ व्या स्थानावर आहे. विरोधकांना माहिती हवी म्हणून हे सांगतोय - देवेंद्र फडणवीस

  • 06 Dec 2023 06:20 PM (IST)

    राज्याची अर्थव्यवस्था अडीच पटीने वाढली - फडणवीस

    आपली अर्थव्यवस्था १६ लाख कोटीही होती ती आता ३५ लाख कोटींची झाली आहे. आजही देशाच्या सगळ्या राज्यांच्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत आपण श्रीमंत आहोत. - देवेंद्र फडणवीस

  • 06 Dec 2023 06:18 PM (IST)

    राज्यात काय चाललंय याचा भान विरोधकांना नाही - देवेंद्र फडणवीस

    विरोधीपक्षाने न येण्याची जी कारणे दिली आहे. त्यांच्या पत्रकार परिषदेत काही लोकं झोपी गेले होते. त्यांनी दिलेले पत्र ही तशाच झोपेत लिहिले आहे. विरोधी पक्षाला विदर्भ मराठवाड्याचा विसर पडला आहे. अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

  • 06 Dec 2023 05:55 PM (IST)

    विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या भाजप खासदारांचा राजीनामा

    विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या भाजप खासदारांनी संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद पटेल, राजवर्धन सिंह राठौर, दिया कुमारी, रीती पाठक, अरुण साओ, राकेश सिंह, उदय प्रताप सिंह यांनी लोकसभेचा राजीनामा दिला तर किरोरी लाल मीणा यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला.

  • 06 Dec 2023 05:40 PM (IST)

    सुखदेव सिंह गोगामेडी हत्या प्रकरणाचा तपास NIA कडे सोपवला जाणार!

    सुखदेव सिंग गोगामेडी हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला जाऊ शकतो. एनआयएचे चार सदस्यांचे पथक जयपूरला जाऊ शकते.

  • 06 Dec 2023 05:25 PM (IST)

    खोऱ्यात दहशतवादी घटना कमी झाल्या, पण चिनाब-जम्मूमध्ये दहशतवाद वाढला: अधीर रंजन

    जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका का होत नाहीत, असा सवाल काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभेत केला. खोऱ्यात दहशतवादी घटना कमी झाल्या आहेत हे मला मान्य आहे. पण चिनाब आणि जम्मूमध्ये दहशतवाद वाढला आहे.

  • 06 Dec 2023 05:11 PM (IST)

    शरद पवार, उद्धव ठाकरे यांची १२ डिसेंबरला नागपुरात जाहीर सभा

    महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार, शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह हे राष्ट्रवादीच्या युवा संघर्ष यात्रेच्या समारोपासाठी 12 डिसेंबरला नागपुरात येणार आहेत. तिन्ही नेते नागपुरातील झिरो माईल परिसरात जाहीर सभेला संबोधित करतील.

  • 06 Dec 2023 04:59 PM (IST)

    लोकसभेत जम्मू-काश्मीरच्या पुनर्गठन बाबत विधेयक संमत

    नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरूं यांच्यामुळेच पाकव्याप्त काश्मीर तयार झाल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. लोकसभेमध्ये जम्मू-काश्मीरच्या पुनर्गठन बाबत विधेयक संमत करण्यात आलं. हे विधेयक अमित शाह यांनी सादर केलं. यावेळेस शाह यांनी हा आरोप केला. जेव्हा युद्धात लष्कर जिंकणार होते त्यावेळी नेहरू UN कडे गेले. लष्कर जिंकत असतानाच नेहरुंनी शस्त्रसंधी उल्लंघन केलं. काश्मीरचा मुद्दा यूएन मध्ये घेऊन गेले की नेहरूंची मोठी चूक, अंसही शाह म्हणाले.

  • 06 Dec 2023 04:42 PM (IST)

    काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्या भेटीसाठी रेवंत रेड्डी महाराष्ट्र सदनात

    नवी दिल्ली | राजधानी दिल्लीतून मोठी बातमी समोर आली आहे. तेलंगणाचे भावी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी महाराष्ट्र सदनात दाखल झाले आहेत. काँग्रेसचे प्रभारी असलेल्या माणिकराव ठाकरे यांच्या भेटीसाठी रेवंत रेड्डी ही महाराष्ट्र सदनात दाखल झाले आहेत. दरम्यना रेवंत रेड्डी हे गुरुवारी 7 डिसेंबर रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

  • 06 Dec 2023 04:32 PM (IST)

    Marathi News | गुरुवारी वाईन शॉप बंद राहणार

    हिंगोली | मनोज जरांगे पाटील यांची गुरुवारी 7 डिसेंबर रोजी हिंगोलीत सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार औंढानागथ आणि हिंगोली शहर-तालुक्यातील मद्यविक्री दुकाने बंद असणार आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

  • 06 Dec 2023 04:28 PM (IST)

    Dadar | वर्षाताई गायकवाड यांनी कोट्यवधी भीम अनुयायांच्या मनातील मागणी बोलून दाखवली

    मुंबई | महाराष्ट्र सरकारने एल्फिन्स्टन रोड स्थानकाचं नाव प्रभादेवी करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. दादर स्थानकाचं नामांतर ‘चैत्यभूमी’ असं करावं, अशी मागणी ही कोट्यवधी भीम अनुयायांची आहे. त्यामुळे दादर रेल्वे स्थानकाचं नाव हे चैत्यभूमी करण्यात यावं अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षाताई गायकवाड यांनी केली.

  • 06 Dec 2023 03:55 PM (IST)

    नागपूर विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जोरदार स्वागत

    नागपूर : नागपूर येथे हिवाळी अधिवेशनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी त्याचे नागपूरमध्ये जोरदार स्वागत केले. नागपूरमध्ये दहा दिवस अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विरोधकांच्या आरोपांना कसे उत्तर देतात याची उत्सुकता लागली आहे.

  • 06 Dec 2023 03:48 PM (IST)

    पक्ष आणि कार्यालय आमचेच आहे, त्यामुळे अर्ज करण्याचा प्रश्न नाही, जयंत पाटील

    नागपूर : अजूनही राष्ट्रवादी पक्ष कुणाचा हा निर्णय झालेला नाही. निवडणूक आयोग किंवा न्यायालयात निर्णय झालेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी हा पक्ष आमचाच आहे. म्हणून विधान भवनात दिलेले कार्यालय हे आमचेच आहे. जी केस सुरु आहे त्याचा निकाल अजून लागलेला नाही, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

  • 06 Dec 2023 03:43 PM (IST)

    सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, विरोधी पक्षांची मागणी

    नागपूर : मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारने सोडविला पाहिजे. सरकारने जी मुदत दिलेली आहे त्या मुदतीमध्ये सरकारने निर्णय घेणे आवश्यक आहे. राज्यातील उद्योग बाहेर आहेत त्याची माहिती आम्ही सरकारला विचारू, असे सांगत विरोधी पक्षाने सरकारला इशारा दिला.

  • 06 Dec 2023 03:39 PM (IST)

    सत्तेसाठी आमची वज्रमुठ नाही, आमची वज्रमुठ जनतेसाठी

    नागपूर : महाविकास आघाडी सरकारच्या काळात जी मदत आम्ही शेतकऱ्यांना जाहीर केली होती. ती मदत देण्यात आली. पण, या सरकारने जितक्या घोषणा केल्या त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्त्यात आली नाही. आमची महाविकास आघाडीची वज्रमुठ ही सत्तेसाठी नाही. तर आमची वज्रमुठ ही जनतेसाठी आहे असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

  • 06 Dec 2023 03:34 PM (IST)

    शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या सरकारसोबत चहापान का करायचा? विधान परिषदेचे विरोधी अंबादास दानवे

    नागपूर : विदर्भाच्या विकासाच्या फक्त गप्पा मारल्या जातात. संत्र उत्पादक यांना न्या मिळाला नाही. मराठ्वाड्याचीही तीच अवस्था आहे. महानंदा सारख्या दुध संस्था बंद व्हाव्या असेच सरकारला वाटत आहे. शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम मिळालेली नाही. कापूस वाया जाण्याची शक्यता आहे. कांदा पिकाची अवस्था बिकट आहे. अशात शासन आपल्या दारी कार्यक्रम घेऊन सरकार नेमकं काय करत आहे?, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी अंबादास दानवे यांनी केला.

  • 06 Dec 2023 03:28 PM (IST)

    अधिवेशन वादळी होणार? विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार, विरोधी पक्षाने केली घोषणा

    नागपूर : शंभर मोर्चे या अधिवेशनात येत आहे. मंत्रालयात रंग लागली आहे. जनतेची कामे होत नाहीत. पण, सरकार शासन आपल्या दारी कार्यक्रम घेऊन आपली पाठ थोपटून घेत आहे. आजचा चहापान पुढे जातं आले असते. पण सरकार मध्ये संवेदना नाही, त्यामुळे आम्ही चहापानावर बहिष्कार घालत अशी घोषणा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

  • 06 Dec 2023 03:24 PM (IST)

    नागपूरकर डीसीएम हतबल झाले : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका

    नागपूर : आरक्षणातील गुंता वाढविण्याचे काम सरकारने केले आहे. नागपूरकर डीसीएम हतबल झाले. आधी एकनाथ शिंदे यांना सांभाळण्याचे काम दिले. नंतर बारामतीकराना सांभाळण्याचे काम दिले. त्यामुळे ते हतबल झाले आहे. चोर चोर मिळून खाऊ अशी मंत्रीमंडळाची अवस्था आहे अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

  • 06 Dec 2023 03:20 PM (IST)

    सरकार असंवेदनशील आहे, अधिवेशनाआधी विरोधकांची टीका

    नागपूर : सरकार असंवेदनशील आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना बैठका घेण्यासाठी वेळ नाही. राज्यातील आणि देशातील विरोधकांना संपविण्याचे काम भाजपकडून सुरु आहे. केंद्रीय यंत्रणाचा वापर करून विरोधकांना भीती दाखवीत आहेत. अशी टीका विरीधी पक्षनेत विजय वडेट्टीवार यांनी केली.

  • 06 Dec 2023 03:17 PM (IST)

    त्यांच्या आरोपांना गांभीर्याने घेत नाही, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका

    शिर्डी : आरोप करणे विरोधकांचे कामच आहे. सत्ता गेल्यापासून लोकांमध्ये संशय निर्माण करणे एवढाच मविआचा अजेंडा आहे. ज्यांना स्वतःचे पक्ष टिकवता आले नाही त्यांच्या आरोपांना जनता गांभीर्याने घेत नाही, केवळ आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी माध्यमांमधे बोलतात अशी टीका राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर केलीय.

  • 06 Dec 2023 03:11 PM (IST)

    हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचा कारभार एकाच कार्यालयातून

    नागपूर : हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचा कारभार एकाच कार्यालयातून चालणार आहे. विधानभवन परिसरातील बराक क्रमांक ३ मध्ये राष्ट्रवादी पक्षाला कार्यालय देण्यात आले आहे. मात्र, येथे अजितदादा गटाचे प्रतोद अनिल पाटील यांच्या नावाची नेमप्लेट लावण्यात आली आहे.

  • 06 Dec 2023 02:45 PM (IST)

    कृषी विभागाचा गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सल्ला

    गडचिरोली जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण रिमझिम पाऊस सुरू आहे. कीटकनाशके खत फवारणी आणि कोणते औषध शेतीला उपयोग तीन दिवस करू नये असा सल्ला कृषी विभागाचा गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिला आहे.गडचिरोली जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे बाजारपेठ व नागरिकांची अनेक कामे थांबली आहेत वातावरणामध्ये मोठी घसरण झाल्यामुळे नागरिक शेकोटी लावून थंड वातावरणातून बचाव करीत आहेत

  • 06 Dec 2023 02:30 PM (IST)

    ललित पाटील पलायन प्रकरणी सहा जणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल

    ललितचा भाऊ, साथीदारासह मैत्रिणींचा देखील दोषारोप पत्रामध्ये समावेश समावेश आहे. अमली पदार्थ तस्कर ललित पाटील पलायन प्रकरणी एकूण १४ पैकी सहा आरोपींविरुद्ध प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं आहे. ललितच्या मैत्रिणी अर्चना किरण निकम, ॲड. प्रज्ञा कांबळे , ललितचा भाऊ भूषण पाटील, साथीदार अभिषेक बलकवडे, विनय अऱ्हाना, त्याचा चालक दत्तात्रेय डोके यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.

  • 06 Dec 2023 02:15 PM (IST)

    मराठा आरक्षण लढाई आणि आता ही लढाई अंतिम टप्प्यात - जरांगे पाटील

    मराठा आरक्षण लढाई आणि आता ही लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. खूप वर्षाच्या लढाईला यश मिळत आहे.35 लाख नोंदी सापडल्या आहेत.. मराठा समाजाला सरसगट आरक्षण मिळवण्यासाठी हा लढा असल्याचंजरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. यवतमाळमध्ये ते बोलत होते.

  • 06 Dec 2023 01:52 PM (IST)

    आरक्षणाला दोन दिवस देखील उशीर नको- जरांगे पाटील

    आरक्षणाला दोन दिवस देखील उशीर नको, असे मनोज जरांगे पाटील यांनी नुकताच म्हटले आहे.

  • 06 Dec 2023 01:25 PM (IST)

    नागपूर एअरपोर्टवर सर्वपक्षीय नेत्यांचे समर्थक एकवटले

    नागपूर एअरपोर्टवर सर्वपक्षीय नेत्यांचे समर्थक एकवटले नागपूर एअरपोर्टवर कार्यकर्त्यांची एकच गर्दी सर्व नेते व्हीआयपी विमानातून एकत्रच येणार असल्याची माहिती त्यासाठी एकवटले नेते पदाधिकारी. दहा दिवस होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनासाठी येणाऱ्या सर्व नेत्यांचे मंत्र्यांचे कार्यकर्यांकडून जल्लोषात स्वागत केले गेले.

  • 06 Dec 2023 01:14 PM (IST)

    मनोज जरांगे पाटील यांचे मोठे विधान

    क्युरेटीव्ह पिटीशन:यावर बोलणार नाही पण टीकणारे आरक्षण हवे 50 टक्क्यांपेक्षा वर गेल्यास ते टिकणार नाही हे आंदोलन टिकणारे आरक्षण मिळवण्यासाठी केले आहे, असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

  • 06 Dec 2023 01:04 PM (IST)

    दहा डिसेंबरला पाटण्यामध्ये महत्त्वपूर्ण बैठक

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पाटण्यामध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. पूर्वेकडील राज्यांचे मुख्यमंत्री बैठकीला उपस्थित राहणार. झारखंड पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत.

  • 06 Dec 2023 12:59 PM (IST)

    आता उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी आयुष्य भर EVM चा जप करावा - किरीट सोमय्या

    साल 2018 साली याच चार राज्यांमध्ये भाजप पराभूत झाली होती तेव्हा EVM च होतं आणि 2019 लोकसभा आणि विधान सभेत निवडून आले तेव्हा EVM च होते. त्याच आमदाराच्या आधारावर तुम्ही मु्ख्यमंत्री झाला होतात, ये मोदी की ग्यारंटी है, लोकांना मोदींवर विश्वास आहे आणि विश्वासघाती उद्धव ठाकरे सेना इतिहास जमा होणार आहे.

  • 06 Dec 2023 12:44 PM (IST)

    11 डिसेंबरला नागपूरला विधानभवनावर धनगर बांधवांचा मोर्चा

    नागपूर अधिवेशनादरम्यान नागपूर विधानभवनावर एक लाख धनगर बांधवांचा मोर्चा निघणार असल्याचे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.

  • 06 Dec 2023 12:33 PM (IST)

    धनगर आरक्षणसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

    धनगर आरक्षणाबाबत येत्या 8 तारखेला मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 8 ,11 आणि 15 तारखेला महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे, डिसेंबर अखेरीस धनगर आरक्षणासंदर्भात निकाल अपेक्षित आहे. 8 तारखेला भाजप आमदार गोपीचंद पडळकर स्वतः सुनावणीला उपस्थित राहणार आहेत.

  • 06 Dec 2023 12:20 PM (IST)

    गोंदिया : अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

    अग्निशमन दलातील 40 कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन केले आहे. मागील 1 महिन्यापासून काम बंद आंदोलन सुरू आहे. चार महिन्यापासून वेतन मिळालेले नाही.

  • 06 Dec 2023 12:08 PM (IST)

    'एक राष्ट्र, एक ओळखपत्र', Apaar Card विद्यार्थ्यांच्या मदतीला

    देशातील विद्यार्थ्यांसाठी एकच अभ्यासक्रम असावा यासाठी जोर देण्यात येत आहे. त्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. त्यातील पहिलं पाऊल म्हणजे 'एक राष्ट्र, एक ओळखपत्र', या योजनेचा श्रीगणेशा होत आहे. त्याला Apaar Card असे नाव देण्यात आले आहे. जाणून तर घ्या हे कार्ड कसे तयार होणार, काय आहेत त्याचे फायदे?

  • 06 Dec 2023 11:57 AM (IST)

    विरोधाला विरोध करु नका- मनोज जरांगे पाटील

    राज्यात मराठा समाजाच्या नोंदी सापडत आहेत. जर मराठा आणि कुणबी एक आहे तर तुम्ही आरक्षण देऊ नका कसं म्हणता? असा सवाल त्यांनी केला. ओबीसी बांधवांचे असं म्हणणं आहे की तो आम्हाला आरक्षण मिळू देत नाही. केवळ विरोधाला विरोध करु नका, असे ते म्हणाले.

  • 06 Dec 2023 11:47 AM (IST)

    आदिवासी शेतकऱ्यांचा मोर्चा

    इगतपुरीतील आदिवासी शेतकरी मंत्रालयावर मोर्चा काढणार आहे. विविध मागण्यासाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने त्यांच्यात नाराजी आहे. न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मोर्चेकरी शहापुर तालुक्यात दाखल झाले आहेत.

  • 06 Dec 2023 11:37 AM (IST)

    भाविकांना तृतीयपंथीयांचा त्रास

    पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनाला आलेल्या भाविकांना तृतीयपंथीयांचा त्रास होत आहे. मंदिर परिसरात भाविकांना अडवून अश्लील हावभाव करत त्यांच्याकडून जबरदस्तीने पैसे मागितले जातात. त्यामुळे तृतीयपंथी आणि भाविकांमध्ये वादा होत आहे. भाविकांना जबरदस्तीने पैसे मागताना अटकाव केल्याने फौजदाराला तृतीयपंथीयांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. मारहाण करणाऱ्या आणि जबरदस्तीने पैसे मागणाऱ्या दहा तृतीयपंथियांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. त्यांना येरवडा तुरुंगात पाठविण्यात आले आहे. त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भागवत यांनी दिली.

  • 06 Dec 2023 11:30 AM (IST)

    प्रतापराव जाधव यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा

    उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, पंजाच्या निशाणीवर लढणार असे दिसते, असा निशाणा खासदार प्रतापराव जाधव यांनी साधला. संजय राऊत सारखे गांधी परिवाराच कौतुक करत असतात.आम्ही आमच्याच चिन्हावर लढू मात्र ते पंजावर लढतील. ३ राज्याच्या निवडणूक निकालामुळे पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळे ते भयभीत झाले आहेत, असा टोला त्यांनी हाणला.

  • 06 Dec 2023 11:25 AM (IST)

    मराठा आरक्षणाबाबत रोड मॅप तयार होईल

    आज मराठा आरक्षणासंदर्भात रोड मॅप तयार होईल, सुप्रीम कोर्टाकडून मोठी अपेक्षा आहे, असे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सांगितले. संभाजी राजे खासदारांची बैठक घेताहेत हा चांगला निर्णय असल्याचे ते म्हणाले. राजकीय पक्षांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन त्यांनी केले.

  • 06 Dec 2023 11:20 AM (IST)

    भाजप प्रदेशाध्यक्षांना दाखवले काळे झेंडे

    भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. आरक्षणाच्या मागणीला घेऊन मराठा समाज रस्त्यावर आहे. बावनकुळे धाराशिव दौऱ्यावर असताना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी तुळजापुरात त्यांना काळे झेंडे दाखवले. झेंडे दाखवणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. बावनकुळे व्यापाऱ्यांच्या भेटीगाठी घेत असताना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

  • 06 Dec 2023 11:10 AM (IST)

    सुवर्णनगरीत ग्राहकांना मोठा दिलासा

    जळगावच्या सुवर्ण नगरीत एकाच दिवसात सोन्याच्या दरात 1300 रुपयांनी घसरण झाली. चांदीचा भावदेखील दोन हजारांनी घसरला. सोन्याचे दर 63 हजार रुपये प्रति तोळ्यावर तर चांदी 76 हजार रुपये प्रति तोळ्यावर आली आहे. लग्न सराईत भाव घसरल्याने ग्राहकांना खरेदीची संधी मिळाली आहे. दिवाळीपासून दरवाढीने ग्राहकांचा हिरमोड झाला होता.

  • 06 Dec 2023 10:59 AM (IST)

    लोकसभा-राज्यसभेचं कामकाज सुरू होण्यापूर्वी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक

    नवी दिल्ली- थोड्याच वेळात लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सुरू होणार आहे. कामकाजापूर्वी संसद भवनात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक आहे. पंतप्रधान मोदी यांची अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी आणि प्रल्हाद जोशी यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक आहे. अधिवेशनात मांडल्या जाणाऱ्या विधेयकांबाबत या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे.

  • 06 Dec 2023 10:45 AM (IST)

    पुणे- येत्या काही दिवसांत भिडे वाड्यात राष्ट्रीय स्मारकासाठी भूमिपूजन

    पुणे- येत्या काही दिवसांत भिडे वाड्याचा राष्ट्रीय स्मारकासाठी भूमिपूजन होणार आहे. स्मारकाचा आराखडा तयार करण्याचे काम पालिकेने सुरू केले आहे. यासाठी तीन वास्तू विशारदाची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी रात्री पालिकेने भिडे वाडा येथील जागा ताब्यात घेतली होती. त्यानंतर आता लवकर आराखडा तयार करण्यात येणार असून प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे. भिडेवाड्याची संपूर्ण जागा 3 गुंठ्याची आहे. या जागेत राष्ट्रीय स्मारक उभारला जाणार आहे.

  • 06 Dec 2023 10:30 AM (IST)

    आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील सोन्याचा मुकूट, मंगळसुत्र, नेत्रजोड आणि माणिक मोती गहाळ

    महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील सोन्याचा मुकूट, मंगळसुत्र, नेत्रजोड आणि माणिक मोती गहाळ झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मंदिर संस्थांनानं उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या 16 सदस्य समितीने दिलेल्या अहवालात ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. 27 अलंकारांपैकी 4 अलंकार गायब आहेत तर 12 पदराच्या 11 पुतळ्या असलेले मंगळसूत्र गायब आहे. 826 ग्राम म्हणजे पाऊण किलो पेक्षा जास्त वजनाचा सोन्याचा मुकूटही गायब आहे. चोरी लपवण्यासाठी दुसरा मुकूट ठेवला आणि पुरातन खोडे ( पादुका ) काढून नवीन बसविल्या आहेत.

  • 06 Dec 2023 10:15 AM (IST)

    छत्रपती संभाजीराजे नवी दिल्लीत सर्वपक्षीय खासदारांची घेणार बैठक

    छत्रपती संभाजीराजे नवी दिल्लीत सर्वपक्षीय खासदारांची बैठक घेणार आहेत. मराठा आरक्षणासाठी त्यांनी ही बैठक बोलावली आहे. सगळ्या खासदारांना त्यांनी बैठकीचं निमंत्रण पाठवलं आहे.

  • 06 Dec 2023 09:50 AM (IST)

    Live Update : मनोज जरांगे पाटील यांचा बनणार मेणाचा पुतळा

    मनोज जरांगे पाटील यांचा बनणार मेणाचा पुतळा... पुतळा बनवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे माप देखील घेण्यात आलं आहे.

  • 06 Dec 2023 09:38 AM (IST)

    Live Update : आरोग्य खात्यात लिलाव करुन बदल्या केल्या जात आहे - संजय राऊत

    आरोग्य खात्यात लिलाव करुन बदल्या केल्या जात आहे... असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. भ्रष्टाचाराविरोधात कुणाचा दिवा पेटतो आता बघू.. राज्याच्या आरोग्य विभागात मोठा भ्रष्टाचार झाल्याचं वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केलं आहे.

  • 06 Dec 2023 09:17 AM (IST)

    Live Update : वातावरणातील बदलामुळे न्यूमोनियाच्या रुग्णसंख्येत वाढ

    वातावरणातील बदलामुळे व्हायरल न्यूमोनियाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे. न्यूमोनियाच्या रुग्णसंख्येत 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाल्याचं डॉक्टरांचे निरीक्षण... दरवर्षी हिवाळ्यात न्यूमोनियाचे रुग्ण वाढत असतात... दरम्यान बहुतांश रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही

  • 06 Dec 2023 09:06 AM (IST)

    Live Update : अमरावतीच्या अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू यांचा काँग्रेसला झटका..

    अमरावतीच्या अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू यांचा काँग्रेसला झटका.. युवक काँग्रेसचे अचलपूर विधानसभा प्रमुख विकास सोनार यांचा बच्चू कडू यांच्या उपस्थितीत प्रहारमध्ये प्रवेश... चांदूरबाजार येथील तालुक्यातील देउरवाड्यातील जाहीर सभेत केला पक्षप्रवेश...

  • 06 Dec 2023 08:58 AM (IST)

    Maharashtra News : नागपूरच्या दिक्षाभूमीवर 200 कोटी रूपयांची विकास कामे सुरू- देवेंद्र फडणवीस

    नागपूरच्या दिक्षाभूमीवर 200 कोटी रूपयांची विकास कामे सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. दिक्षाभूमीला जागतीक दर्जाची वास्तू बणवण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू असल्याचेही ते म्हणाले.

  • 06 Dec 2023 08:50 AM (IST)

    Maharashtra News : देशाच्या प्रगतीचे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जाते- देवेंद्र फडणवीस

    भारत आज जगातील पाचवी महासत्ता आहे, लवकरच तीसरी महासत्ता होण्याच्या मार्गावर देश आहे. या प्रगतीचे श्रेय जर कोणाला जात असेल तर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जाते. असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

  • 06 Dec 2023 08:44 AM (IST)

    Maharashtra News : आरोग्य यंत्रणेवरून संजय राऊतांचं मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र

    राज्याच्या आरोग्य यंत्रणेवरून संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे याना पत्र लिहीलेलं आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेचे अक्षरशः धिंडवडे निघाले आहेत असं संजय राऊत म्हणाले.

  • 06 Dec 2023 08:41 AM (IST)

    Maharashtra News : हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरात 11 हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात

    हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरात 11 हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात असणार आहे. अशी माहिती नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. उद्यापासून नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे.

  • 06 Dec 2023 08:22 AM (IST)

    Mahaparinirvan Din 2023 : मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार चैत्यभूमीवर दाखल

    भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर आंबेंडकर यांचा आज 67 वा महापरिणीरर्वान दिन आहे. या निमीत्त मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली.

  • 06 Dec 2023 07:58 AM (IST)

    मराठा आरक्षणासंदर्भात कुरिटिव्ह पिटीशनवर आज सुनावणी होणार

    आज सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणासंदर्भात कुरिटिव्ह पिटीशनवर सुनावणी होणार आहे.  सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या दालनात ही सुनावणी होणार आहे.  आजच्या सुनावणीत युक्तिवाद होणार नाही.  फक्त 3 न्यायमूर्ती आणि सरन्यायाधीश उपस्थित राहणार आहेत.  दालनात आज केस पुढे चालवायची की नाही, याचा आज निर्णय होईल.

  • 06 Dec 2023 07:53 AM (IST)

    आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक

    राज्यात मराठा आरक्षणाचा तिढा सुटलेला नाहीये. सकल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे राज्यभर झंजावती दौरे सुरू आहेत. मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. लोणावळ्यातील कार्ला एकविरा देवी पायथा वेहेरगाव येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणाला मुंबईतील आग्री कोळी, सिकेपी महिलांनी पाठिंबा दिला आहे.

  • 06 Dec 2023 07:47 AM (IST)

    नांदेडमधील शेतकरी संकटात

    नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसापासुन ढगाळ वातावरण आहे. तर कधी पाऊसही कोसळतोय. या  बदलत्या हवामानामुळे मुगट, मुदखेड तसेच उमरी तालुक्यात हळद पिकावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. हळदीचे उत्पादन वाचविण्यासाठी शेतकरी कीटकनाशक औषधींची फवारणी करू लागला आहे. तसेच या  रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे  हळद उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. पूर्वीचा खरीप हंगाम वाया गेले असताना आता  रब्बी हंगामातील पिके देखील धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेतकरी चांगलाच हवालदिल झाला आहे.

  • 06 Dec 2023 07:45 AM (IST)

    मराठा आरक्षणावर आज महत्वपूर्ण सुनावणी

    मराठा आरक्षणावर आज सुप्रीम कोर्टात महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील हे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून सुनावणीसाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. यावेळी विनोद पाटील यांनी आज मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण टिकले तर आरक्षणाला कोणीही चॅलेंज करू शकत नाही. त्यामुळे मराठा समाजाला आज टिकणारं आरक्षण मिळेल, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे.

  • 06 Dec 2023 07:40 AM (IST)

    चैत्याभूमीवर अनुयायींची गर्दी

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्याभूमीवर अनुयायी यायला सुरुवात झालीय. तात्पुरता निवारा, सीसीटीव्ही कॅमेरे, LED टीव्ही, हिरकणी कक्ष उभारण्यात आले आहेत. तसंच मुंबई पोलिसांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू त्यासाठी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. २५० अधिकारी, २००० कर्मचारी, सीआरपीएफ च्या ९ तुकड्या, आरपीएफचे जवान, दंगल नियंत्रण पथक, हरविणाऱ्या वृद्ध आणि लहान मुलांना शोधण्यासाठी पथके, सोबतच समता सैनिक दलाचे १८ हजार जवान बंदोबस्तासाठी तैनात आहेत.

  • 06 Dec 2023 07:30 AM (IST)

    बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिन

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिन आहे. त्यानिमित्त आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्याभूमीवर अनुयायी यायला सुरुवात झाली. काल रात्री प्रकाश आंबेडकर यांनी सहकुटुंब चैत्यभूमीवर जात अभिवादन केलं.

Published On - Dec 06,2023 7:26 AM

Follow us
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....
एसटी बँकेच्या संचालकपदाबाबत सदावर्ते दाम्पत्याला मोठा दणका
एसटी बँकेच्या संचालकपदाबाबत सदावर्ते दाम्पत्याला मोठा दणका.
दिल्ली गाजवणार मुंडेसाहेबांची लेक, कुठून आली तुतारी..,शिंदेंचा घणाघात
दिल्ली गाजवणार मुंडेसाहेबांची लेक, कुठून आली तुतारी..,शिंदेंचा घणाघात.