काँग्रेस आमदार सासऱ्यांकडून छळ, सहकार मंत्र्यांच्या पुतणीचे धक्कादायक आरोप

पी. एन. पाटील हे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष असून करवीर मतदारसंघातून विद्यमान आमदार आहेत. तर त्यांच्या सूनबाई आदिती यांचे काका बाळासाहेब पाटील हे ठाकरे सरकारमध्ये सहकार मंत्री आहेत. आदिती यांचे वडील सुभाष पाटील हेसुद्धा जिल्ह्याच्या राजकारणातील मोठे नेते आहेत.

काँग्रेस आमदार सासऱ्यांकडून छळ, सहकार मंत्र्यांच्या पुतणीचे धक्कादायक आरोप
पी एन पाटील, बाळासाहेब पाटील

कोल्हापूर : सुनेचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याप्रकरणी कोल्हापुरातील काँग्रेस आमदार पी. एन. पाटील (P N Patil) यांच्यासह तिघा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पांडुरंग निवृत्ती उर्फ पी एन पाटलांच्या सूनबाई आदिती राजेश पाटील यांनी कराड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर आमदार पी. एन. पाटील, त्यांचे पुत्र राजेश पाटील आणि कन्या टीना महेश पाटील यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तक्रारदार आदिती पाटील या राष्ट्रवादीचे नेते आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांच्या पुतणी आहेत. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पती, सासरे, नणंदेवर गुन्हा

पी. एन. पाटील यांचा मुलगा राजेश पाटील आणि आदिती पाटील यांचा विवाह दोन वर्षांपूर्वी कोल्हापुरात अत्यंत थाटामाटात पार पडला होता. लग्नानंतर आपला सासरी छळ करतानाच एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप आदिती यांनी फिर्यादीत केला आहे. सासरे पांडुरंग निवृत्ती पाटील, पती राजेश पांडुरंग पाटील आणि नणंद टीना महेश पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

राजकीय कुटुंबात वाद

पी. एन. पाटील हे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष असून करवीर मतदारसंघातून विद्यमान आमदार आहेत. तर त्यांच्या सूनबाई आदिती यांचे काका बाळासाहेब पाटील हे ठाकरे सरकारमध्ये सहकार मंत्री आहेत. आदिती यांचे वडील सुभाष पाटील हेसुद्धा जिल्ह्याच्या राजकारणातील मोठे नेते आहेत. गेले दोन-तीन महिने या कुटुंबात वाद सुरु असल्याचा दावा केला जातो. हा वाद मिटवण्यासाठी राजकीय स्तरावरही समेट घडवण्याचे प्रयत्न झाले होते, पण त्याला यश आलं नाही.

कोण आहेत पी एन पाटील?

  • पी एन पाटील हे काँग्रेसचे विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत.
  • कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्त्व करतात
  • 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या चंद्रदीप नरके यांचा पराभव केला.
  • पी एन पाटील यांचा 2009 आणि 2014 च्या निवडणुकीत पराभव झाला होता.
  • पी एन पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्षपद भूषवलं होतं.

पी. एन. पाटलांनी आरोप फेटाळले

दरम्यान, आमदार पी. एन. पाटील यांनी सुनेने केलेल्या आरोपांचे खंडन प्रतिक्रिया देताना केले आहे. आम्ही कुठल्याही प्रकारे सुनेचा छळ केलेला नाही. लग्न झाल्यापासून ती बहुतांशी काळ माहेरीच असते. त्यामुळे तिचा छळ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी राजकारणात आहे. सुनेकडे एक कोटी रुपये मागण्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. खोट्या आरोपांमुळे मनाला क्लेश होत आहे, असे आमदार पी. एन. पाटील म्हणाले.

मंत्रिपद न मिळाल्याने नाराजी

याआधी, ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात कोल्हापुरातून काँग्रेसने सतेज पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं, त्यामुळे पी एन पाटील समर्थक नाराज झाले होते. आमदार पी. एन. पाटील यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये एक तराजू दाखवण्यात आला होता. या तराजूच्या एका पारड्यात पैसे आणि दुसऱ्या पारड्यात 40 वर्षांची पक्षनिष्ठा दाखवण्यात आली होती. यामध्ये पैशाचं पारडं हे जड असल्याने ते झुकलेलं दाखवलं, तर पक्षनिष्ठतेचं वजन कमी असल्याचं दाखवण्यात आलं होतं. हा फोटो अनेक पी. एन. पाटील समर्थकांनी त्यांच्या सोशल मीडियावर स्टेटसला अपलोड केला होता.

संबंधित बातम्या  

‘एकनिष्ठतेपेक्षा पैशांचं वजन अधिक’, कोल्हापुरात फोटो व्हायरल; पी एन पाटील गट नाराज 

मंत्रिपद न दिल्याने नाराज, काँग्रेस आमदार पी एन पाटील राजीनामा देण्याची शक्यता

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI