भावोजीच्या मोबाईलमध्ये बायकोचा अश्लील व्हिडीओ, सगळं समजताच नवरा सुन्न!
भावोजीनेच एका महिलेचा अश्लील व्हिडीओ शूट केल्याचा गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा पोलीस तपास करत आहेत.

Crime News : उत्तर प्रदेशातील हापूड जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणाने आपल्या पत्नीचा अश्लील व्हिडीओ काढण्यात आल्याची पोलिसात तक्रार दिली आहे. हा प्रकार हापूड जिल्ह्यातील जनपद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. तरुणीने यासंदर्भात बहिणीच्या पतीवर (भावोजी) गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत.
नेमका प्रकार काय आहे?
मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार व्यक्तीने आपल्या भावोजीविरोधात गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. या आरोपांनुसार भावोजींनी त्याच्या पत्नीचा अश्लील व्हिडीओ काढला आहे. काही दिवसांपूर्वी तक्रारदाराची पत्नी त्याच्या भावोजीच्या घरी गेली होती. त्यावेळी तक्रारदार पती तिच्यासोबत नव्हता. हीच संधी साधून भावोजीने त्याच्या बायकोचा अश्लील व्हिडीओ काढला. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार त्याच्या पत्नीच्या संमतीविना झाल्याचा दावा तक्रारदाराने केला.
जाब विचारताच भावोजीने केली मारहाण
तक्रारदार युवक त्याच्या भावोजीच्या घरी आपल्या पत्नीला घ्यायला गेला होता. यावेळी भावोजीच्या मोबाईलमध्ये त्याच्या पत्नीचा व्हिडीओ दिसला. याबाबत जाब विचारल्यावर भावोजीने त्याला मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
बायकोच्या संमतीविना शूट केला व्हिडीओ
काही दिवसांपूर्वी तक्रारदार तरुणाचा त्याच्या बायकोसोबत वाद झाला होता. त्यानंतर रागात बायको तक्रारदाराच्या भावोजीच्या घरी गेली होती. यावेळी ती घरातील रोकड आणि दागिने घेऊन गेली होती. याच काळात माझ्या पत्नीच्या सहमतीविना भावोजीने हा व्हिडीओ शूट केल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.
पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?
दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तरुणाने तक्रार दिली असली तरी हे प्रकरण नेमकं काय आहे? याचा शोध पोलीस घेत आहेत. त्यासाठी सर्वच बाजूने चौकशी चालू आहे. याबाबत पोलीस अधिकारी देवेंद्र सिंह बिष्ट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तक्रारदाराने सांगितल्यानुसार तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाला पोलिसांनी गंभीरतेने घेतले आहे. तसेच आपला तपास चालू केला आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे.
