AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूरमध्येही हिट अँड रन, भरधाव कारने 9 जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू

नागपूरमध्येही हिट अँड रनचा आणखी एक प्रकार उघडकीस आला असून भरधाव वेगाने आलेल्या कारने फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडल्याचे समोर आले आहे.

नागपूरमध्येही हिट अँड रन, भरधाव कारने 9 जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
| Updated on: Jun 17, 2024 | 11:52 AM
Share

पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्श कारने धडक देऊन दोघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच राज्यात आणखीही हिट अँड रनच्या दुर्दैवी घटना घडल्याचे समोर येत आहे. नागपूरमध्येही हिट अँड रनचा आणखी एक प्रकार उघडकीस आला असून भरधाव वेगाने आलेल्या कारने फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडल्याचे समोर आले आहे. या अपघातामध्ये २ मजुरांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याचे समजते. अपघातावेळी आरोपी कारचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली असून पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या दिघोरी नाक्याजवळ काल मध्यरात्री 12.30 च्या सुमारास हा अपघात घडला. रस्त्याच्या कडेला फुटपाथवर झोपलेल्या बंजारा परिवारातील लोकांना या कारने चिरडले. जखमींमध्ये चार महिला, पुरुष आणि लहान मुले असे एकूण 9 जण झोपले होते. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. हा अपघात घडला तेव्हा कारमध्ये ५ जण असल्याची माहिती आहे. त्या सर्वांनी दारू प्यायली होती असा पोलिसांना संशय असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून अहवाल आल्यावर खरं काय ते स्पष्ट होईल. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून भूषण लांजेवार असं आरोपीचं नाव आहे.

प्रत्यक्षदर्शी व्यक्तीच्या सांगण्यानुसार, अपघातावेळी ही कार खूप वेगात होती. कार वेगाने आल्यानंतर घराच्या दिशेने शिरली. या कारमध्ये काही लोक होते. फूटपाथवर बरेच लोक झोपले होते. तर अपघातात काही जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, अपघातानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली. या अपघातामधील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी अपघातग्रस्त कार जप्त केली आहे.

बस-रिक्षाची भीषण धडक, दोन जवानांचा मृत्यू

दरम्यान नागपूर जिल्ह्यातील कन्हान नदीवरील पुलावर भरधाव वेगाने येणाऱ्या खासगी बसने रिक्षाला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. त्यामध्येकामठी लष्करी छावणीतील दोन जवानांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले. जखमी जवानांवर मेयो, मेडिकलसह लष्करी छावणीच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी संध्याकाळी हा अपघात झाला.

रविवारी सुट्टी असल्यामुळे कामठी लष्करी छावणीतील आठ जवान  कन्हान शहरात खरेदीसाठी जात होते, मात्र तेव्हाच बसची धडक बसून हा अपघात झाला. यामध्ये  जी. विघ्नेश आणि धीरज रॉय, या दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही धडक एवढी भयानक होती की ॲाटोरिक्षाचा पूर्णपणे चुराडा झाला.

राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.