Cyber Crime : सावधान ! तुमच्या कुरिअरमध्ये ड्रग्ज, फसवणुकीसाठी सायबर चोरट्यांचा नवा डाव

सध्या पोस्टाच्या वापरापेक्षा खासगी कुरिअरने एखादे पत्र किंवा वस्तू पाठवण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. मात्र कुरिअर सेवेचा हा वढता वापर सायबर चोरांच्या चांगलाच पथ्यावर पडला आहे. कुरिअर सेवेचा वाढता वापर पाहून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी हा मार्ग निवडला आहे.

Cyber Crime : सावधान ! तुमच्या कुरिअरमध्ये ड्रग्ज, फसवणुकीसाठी सायबर चोरट्यांचा नवा डाव
भारताच्या आयटी सिस्टिमला रॅनसमवेअरपासून वाचविण्यासाठी लगेचच सायबर सुरक्षा प्रणालीचा अंगिकार करणे अत्यंत गरजेचे आहे. थ्रेट इंटेलिजेन्स कॅपेबिलिटीजच्या सहायाने या हल्ल्याने लगाम घालण्यास मदत मिळू शकते. त्यासाठी सायबर सुरक्षा उत्पादन आणि सेवांची मदत घेता येऊ शकते.
Follow us
| Updated on: Mar 12, 2024 | 11:23 AM

मुंबई | 12 मार्च 2024 : सध्या पोस्टाच्या वापरापेक्षा खासगी कुरिअरने एखादे पत्र किंवा वस्तू पाठवण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. मात्र कुरिअर सेवेचा हा वढता वापर सायबर चोरांच्या चांगलाच पथ्यावर पडला आहे. कुरिअर सेवेचा वाढता वापर पाहून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी हा मार्ग निवडला आहे. त्याचाच एक भाग म्हणून तुमच्या नावे आलेल्या कुरिअरमध्ये ड्रग्ज, तसेच महागड्या प्रतिबंधित वस्तू असल्याचे सांगून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जाते. आपण सीबीआय, तसेच गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे भासवून लाखो रुपये उकळले जात आहेत. अशा प्रकारचे अनेक गुन्हे भोईवाडा, दादर, शिवाजी पार्कसह मुंबईतील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.

अशीच एक घटना एका खासगी कंपनीत अधिकारी असलेल्या दादरच्या विजयकुमार (बदललेले नाव) याच्यासोबत घडली. त्याला फसवून त्याच्या मेहनतीच्या लाखो रुपयांवर डल्ला मारण्यात आला. दादरच्या विजयकुमार यांना एका कुरिअर कंपनीच्या कथित कर्मचाऱ्याने फोन केला आणि तुम्ही रशिया येथे पाठवलेल्या पार्सलमध्ये ड्रग्ज होते. ते गुन्हे शाखेने जप्त केले आहेत, अशी माहिती दिली. मात्र हे ऐकून विजयकुमार यांना मोठा धक्का बसला. आपण असं कोणतंच पार्सल पाठवलेलं नाही असे त्याने समोरच्या व्यक्तीला सांगितलं.

त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा एका अधिकाऱ्याचा विजयकुमार यांना फोन आला. या प्रकरणात गुन्हा दाखल करायचा नसेल तर तुम्हाला एक ॲप डाऊनलोड करावे लागेल आणि त्यामध्ये काही माहिती भरून द्यावी लागेल असेल सांगितले. पुन्हा फोन आल्याने घाबरलेल्या विजयकुमार याने हे प्रकरण लवकरात लवकर संपवण्याच्या नादात ती माहिती भरण्यास होकार दर्शवला. त्याप्रमाणे त्याने ते ॲप डाऊनलोड करून, त्यात माहिती भरण्यास सुरूवात केली. मात्र त्याचवेळी, त्याच्या बँक खात्यामधून तब्बल 4 लाख 83 हजार रुपये परस्पर काढण्यात आले. शिवाजी पार्क येथील महिलेलाही अशाच प्रकारे गंडा घालण्यात आला. पार्सलमध्ये ड्रग्ज असल्याचे सांगत आणइ आणि बँक खात्यातून मनी लाँड्रिंग झाल्याचे सांगून या महिलेकडून दोन लाख रुपये उकळण्यात आले. सायबर गुन्हेगारांच्या फसवणुकीच्या या नव्या तंत्रामुळे सामान्य नागरिक मात्र त्रस्त झाले असून, मेहनतीचे पैसे गमवावे लागल्याने त्यांच्या मनस्तापात भर पडली आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.