AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोल्डन थाळीचा मोह नडला, 50 रुपयांच्या थाळीसाठी गमावले हजारो रुपये ! आरोपींना 5 महिन्यांनी अटक

अवघ्या 50 रुपयांच्या थाळीसाठी तक्रारदार व्यक्तीने हजारो रुपये गमावले. ऑनलाइन ऑफरच्या मोहात पडल्याने त्याला चांगलाच मोठा फटका बसला. ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना अखेर अटक करण्यात आली.

गोल्डन थाळीचा मोह नडला, 50 रुपयांच्या थाळीसाठी गमावले हजारो रुपये ! आरोपींना  5 महिन्यांनी अटक
| Updated on: Nov 14, 2023 | 12:07 PM
Share

मुंबई | 14 नोव्हेंबर 2023 : आजकाल ऑनलाइन शॉपिंगचं प्रस्थ बरचं वाढलं आहे. बहुतांश लोकं अनेक जाहिराती पाहून किंवा ऑफर्सच्या प्रलोभनांना भुलून बऱ्याचशा वस्तू ऑनलाइन मागवतात. पण यामध्ये फसवणूक होण्याचे प्रकारही बऱ्याच वेळेस घडत असतात. अशाच एका ऑनलाइन फसवणुकीचे प्रकरण समोर आले, त्यातील आरोपींना अखेर 5 महिन्यांनी अटक करण्यात आली आहे.

अवघ्या 50 रुपयांच्या थाळीसाठी तक्रारदार व्यक्तीने हजारो रुपये गमावले. ऑनलाइन ऑफरच्या मोहात पडल्याने त्याला चांगलाच मोठा फटका बसला. मात्र अंत भला तो सब भला.. या उक्तीनुसार, आता या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आल्याने त्या तक्रादाराला दिलासा मिळाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तब्बल 5 महिने कसून तपास करत दोन आरोपींना बेड्या ठोकल्या. इरफान मलिक (वय 35) आणि फैजान मोदन (वय 30) अशी या आरोपींची नावे आहेत.  डॉ.दा.भ. मार्ग पोलिसांनी याप्रकरणाचा पर्दाफाश केला.  ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या या दुकलीला अहमदाबाद येथून अटक करण्यात आली.

थाळीचा मोह नडला

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्ती ही दक्षिण मुंबईतील असून त्या व्यक्तीने जून महिन्यात सोशल मीडियावर एक जाहिरत पाहिली. होलसेल दरात जेवणाची गोल्डन थाळी मिळत असल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते. फोटोतील पदार्थ पाहून ती थाळी मागवण्याचा मोह त्या व्यक्तीला झाला. आणइ ही थाळी अवघ्या 50 रुपयांमध्ये मिळत असल्याचे पाहून तर त्यांनी ऑर्डर देण्याचे ठरवलेच.

त्यासाठी त्यांनी त्या जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या लिंकवर क्लिक केले आणि त्यात त्यांचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर तसेच क्रेडिड कार्डची माहितीदेखील भरली. संबंधित थाळीचे 50 रुपये भरण्यासाठी त्यांना मोबाईलवर एक ओटीपी आला. हा नंबर शेअर करताच त्यांच्या अकाऊंटमधून तब्बल 38 हजार रुपये डेबिट (वजा) झाले. सायबर गुन्हेगारांनी त्यांना हा हजारोंचा चुना लावला. त्यामुळे अवघ्या 50 रुपयांच्या थाळीच्या मोहापायी आपल्याला 38 हजार रुपये गमवावे लागल्याचे आणि आपली फसवणूक झाल्याचे पीडित व्यक्तीच्या लक्षात आले.

लगेच पोलिसांत घेतली धाव

त्यानंतर पीडित व्यक्तीने तातडीने डॉ. दा. भ. मार्ग पोलिस ठाण्यात धाव घेऊन यांसदर्भात तक्रार नोंदवली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय घारेपडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी जितेंद कदम, नितीन महाडिक, तुकाराम डिगे, अभिजीत देशमुख, पोलीस अंमलदार सचिन घुगे, सुरज धायगुडे, चैतराम पावरा, मुन्ना सिंग यांनी तपास सुरू केला. तांत्रिक तपासात गुजरात कनेक्शन उघड होताच पोलिसांनी गुजरातमधील अहमदाबादच्या रोखाने धाव घेतली. तेथे जाऊन सापळा रचत पोलिसांनी त्यांना अटक केली.

पुढील तपासात आरोपी इरफान याने सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणुकीची लिंक पाठविल्याचे निष्पन्न झाले. तर फैजान याच्या बँक खात्यात क्रेडिट कार्डमधून चोरलेले पैसे वळते केल्याचे समोर आले. या दुकलीने आतापर्यंत अनेकांना अशाप्रकारे गंडविल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या दोघांनाही न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.