AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WhatsApp APK फाईल म्हणजे काय? कसे खात्यातून 70 हजार रुपये लुटले? जाणून घ्या बंगळुरुचं प्रकरण

सध्या डिजिटल युग असून पैशांचे व्यवहार एका सेकंदात होत आहे. पूर्वी एका खात्यातून दुसर्‍या खात्यात पैसे जमा होण्यासाठी काही दिवसांचा अवधी जात होता. आता एक रुपयांपासून लाखो रुपये एका मिनिटात एका खात्यातून दुसऱ्या खात्यात जातात. पण फसवणुकीचे प्रकारही तितक्यात वेगाने घडत आहेत. असाच एक प्रकार बंगळुरुतून समोर आला आहे.

WhatsApp APK फाईल म्हणजे काय? कसे खात्यातून 70 हजार रुपये लुटले? जाणून घ्या बंगळुरुचं प्रकरण
| Updated on: Feb 02, 2025 | 3:58 PM
Share

ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून वेगाने वाढत आहेत. एका चुकीच्या लिंकवर क्लिक आणि होत्याचं नव्हतं अशी स्थिती.. आतापर्यंत अनेक लोकांना असा फटका बसला आहे. तसेच गुन्हेगारांचा छडा लावणंही कठीण झालं आहे. आता स्कॅमर व्हॉट्सअ‍ॅप एपीके फाईलद्वारे लोकांना गंडा घालत असल्याचं समोर आलं आहे. बंगळुरुमध्ये एका वर्षीय व्यक्तीची अशीच फसवणूक करण्यात आली आहे. सदर व्यक्ती एका खासगी कंपनीत कामना असून व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून त्याची फसवणूक झाली आहे. स्कॅमर्सनी त्याला बनावट वाहतूक चलन पाठवून 70 हजार रुपयांचा गंडा घातला आहे. दक्षिण पूर्व बंगळुरुमधील सिंगासंद्राचा हा रहिवासी आहे. मिडिया रिपोर्टनुसार, पीडित व्यक्तीला 19 जानेवारीला एका व्हॉट्सअप क्रमांकावरून मेसेज आला. यात त्याला वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याची भीती दाखवण्यात आली. तसेच मेसेजमध्ये एक पावती पाठवली होती.

गाडीने वाहतूकीचं उल्लंघन केल्याचं सांगत एक तिकीट क्रमांक लिहिला होता. तसेच वाहतुकीचं नियम मोडल्याने चलन लिंकद्वारे भरण्यास सांगितलं. या माध्यमातून त्याने बनावट वाहतूक अ‍ॅप डाउनलोड करून दंड भरण्यास सांगितलं. त्याच्या या सुचना वाचून सदर व्यक्ती फसली आणि त्याने सदर अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी एपीके फाईल लिंकवर क्लिक केलं. त्याला एक ओटीपी मिळाला. मग थोड्याच वेळात ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर त्याच्या क्रेडिट कार्डवरून 70 हजार रुपयांचा व्यवहार केल्याचं दिसून आलं. इतकंच कायतर पत्नीच्या खात्यावरूनही पैसे काढण्याचा प्रयत्न झाला. कारण कृष्णनचे काही अप्लिकेशन त्याच्या पत्नीच्या मोबाईल नंबरशी निगडीत होते. पण स्कॅमर्सला पत्नीच्या खात्यातून पैसे काढता आले नाहीत.

फसवणुकीनंतर सदर व्यक्तीने थेट बँकेशी संपर्क साधला आणि व्यवहार ब्लॉक करण्यास सांगितले. तसेच सायबर हेल्पलाईनला या प्रकरणाची माहिती दिली. 29 जानेवारीला या प्रकरणाची पोलिसांनी तक्रार नोंदवली आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम 318 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. तसेच अनोळखी नंबरवरून येणाऱ्या लिंकवरून एपीके फाईल डाउनलोड करून नका असा सल्लाही दिला आहे.

काय आहे Whatsaap APK फाईल?

अँड्रॉईड डिव्हाईसवर व्हॉट्सअ‍ॅप लिंकच्या माध्यमातून अप्लिकेशन इंस्टॉल करण्यासाठी या फाइल्सचा उपयोग होतो. एपीके म्हणजेच अँड्रॉईड पॅकेज किट.. विंडोसमध्ये अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी .exe फाईलसारखी असते. स्कॅमर्स याचा वापर करून लोकांची फसवणूक करू शकतात. यासाठी अनोळखी नंबरवरून येणाऱ्या मेसेज लिंक डाउनलोड करू नका.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.