Thane Crime : विमान दुर्घटनेत ठाण्यातील अख्ख कुटुंब संपलं! 2 महिन्यांनी कळलं, मृत वैभवीच्या अकाऊंटमधून 15 लाखांची अफरातफर

वय वर्ष 50 असलेल्या वैभवी त्रिपाठी यांचा विमानात अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्यांच्याकडील सर्वच गोष्टी हरवल्या असाव्यात, असं कुटुंबीयांना वाटलं होतं.

Thane Crime : विमान दुर्घटनेत ठाण्यातील अख्ख कुटुंब संपलं! 2 महिन्यांनी कळलं, मृत वैभवीच्या अकाऊंटमधून 15 लाखांची अफरातफर
सायबर गुन्हेगारीत वाढImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 07, 2022 | 8:33 AM

मुंबई : नेपाळमध्ये (Nepal) सुट्टीसाठी गेलेल्या कुटुंबाचा विमान दुर्घटनेत (Plane Crash) मृत्यू झाला. तारा एअर क्रॅशमध्ये ठाण्यातील एकाच कुटुंबामधील चौघे ठार झाले होते. मे महिन्यात घडलेल्या या दुर्घटनेच्या दोन महिन्यांनंतर धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या बँक अकाऊंटमधून (Bank Crime News) लाखो रुपयांची अफरातफर करण्यात आली आहे. थोडे थोडके नाही, तर तब्बल 14.6 लाख रुपये काढण्यात आले असून मृत व्यक्तीच्याच नावे कर्ज काढण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. हा सगळा सायबर क्राईमचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून आता पोलिसांकडून या संपूर्ण आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तपास केला जातो आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या बहिणीने याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंद केली असून पुढीत तपास केला जातोय. लवकरच आरोपींना पकडण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय.

नेमकं काय प्रकरण?

त्रिपाठी कुटुंबीय मे महिन्यामध्ये फिरण्यासाठी म्हणून नेपाळ टूरवर गेले होते. त्यावेळी त्यांच्या विमानाचा अपघात झाला. या वैभवी त्रिपाठी, अशोक कुमार, त्यांची दोन मुलं धनुष आणि रितिका यांचाही या अपघातात जीव गेला होता. या अपघातातून काही बँगा आणि लॅपटॉप सापडला होता. पण यात वैभवी यांच्या फोन बाबत आणि बँक अकाऊंट, बँकेचे कार्ड याच्याबाबत तेव्हा माहिती देण्यात आलेली नव्हती. दरण्यान, आता समोर समोर आलेल्या माहितीनुसार मृ्त्यू झालेल्या वैभवी यांच्या अकाऊंटमधून तब्बल 40 ट्रान्सझॅक्शन्स करण्यात आली आलीत. 13 जून ते 30 जुलै दरम्यान, हा प्रकार घडल्याचंही उघडकीस आलं असून पवई पोलिसांत याप्रकरणी मृत वैभवीच्या बहिणीनं तक्रार दिली आहे.

कळलं कसं?

वय वर्ष 50 असलेल्या वैभवी त्रिपाठी यांचा विमानात अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्यांच्याकडील सर्वच गोष्टी हरवल्या असाव्यात, असं कुटुंबीयांना वाटलं होतं. कायदेशीर वारस असल्यामुळे वैभवीच्या बहिणीने वैभवीचं सीम कार्ड आपल्या नावावर करुन घेतलं. त्यानंतर जेव्हा हे सीम कार्ड एक्टीवेट करण्यात आलं, त्यानंतर धक्कादायक खुलासा झाला. वैभवी यांच्या अकाऊंटवरुन गेल्या दीड महिन्यात पैशांचे व्यवहार झाल्याचं एसएमएसमधून उघड झालं. 30 जुलै रोजी हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर मृत वैभवीच्या बहिणीला आणि तिच्या कुटुंबीयांना धक्काच बसला.

हे सुद्धा वाचा

तपास सुरु

दरम्यान, आता यापर्यंत जवळपास पंधरा लाख रुपयांची अफरातफर झाली असून पाच लाख रुपयांचं कर्जही याच अकाऊंटवरुन काढलं गेलं असण्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. याप्रकरणी आता पोलिसांत तक्रार देण्यात आली असून सायबर पोलिस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वैभवी यांच्या अकाऊंटमधून पैसै ट्रान्सफर करण्यात आले. त्यानंतर हे पैसे वेगवेगळ्या एटीएममधून विड्रॉ केले गेले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. एक प्रकारचे रॅकेटच यामागे असावं, असा संशय पोलिसांना असून या रॅकेटचा पर्दाफाश करण्याचं आव्हान सध्या पोलिसांसमोर उभं ठाकलंय.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.