300 रुपयांची लिपस्टीक भलतीच महागात पडली, लागला 1 लाखाचा चुना; सायबर भामट्यांकडून डॉक्टरची फसवणूक

आजकाल सायबर गुन्ह्यांचे प्रमाण खूपच वाढले आहे. कधी नोकरीचे आश्वासन देऊन, तर कधी कमी गुंतवणुकीत जास्त पैसे मिळण्याचे आमिष दाखवून लोकांना लुबाडलं जातं. आता नवी मुंबईत एका महिला डॉक्टरला लाखभर रुपयांना लुबाडण्यात आलं. ऑनलाइन लिपस्टीक मागवणं प्रचंड महागात पडलं

300 रुपयांची लिपस्टीक भलतीच महागात पडली, लागला 1 लाखाचा चुना; सायबर भामट्यांकडून डॉक्टरची फसवणूक
Follow us
| Updated on: Nov 20, 2023 | 9:52 AM

नवी मुंबई | 20 नोव्हेंबर 2023 : सायबर गुन्ह्यांचे प्रमाण आजकाल खूपच वाढले आहे. कधी नोकरीचे आश्वासन देऊन, तर कधी कमी गुंतवणुकीत जास्त पैसे मिळण्याचे आमिष दाखवून लोकांना लुबाडलं जातं. काही दिवसांपूर्वी तर एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला तर ड्राय फ्रुटस ऑनलाइन मागवणं महागात पडलं. ऑनलाइन ऑर्डर देताना बदमाशांनी त्यांना फसवून हजारो रुपये लुटले. या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या असून, विश्वास नक्की ठेवायचा तरी कुणावार असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. याच माध्यमातून आता एका डॉक्टरचीही फसवणूक झाल्याचे घटना घडली आहे.

हे प्रकरण नवी मुंबईतील आहे. तेथे एका महिला डॉक्टरला ऑनलाइन लिपस्टीक मागवणं प्रचंड महागात पडलंय. कारण अवघ्या 300 रुपयांच्या लिपस्टीकपायी त्यांना तब्बल 1 लाख रुपयांचा चुना लागला आहे. सायबर भामट्यांनी त्यांच्या खात्यातून लाखभर रुपये सहज उडवले. यामुळे त्या डॉक्टरचे आर्थिक नुकसान तर झालेच पण त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला तो वेगळाच.

ऑनलाइन दिली लिपस्टीकची ऑर्डर

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईत राहणाऱ्या या डॉक्टरने 2 नोव्हेंबर रोजी एका ई-कॉमर्स पोर्टलवर लिपस्टिकची ऑर्डर दिली होती. काही दिवसांनी त्या डॉक्टरला यासंदर्भात कुरिअर कंपनीकडून एक मेसेज आला आणि तुमच्या लिपस्टीकची डिलीव्हरी झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. मात्र त्या महिलेला लिपस्टीक काही मिळाली नव्हती, त्यामुळे याबद्दल विचारण्यासाठी तिने कुरिअर कंपनीच्या नंबरवर संपर्क साधला. तेव्हा आमचा कस्टमर केअरचा प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधले, असे तिला सांगण्यात आले.

त्यानंतर त्या डॉक्टरच्या मोबाईवर एक कॉल आला आणि फोनवरील दुसऱ्या व्यक्तीने तिला सांगितलं की तिची ऑर्डल होल्डवर ठेवण्यात आली आहे. आणि लिपस्टीकची ऑर्डर हवी असेल तर तुम्हाला दोन रुपये भरावे लागतील. मात्र त्या महिला डॉक्टरने पैसे भरण्यास नकार दिला. अखेर तिला एक वेबलिंक पाठवून, त्यामध्ये बँकेचे तपशील भरण्यास सांगण्यात आले.

यानंतर डॉक्टर महिलेला भीप यूपीआय लिंक बनवण्याबाबत एक मेसेज मिळाला. तेव्हा तिने कॉल करणाऱ्यांना याबाबत तातडीने विचारले असता, आता लवकरच तुमचे पार्सल डिलीव्हर होईल, असे उत्तर तिला देण्यात आले. तिने लिंकवर क्लिक करताच तिच्या मोबाईलवर एक अप डाउनलोड झाले. त्यानंतर 9 नोव्हेंबर रोजी त्या डॉक्टरच्या बँक अकाऊंटमधून आधी 95 हजार रुपये आणि नंतर 5 हजार रुपये डेबिट झाले. एकूण एक लाख रुपये डेबिट झाल्याचे कळताच त्या डॉक्टरला मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीने नेरूळच्या सायबर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.