AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सासऱ्यांसोबत झालं जोरदार भांडण, संतापलेल्या सुनेने त्यांना बाल्कनीतून सरळ…

एका उद्योगपतीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. त्यांच्या मुलाने आपल्या पत्नीवरच पित्याची हत्या केल्याचा आरोप लावला आहे.

सासऱ्यांसोबत झालं जोरदार भांडण, संतापलेल्या सुनेने त्यांना बाल्कनीतून सरळ...
क्षुल्लक वादातून गोविंदा पथकावर हल्ला
| Updated on: Aug 16, 2023 | 10:26 AM
Share

जयपूर | 16 ऑगस्ट 2023 : राजस्थानच्या जयपूरमध्ये एक हसतंखेळतं कुटुंब क्षणार्धात उद्धवस्त झालं. तेथे एका उद्योगपतीचा संशयास्पद परिस्थितीमध्ये मृत्यू (death of businessman झाला आहे. बाल्कनीतून खाली पडल्याने ते मरण पावले. लतेश गोयल असे मृत इसमाचे नाव असून त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा हनी याने त्याची पत्नी स्वाती हिच्यामुळेच वडिलांचा मृत्यू (murder) झाल्याचा आरोप लावला आहे. स्वातीने आपल्या वडिलांना बाल्कनीतून खाली धक्का दिला असे त्याचे म्हणणे असून सध्या पोलिसांनी स्नेहाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

रिपोर्टनुसार, हनी याची आई आणि बहीण या दोघींचाही आधीच एका रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. हनी व स्नेहा यांचे नव्ह मॅरेज झाले होते, त्याच्या वडिलांनीच दोघांचे लग्न लावून दिले होते. मात्र वडिलांच्या मृत्यूनंतर हनी याने व्हिडीओ जारी करत पत्नीवरच वडिलांच्या हत्येचा आरोप लावला आहे.

या व्हिडीओमध्ये त्याने सांगितले होते की, 11 ऑगस्ट रोजी सकाळी मृत लतेश गोयल आणि स्नेहा यांच्यादरम्यान वाद झाला होता. त्यानंतर संतापलेल्या स्नेहाने त्यांना बाल्कनीतून खाली धक्का दिला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारांदरम्यान 12 ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर पत्नी स्नेहा ही सर्व दागिने आणि रोख रक्कम घेऊन फरार झाली, असा आरोपही हनी याने केला आहे.

मात्र त्यानंतर त्याच्या पत्नीचे कुटुंबिय घरी येऊन वाद घालू लागले. तर स्नेहा हिनेही पोलिसांकडे जाऊन हुंडा मागितल्याची तक्रार नोंदवली. एफआयआर झाल्यानंतरच पुढील कारवाई होईल.

काही वर्षांपूर्वीच पत्नी व मुलीचा झाला होता मृत्यू

जयपूरच्या जयसिंहपूर येथे मृत लतेश गोयल यांचे कुटुंब सुखाने रहात होते, त्यांचा हँडीक्राफ्टचा बिझनेस होता. मात्र 2011मध्ये लतेश गोयल यांची पत्नी व मुलीचा एका अपघातात मृत्यू झाल्यान ते हादरले. काही दिवसांनी या दु:खातून बाहेर येऊन लतेश व त्यांचा मुलगा हनी जगू लागले. त्यानंतर सहा महिन्यांपूर्वी फेब्रुवारी 2023 मध्ये हनी व स्नेहा यांचे लव्ह मॅरेज झाले.

सून आल्यामुळे सर्व काही ठीक होईल असं लतेश यांना वाटलं, पण उलट सून त्यांच्याशीच वाद घालू लागली. यामुळे ते दु:खी झाले आणि दारू पिऊ लागले. घटनेच्या दिवशीदेखील स्नेहा व त्यांचा काही कारणावरून वाद झाला आणि तिने त्यांना बाल्कनीतून खाली धक्का दिला. पोलिस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.