फेसबुकवर प्रपोज, आई-वडिलांना भेटवण्याच्या बहाण्याने घरी बोलावलं, 25 मित्रांकडून गँगरेप

तीन मेच्या रात्रीपासून पुढच्या सकाळपर्यंत जवळपास पंचवीस जणांनी तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. (Delhi Girl Gang raped by Facebook Friend)

फेसबुकवर प्रपोज, आई-वडिलांना भेटवण्याच्या बहाण्याने घरी बोलावलं, 25 मित्रांकडून गँगरेप
दिल्लीतील तरुणीवर 25 मित्रांकडून गँगरेप

गुरुग्राम : फेसबुकवर झालेली ओळख दिल्लीकर तरुणीला चांगलीच महागात पडली. ऑनलाईन प्रपोज करत तरुणीच्या फेसबुक फ्रेण्डने तिला आई-वडिलांना भेटवण्याच्या बहाण्याने घरी बोलावलं. मात्र भुलवून जंगलात नेत तरुणासह 25 मित्रांकडून गँगरेप करण्यात आला. अखेर नऊ दिवसांनी हिंमत करुन पीडितेने 3 मेच्या रात्रीपासून पुढच्या सकाळपर्यंत आपल्यावर झालेल्या अनन्वित अत्याचारांना पोलिसांसमोर वाचा फोडली. (Delhi Girl allegedly Gang raped brutally by 25 men including Facebook Friend in Haryana)

फेसबुक फ्रेण्डकडून प्रपोज

पीडित तरुणी दिल्लीत चार वर्षांपासून घरकाम करते. जानेवारी महिन्यात फेसबुकवर तिची ओळख सागर नावाच्या 23 वर्षीय तरुणाशी झाली. गप्पा वाढल्या आणि दोघांनी एकमेकांचे फोन नंबर एक्स्चेंज केले. मैत्री वाढली आणि एके दिवशी सागरने तिला थेट लग्नाची मागणी घातली. हरियाणातील होडाल शहरात राहणाऱ्या सागरने तिला आपल्या आई-वडिलांना भेटवण्याच्या बहाण्याने घरी बोलावलं.

जंगलात नेऊन सामूहिक अत्याचार

3 मे रोजी पीडिता दिल्लीहून होडालला गेली. मात्र घरी पालकांना भेटवण्यास नेण्याऐवजी सागरने तिला रामगड गावातील जंगलात नेलं. तिथे सागरचा भाऊ आणि काही मित्र मद्यपान करत बसले होते. पीडितेला पाहून आरोपींनी तिला मधोमध खेचले. त्यानंतर आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. रात्रीपासून पुढच्या सकाळपर्यंत जवळपास वीस जणांनी तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

दुसऱ्या दिवशी पाच जणांचा गँगरेप

पीडितेवरील अत्याचारांची मालिका एवढ्यावर थांबली नाही. दुसऱ्या दिवशी आरोपींनी तिला आकाश नावाच्या भंगार विक्रेत्याकडे नेले. तिथे तिच्यावर पाच जणांनी गँगरेप केला. सततच्या अत्याचारांनी तिची प्रकृती खालावत गेली. तेव्हा बदरपूरच्या सीमेवर तिला टाकून आरोपींनी पळ काढला. अखेर नऊ दिवसांनी हिंमत करुन पीडितेने पोलिसात तक्रार दाखल केली.

मुंबईत तरुणीवर मित्रांचा सामूहिक बलात्कार

मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात गजबजलेल्या बँडस्टँड भागात 20 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तरुणीच्या बॉयफ्रेण्डसोबत आणखी दोघा मित्रांना अटक करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

बांद्रा बँडस्टँडला 20 वर्षीय तरुणीवर गँगरेप, बॉयफ्रेण्डसह तिघा जणांना अटक

पत्नीचे मसाज पार्लरमधील ग्राहकाशी विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय, पतीची भलतीच करामत

(Delhi Girl allegedly Gang raped brutally by 25 men including Facebook Friend in Haryana)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI