बांद्रा बँडस्टँडला 20 वर्षीय तरुणीवर गँगरेप, बॉयफ्रेण्डसह तिघा जणांना अटक

20 वर्षीय पीडित तरुणी बॉयफ्रेण्ड आणि दोघा तरुणांसह वांद्रे पश्चिममधील बँडस्टँड भागात फिरायला गेली होती ( gang raped at Bandra Bandstand )

बांद्रा बँडस्टँडला 20 वर्षीय तरुणीवर गँगरेप, बॉयफ्रेण्डसह तिघा जणांना अटक
Bandra Bandstand

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात गजबजलेल्या बँडस्टँड भागात 20 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तरुणीच्या बॉयफ्रेण्डसोबत आणखी दोघा मित्रांना अटक करण्यात आली आहे. (Mumbai Crime News 20 years old gang raped at Bandra Bandstand Three arrested including Boyfriend)

20 वर्षीय पीडित तरुणी आपला बॉयफ्रेण्ड आणि दोघा तरुणांसह वांद्रे पश्चिममधील समुद्र किनारी असलेल्या बँडस्टँड भागात फिरायला गेली होती. पीडिता आणि तीन आरोपी हे मानखुर्द परिसरातील रहिवासी आहेत. सर्व जण 20 ते 23 वर्ष वयोगटातील आहेत.

पीडिता आणि तिन्ही आरोपी परिचयातील

दोन बाईक्सवर हे चौघे जण 11 मे रोजी रात्री बँडस्टँडला फिरायला आले होते. तिघांनी तरुणीवर बँडस्टँड भागात समुद्राजवळ तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर चौघंही जण घरी परतले. गेल्या आठवड्यात ही धक्कादायक घटना घडली होती.

बहिणीच्या पुढाकाराने पोलिसात तक्रार

घरी गेल्यावर पीडितेने आपल्या बहिणीला पोटात दुखत असल्याचं सांगितलं. बहिणीने खोदून विचारलं असता पीडितेने आपल्यावर झालेल्या सामूहिक बलात्काराविषयी सांगितलं. बहिणीने दुसऱ्या दिवशी पीडितेला बांद्रा पोलिसात नेऊन तक्रार दिली.

तीन आरोपींना बेड्या

सुरुवातीला शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गँगरेप प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर वांद्रा पोलिसांकडे गुन्हा वर्ग करण्यात आला. बांद्रा पोलिसांनी सामूहिक बलात्कार प्रकरणी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींना 19 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास बांद्रा पोलीस अधिकारी करत आहेत. ( gang raped at Bandra Bandstand )

नागपुरात वृद्धाकडून अल्पवयीन तरुणींवर अत्याचार

ल्युडो खेळण्याचे आमिष दाखवून 55 वर्षीय आरोपीने दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये उघडकीस आला होता. आरोपीने मुलींच्या तोंडावर आणि डोळ्यांवर कापड बांधून अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. नागपूरच्या कळमना पोलिसांनी आरोपी डोलचंद चव्हाण यास अटक केली आहे.

संबंधित बातम्या :

निर्लज्जपणाचा कळस! अखेरच्या घटका मोजणाऱ्या नवऱ्यासमोरच महिलेचा कम्पाऊण्डरकडून विनयभंग

22 वर्षीय तरुणीची बर्थडेला हत्या, शारीरिक संबंधावेळी गुदमरुन मृत्यू, मारेकऱ्याचा दावा

(Mumbai Crime News 20 years old gang raped at Bandra Bandstand Three arrested including Boyfriend)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI