VIDEO : वडिलांसाठी बर्थडे केक आणायला गेलेल्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या

VIDEO : वडिलांसाठी बर्थडे केक आणायला गेलेल्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या

हत्येचा थरार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. हत्ये प्रकरणी चौघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Delhi Man stabbed to Death Video)

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Jun 03, 2021 | 12:25 PM

नवी दिल्ली : वडिलांच्या वाढदिवसानिमित्त केक आणण्यासाठी गेलेल्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. राजधानी दिल्लीमध्ये मंगळवारी 19 वर्षीय तरुणाला चौघांनी ठार मारलं. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. एकाच तरुणीवर असलेल्या प्रेमामुळे आरोपी आणि मयत तरुणामध्ये वाद होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. (Delhi Man on way to buy Cake for Father’s Birthday stabbed to Death Video caught on Camera)

केक शॉपला जाताना हल्ला

19 वर्षीय कुणालच्या वडिलांचा मंगळवारी वाढदिवस होता. वडिलांच्या वाढदिवसानिमित्त केक आणण्यासाठी कुणाल जवळच्या पेस्ट्री शॉपमध्ये निघाला होता. त्याच वेळी चौघा आरोपींनी त्याला घेराव घालून हल्ला केला. दक्षिण दिल्लीतील आंबेडकर नगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली.

भररस्त्यात तरुणावर चाकूने वार

हत्येचा थरार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. हत्ये प्रकरणी चौघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणालला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, परंतु दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद

कुणाल आरोपींच्या तावडीतून पळ काढण्याचा प्रयत्न करत असताना ते त्याला असंख्य वेळा भोसकत होते, हे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. त्याची छाती, पाठ, पोट यावर अनेक वार आहेत. आरोपींनी हत्येसाठी वापरलेल्या दोन सुऱ्या नुकत्यात ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरुन ऑर्डर करण्यात आल्या होत्या.

हत्येचं कारण पोलिसांनी सांगितलं

“चौघा आरोपींपैकी गौरव आणि कुणाल यांना एकच तरुणी आवडत होती. त्यामुळे दोघांमध्ये शत्रुत्व निर्माण झालं होतं.” अशी माहिती पोलिसांनी दिली. (Delhi Man stabbed to Death Video)

पाहा व्हिडीओ

संबंधित बातम्या :

एकतर्फी प्रेमातून 21 वर्षीय तरुणीची हत्या, कुटुंबीय नसताना घरात घुसून चाकूहल्ला

14 वर्षांच्या मुलाकडून 13 वर्षांच्या मुलीची हत्या, पोटात 114 वेळा चाकू खुपसला

(Delhi Man on way to buy Cake for Father’s Birthday stabbed to Death Video caught on Camera)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें