माकडामुळे माणसाचा मृत्यू, पाच लहान मुलांसह-पत्नी पोरकी, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

एका माकडामुळे नवी दिल्लीत एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. खरंतर चूक माकडाचीच नाही तर इतरांची देखील आहे. पण या चुकीमुळे एका निष्पाचा बळी गेला आहे.

माकडामुळे माणसाचा मृत्यू, पाच लहान मुलांसह-पत्नी पोरकी, कुटुंबावर दु:खाचा डोंगर
प्रातिनिधिक फोटो

नवी दिल्ली : एका माकडामुळे नवी दिल्लीत एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. खरंतर चूक माकडाचीच नाही तर इतरांची देखील आहे. पण या चुकीमुळे एका निष्पाचा बळी गेला आहे. विशेष म्हणजे संबंधित व्यक्ती ही एका कुटुंबातील कर्ताधर्ता होती. त्यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंब पोरकं झालं आहे. मृतक व्यक्तीचं नाव मोहम्मद कुर्बान असं नाव आहे. ते कुटुंबासह दिल्लीच्या नबी करीम येथील मारवाडी वस्तीत वास्तव्यास होते.

नेमकं काय घडलं?

मोहम्मद कुर्बान हा शाळेच्या बॅगा बनवायचं काम करायचा. या बॅग बनविण्यासाठी लागणारे सामान घेण्यासाठी तो सोमवारी (4 ऑक्टोबर) संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास घराबाहेर पडला होता. यावेळी वाटेत जात असताना किला कदम शरीफ गल्लीत त्याच्यासोबत एक विचित्रप्रकार घडला. या गल्लीतून चालत असताना मोहम्मदच्या डोक्यावर अचानक एक विट पडली. खरंतर मोहम्मदला आपल्या अंगावर विट पडेल, याची काहीच कल्पना नव्हती. ती विट अचानक पडली. त्यावेळी तो त्याच्या गडबडीत चालत होता. पण अचानक डोक्यात विट पडल्याने तो जोरात ओरडला आणि जमिनीवर बेशुद्ध पडला.

माकडाने पाणी पिण्यासाठी टाकीचं झाकण उघडल्याने दुर्घटना

संबंधित घटनेनंतर आजूबाजूचे नागरिक हैराण झाले. त्यांनी हे नेमकं कसं घडलं ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा घटनेमागील नेमकं कारण समोर आलं. मोहम्मद ज्या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत पडला तिथे दोन मजली घर होतं. या घराच्या दुसऱ्या माळ्यावर एक पाण्याची टाकी होती. या टाकीच्या झाकणावर एक विट ठेवण्यात आली होती. खरंतर ते झाकण वाऱ्याने उडून जावू नये या उद्देशाने ती विट ठेवण्यात आली होती.

मात्र, सोमवारी संध्याकाळी वेगळीच काहीतरी घटना घडली. त्या पाण्याच्या टाकीजवळ एक माकड आलं होतं त्याला पाण्याची तहाण लागली होती. त्यामुळे ते झाकण उघडण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी झाकणावर ठेवलेली विट थेट दुसऱ्या मजल्यावरुन खाली पडली. नेमकं त्याचवेळी मोहम्मद तिथून जात होता. दुर्देवाने ती विट त्याच्या डोक्यावरच पडली. त्यामुळे तो जागेवरच बेशुद्ध पडला.

पोलीस रुग्णालयात दाखल

संबंधित घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मोहम्मदला आरएमएल रुग्णालयात नेण्यात आलं. पण तिथे गेल्यावर डॉक्टरांनी मोहम्मदला तपासलं असता त्याचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं. या दरम्यान पोलिसांना या घटेनीची माहिती देण्यात आली. पोलीस तातडीने रुग्णालयात दाखल झाले. तिथे त्यांनी चौकशी केली असता सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला.

घरमालकाविरोधात गुन्हा दाखल

याप्रकरणी पोलिसांनी ज्या घराच्या छतावरुन विट मोहम्मदच्या डोक्यावर पडली त्या घराच्या घरमालकाचं नाव ओमप्रकाश असं आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. पण या घटनेमुळे मोहम्मदच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात त्याला पाच लहान मुलं आणि पत्नी आहेत. त्याच्या मृत्यूने हे सर्वजण पोरकी झाली आहेत.

हेही वाचा :

‘रोहित’ बनून ‘आफताब’कडून पाच वर्षांपासून शोषण, धर्मांतरासाठी धमकी, तरुणीचा खळबळजनक दावा

लग्नाच्या आमिषाने महिला पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कार, डोंगरीत पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI