कल्याणमध्ये पार्किंगवरून दोन गटामध्ये राडा, घटना सीसीटीव्हीत कैद

निवासी सोसायटीच्या शेजारीच हॉटेल असल्याने हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या गाड्या सोसायटीच्या बाहेरच उभ्या रहायच्या. यामुळे सोसायटीतील लोकांना त्रास होत होता.

कल्याणमध्ये पार्किंगवरून दोन गटामध्ये राडा, घटना सीसीटीव्हीत कैद
कल्याणमध्ये मंगळसूत्र चोरांचा सुळसुळाटImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 18, 2023 | 7:21 PM

कल्याण : वाहन पार्किंगवरुन झालेल्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. सोसायटीबाहेर असलेल्या हॉटेलमध्ये आलेले ग्राहक सोसायटीच्या गेटसमोर वाहन पार्क करत असल्याने सोसायटीच्या वॉचमन हटकले. यावरुन हॉटेल कर्मचारी आणि सोसायटी वॉचमनमध्ये राडा झाला. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी कल्याण खडकपाडा पोलिसांनी दोन्ही गटाच्या विरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. खडकपाडा पोलीस सीसीटीव्हीच्या मदतीने तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.

वॉचमन आणि हॉटेल कर्मचाऱ्यांमध्ये राडा

कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरात मिंगयांग हे हॉटेल आहे. या हॉटेलच्या बाजूला दोन मोठ्या सोसायट्या आहेत. या हॉटेलमध्ये येणारे ग्राहक आपली गाडी सोसायटीसमोर लावत असतात. सोसायटीच्या लोकांना याचा त्रास होत असल्याने सोसायटीचा वॉचमन नवीन थापा याचा हॉटेल कर्मचाऱ्यांसोबत गाडी पार्किंग करण्यावरून नेहमी वाद व्हायचा.

खडकपाडा पोलिसात परस्परविरोधी गुन्हा दाखल

हा वाद इतका वाढला की, बुधवारी संध्याकाळी हॉटेलमध्ये काम करणाऱ्या 10 ते 12 कर्मचाऱ्यांनी वॉचमन नवीन थापा याला मारहाण करायला सुरुवात केली. या दरम्यान नवीन थापा याने देखील हॉटेलच्या एका मारहाण केली. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्हीच्या सहाय्याने खडकपाडा पोलीस पुढील तपास सुरू केला आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.