मुरादाबादमध्ये डॉक्टर तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या, कागदावर 200 वेळा लिहिले ‘हे’ 3 शब्द

एमडीएस विद्यार्थिनी डॉ.वैशाली चौधरी हिचा मृतदेह मुरादाबादच्या तीर्थंकर महावीर विद्यापीठाच्या वसतिगृहात लटकलेल्या अवस्थेत आढळला. वैशालीच्या रुममेट विद्यार्थिनीच्या माहितीवरून महाविद्यालय व्यवस्थापनाने घटनास्थळी पोहोचून पोलिसांना माहिती दिली.

मुरादाबादमध्ये डॉक्टर तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या, कागदावर 200 वेळा लिहिले 'हे' 3 शब्द
मुरादाबादमध्ये डॉक्टर तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

मुरादाबाद : अज्ञात कारणावरुन यूपीच्या मुरादाबाद येथील तीर्थंकर महावीर विद्यापीठातील (टीएमयू) वैद्यकीय विद्यार्थिनी डॉ.वैशाली चौधरी हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वैशालीने आत्महत्येपूर्वी एका कागदावर 200 वेळा ”आशिष लव वैशाली” असे लिहिले आहे. नेमका कोणत्या कारणावरुन वैशालीने आत्महत्या केली याचा पोलीस शोध घेत असून मृत्यूसंदर्भात पोलिसांनी दोन डॉक्टर आशिष जाखर आणि समर्थ जोहरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोघांवरही कलम 306 (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार दोन्ही डॉक्टरांनी टीएमयूमधूनच औषधाचा अभ्यास केला आहे. (Doctor commits suicide by hanging in Moradabad)

वसतिगृहात फासावर लटकलेला आढळला मृतदेह

एमडीएस विद्यार्थिनी डॉ.वैशाली चौधरी हिचा मृतदेह मुरादाबादच्या तीर्थंकर महावीर विद्यापीठाच्या वसतिगृहात लटकलेल्या अवस्थेत आढळला. वैशालीच्या रुममेट विद्यार्थिनीच्या माहितीवरून महाविद्यालय व्यवस्थापनाने घटनास्थळी पोहोचून पोलिसांना माहिती दिली. यानंतर, विद्यार्थिनीचा मृतदेह फासातून काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. माहिती मिळताच विद्यार्थिनीचे कुटुंबीयही घटनास्थळी पोहोचले.

रूम पार्टनरने कॉलेज व्यवस्थापनाला दिली माहिती

वैशाली चौधरी मोदीनगर रोड हापूर येथील रहिवासी होत्या. टीएमयूचे मीडिया प्रभारी डॉ.एम.पी. सिंह यांच्या म्हणण्यानुसार, डॉ.वैशालीसोबत राहणारी प्रिया कॉलेजमधून रूमवर काही कामानिमित्त गेली, तिथे तिला दरवाजा आतून बंद असल्याचे आढळले. प्रियाने खिडकीतून डोकावून पाहिले आणि वैशाली फाशीवर लटकलेली दिसली. प्रियाच्या माहितीवरून विद्यापीठ प्रशासनाचे लोक घटनास्थळी पोहोचले. यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत, जे काही तथ्य समोर येईल त्याच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.

एका कागदावर 200 वेळा लिहिले ‘आशिष लव वैशाली’

वैशालीचे वडील प्रमोद चौधरी यांच्या तक्रारीवरून पाकब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी सांगितले की, त्यांची मुलगी आशिष जाखार आणि समर्थ जोहरी यांच्याशी नेहमी बोलत असे. या दोघांच्या कुठल्या तरी गोष्टीमुळे अस्वस्थ झाल्यानंतरच तिने आत्महत्या केली. आशिष जाखर आणि समर्थ जोहरी हे दोन्ही डॉक्टर TMU मधूनच बाहेर पडले आहेत. वैशालीच्या खोलीची झडती घेतली असता पोलिसांना रजिस्टरमधून एक कागद सापडला. हा कागद फॉइलने झाकून ठेवण्यात आला होता, ज्यावर ‘ashish love vishali’असे सुमारे 200 वेळा लिहिलेले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिषने 2019 मध्ये TMU मधूनच MBBS केले. तेव्हापासून ते दिल्लीतील एका रुग्णालयात कार्यरत आहेत. पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनेचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. एसपी सिटीने सांगितले की, मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. (Doctor commits suicide by hanging in Moradabad)

इतर बातम्या

पतीचा राग आला अन् घर सोडले; महिलेवर आठवडाभर 5 जणांकडून सामूहिक बलात्कार

दारुडा बसमध्ये करीत होता छेडछाड, भर रस्त्यात महिलेने अशी घडवली अद्दल

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI