कुत्रा चावल्याच्या रागातून कुत्र्याचा जीव घेतला, डोंबिवलीत आरोपी तरुणाला अटक

कुत्रा चावल्याच्या रागातून कुत्र्याचा जीव घेतला, डोंबिवलीत आरोपी तरुणाला अटक
Dog Killer Youth Arrested

कुत्रा चावला म्हणून एका तरुणाने कुत्र्यालाच जीवे मारल्याची धक्कादायक घटना घडली होती (Youth Arrested In Case Of Killing Dog).

Nupur Chilkulwar

|

Feb 24, 2021 | 12:11 PM

डोंबिवलीत : कुत्रा चावला म्हणून एका तरुणाने कुत्र्यालाच जीवे मारल्याची धक्कादायक घटना घडली होती (Youth Arrested In Case Of Killing Dog). याप्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी अजय या तरुणाला अटक केली आहे (Youth Arrested In Case Of Killing Dog).

डोंबिवली येथील कोपर रोड परिसरात मिनाताई उद्यानाची देखभालीचे काम गेल्या चार वर्षांपासून अजय नायडू ही व्यक्ती करतो. उद्यानाच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी शेरु नावाचा एक कुत्रा पाळला होता. उद्यान बंद केल्यानंतर नायडू हे शेरुला उद्यानात मोकळे सोडत असत.

गेल्या 19 फेब्रुवारीला दुपारी अडीच वाजताच्या सुमारास अजय नायर नावाचा तरुण दारु पिऊन गार्डन जवळ आला होता. नायडू यांनी त्याला उद्यान बंद झाले असल्याचे सांगितले. परंतू, अजयने ते न ऐकता भिंतीवरुन उडी मारत उद्यानाच्या आत प्रवेश केला. तेव्हा तिथे असलेल्या कुत्र्याने अजयवर भुंकूला आणि अजयच्या हाताला चावा घेतला.

नायडू यांनी तात्काळ अजयला उपचारासाठी शास्त्रीनगर रुग्णालयात नेले. तेथे उपचारा दरम्यानच अजयने नायडू यांना कुत्र्याला मारुन टाकण्याची धमकी दिली होती. परंतू अजय दारुच्या नशेत असल्याने असे बोलत असेल, असे वाटल्याने नायडू यांनी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं.

मात्र, 22 फेब्रुवारीला सोमवारी रात्री नायडू हे उद्यान बंद करण्यासाठी गेले असता त्यांनी शेरुला आवाज दिला परंतू त्याचा प्रतिसाद आला नाही. त्याचवेळी नायडू यांच्या परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले की अजयने शेरुला मारुन गोणीत भरुन कचराकुंडीत टाकले आहे.

नायडू यांनी कचरा कुंडीतील गोणीत पाहिले असता त्यांना शेरु मृत अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी विष्णू नगर पोलीस ठाण्यात गुन्हा झाला होता. अखेर अजय नायरला अटक करण्यात आलं आहे.

Youth Arrested In Case Of Killing Dog

संबंधित बातम्या :

सदनिकांमध्ये वास्तव्याचा बहाण्यानं लुटमार करणाऱ्या दाम्पत्याला बेड्या, 19 ठिकाणच्या चोरीची कबुली!

मुंबई, ठाण्यासह इतर ठिकाणी चोरट्यांचा धुमाकूळ, मोठ्या शिताफीने पोलिसांनी मुसक्या आवळल्या

पुण्यात पार्किंगमध्ये चोरांचा चाकूहल्ला, कारचालकाने स्वतःच्या रक्तानेच जमिनीवर लिहून ठेवलं…

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें