AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik Crime : 5 महिन्यांपूर्वीच गृहप्रवेश, सासरी आली.. 7 पानी चिठ्ठी लिहीत नववधूने संपवलं आयुष्य !

नाशिकमध्ये नवविवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. पती, सासू आणि नणंदेकडू, चारित्र्यावर संशय, हुंड्याची मागणी अशा अनेक कारणांमुळे तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू होता. मृत्यूपूर्वी तिने ७ पानांची चिठ्ठी लिहून आपला अनुभव मांडला, ज्यात या अन्यायाचा पर्दाफाश झाला.

Nashik Crime : 5 महिन्यांपूर्वीच गृहप्रवेश, सासरी आली.. 7 पानी चिठ्ठी लिहीत नववधूने संपवलं आयुष्य !
क्राईम न्यूज
| Updated on: Nov 27, 2025 | 11:33 AM
Share

आधी पुण्याची वैष्णवी हगवणे, नंतर मुंबईतील गौरी गर्जे आणि आता नाशिकमध्येही एका नववधूने सासरच्या छळाला कंटाळून तिचं अनमोल आयुष्य संपवून टाकलं. तब्बल 7 पानांची चिठ्ठी लिहीत एका नवविवाहीत महिलेने टोकाचं पाऊल उचलंत जीवन संपवलं. पतीसह सासरच्या नातेवाइकांकडून सततच्या होणाऱ्या छळाला कंटाळून बुधवारी राहत्या घरी विष प्राशन करत तिने आत्महत्या केली. यामुळे प्रचंड खळबळ माजली असून गेल्या काही महिन्यांत महिलांविरोधातील अत्याचारात वाढ होताना दिसत आहे. त्यापायी कित्येक महिलांना जीव गमवावा लागला असून आता नाशिकमधील या घटनेने प्रचंड संताप व्यक्त होत आहे. मृत्यूपूर्वी तिने लिहीलेली 7 पानांची चिठ्ठी वाचून तिच्यावर होणारा अन्याय, तिला होणारा त्रास पाहून कोणाच्याही डोळ्यात अश्रू तरळतील. हा बापू डावरे ऊर्फ नेहा संतोष पवार (२४, रा. हिरावाडी), असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

चिठ्ठी लिहून केलं विष प्राशन

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मृत महिलेचा विवाह अवघ्या 5 महिन्यांपूर्वीच झाला होता. हळद लावून ती माहेरहीन लग्न करून सासरी आली, गृहप्रवेश झाला आणि तिथेच तिच्या छळाला सुरूवात झाली. पाच महिन्यांपूर्व जून महिन्यात संतोष पवार नामक युवकासोबत तिचं लग्न झालं. मात्र या विवाहानंतर तिचा पती, सासू, तसेच नणंदेकडून विविध कारणांनी शारीरिक-मानसिक छळ करण्यात आल्याचं तिने तिच्या चिठ्ठीत नमूद केलं आहे. ती माहेरच्या लोकांशी फोनवर गप्पा मारते, असे सांगून तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यात आला.

एवढंच नव्हे तर कौमार्य चाचणीसारखा क्रूर प्रकार पती व नणंदेकडून करण्यात आल्याचा आरोपही मृत महिलेने तिच्या चिठ्ठीत केला आहे. माहेरुन पैसे आण अशी मागणी सासरचे करत होते. लग्नाआधी नवऱ्याचेएका तरुणीशी प्रेमसंबंध होते, त्याचे अश्लील फोटो दाखवून मानसिक त्रास देऊ लागला असा आरोपही तिने केला आहे. पती, सासू आणि नणंदेकडून वारंवार चारित्र्यावर संशय घेतला जायचा, त्याच मानसिक त्रासाला कंटाळून नेहा पवार हिने लग्नानंतर 5-6 महिन्यांतच जीवनाला कंटाळून आयुष्य संपवलं. अखेर हा त्रास सहन न झाल्याने बुधवारी तिने टोकाचं पाऊल उचललं. आधी 7 पानांची चिठ्ठी लिहीत त्यात सगळी आपबिती कथन केली आणि त्यानंतर तिने घरातच विषप्राशन करून तिचं आयुष्य संपवलं. ही चिठ्ठी सासरच्यांच्या हाती लागली तर पुरावे नष्ट करतील म्हणून विवाहितेनं चिठ्ठी लिहून त्याचे फोटो भावाला पाठवल्याचंही उघड झालं आहे.

या विवाहित महिलेच्या च्या सुसाइड नोटवरून नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.