AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दारूच्या नशेत रिक्षाचालकाचे भयानक कृत्य ! महिला कॉन्स्टेबलला 200 मीटर फरफटत नेलं

साताऱ्यात एका दारू प्यायलेल्या ऑटोचालकाने एका महिला पोलिस अधिकाऱ्याला धडक दिली आणि लांबवर फरपटत नेलं. या घटनेचा भयानक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

दारूच्या नशेत रिक्षाचालकाचे भयानक कृत्य ! महिला कॉन्स्टेबलला 200 मीटर फरफटत नेलं
मद्यधुंद रिक्षाचालकाचे भयानक कृत्य
| Updated on: Aug 19, 2025 | 1:28 PM
Share

साताऱ्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. दारुच्या नशेत असलेल्या बेभान झालेल्या रिक्षाचालकाने आधी अनेक वाहनांना धडक दिली. एवढंतच नव्हे तर त्यानंतर त्याने एका महिला पोलिसाला रिक्षातून फरपटत नेल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. रिक्षाचालकाने त्या महिला कॉन्स्टेबलला कमीत कमी 200 मीटर फरपटत नेलं. हा संपूर्ण थरार तेथील दुकानांमधील सीसीटीव्हीत कैद झाला असून त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. सातारा पोलीसांनी आरोपी रिक्षाचालकाला अटक केली आहे.

नेमकं काय झालं ?

दारू प्यायलेल्या, नशेत असलेल्या रिक्षाचालकाने मोळाचा ओढा परिसरात अनेक वाहनांना धडक दिल्याची माहिती वाहतूक पोलिसांना मिळाली. त्यानंतर भाग्यश्री जाधव या महिला पोलीस कॉन्स्टेबल यांनी रिक्षाचा पाठलाग करत या रिक्षा चालकाला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र रिक्षा चालकाने कॉलर पकडत हिसका देऊन त्यांना खाली पाडलं. मात्र त्यामुळे त्या महिला कॉन्स्टेबल पोलिसाच्या रेनकोट रिक्षाचा मागील अँगल मध्ये अडकल्याने रिक्षासोबत संबंधित महिला पोलीस कॉन्स्टेबल 200 मीटर हून अधिक फरफटत गेल्याची धक्कादायक घटना घडली. हा संपूर्ण थरार साताऱ्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणजेच खंडोबाचा माळ येथून मनाली कॉर्नर पर्यंत असणाऱ्या दुकानांमधील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

2-3 लोकांना धडकून रिक्षाचालक पळाला

सोमवारी संध्याकाळी 5.30 च्या सुमारास खंडोबाचा मॉल परिसरात एका रिक्षाचालकाने भरधाव वेगाने गाडी चालवत असताना ही घटना घडली. त्याने वाटेत 2-3 जणांना धडक दिली आणि तरीही तो थांबला नाही. ही घटना वाहतूक शाखेत तैनात असलेल्या महिला पोलीस अधिकारी भाग्यश्री जाधव यांना कळवण्यात आली. त्यांनी तात्काळ जबाबदारी स्वीकारली आणि रिक्षा थांबवण्यासाठी चौकात त्या उभ्या राहिल्या.

रिक्षावाल्याने नेलं फरपटत

पण रिक्षा त्यांच्याकडे येताच त्यांनी चालकाला थांबण्याचा इशारा केला. रिक्षा थांबली नाही तेव्हा भाग्यश्री जाधवने एका वाटसरूची दुचाकी थांबवली आणि मागे बसून रिक्षाचा पाठलाग सुरू केला. काही वेळातच त्यांनी रिक्षा पकडण्याचा प्रयत्न केला. पण त्याच त्याच दरम्यान, रिक्षाचालकाने त्या पोलीस कॉन्स्टेबलचा हात झटकला. त्यानंतर तिचा रेनकोट रिक्षाच्या बंपरमध्ये अडकला आणि तिला रस्त्यावर ओढली गेली. हे पाहून तिथे उपस्थित असलेले लोक रस्त्यावर ओरडू लागले. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका तरुणाने धाडस दाखवले. त्याने धावत जाऊन रिक्षाचे हँडल धरले आणि पूर्ण ताकदीने ते थांबवले, तेव्हाच महिला पोलिस अधिकाऱ्याची सुटका झाली.

महिला कॉन्स्टेबल जखमी

या घटनेत महिला पोलीस यांना हाताला आणि डोक्याला दुखापत झाली असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान अपघातास जबाबदार असेलला आणइ बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्या या बेभान रिक्षा चालकाला संतप्त नागरिकांनी पकडून चोप दिला. घटनेची माहिती मिळताच सातारा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपी चालकाला ताब्यात घेतले. सध्या आरोपीवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा