AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बुलडाणाच्या बसस्थानकावर दारुड्याचा अडीच तास धिंगाणा, चौकशी कक्षाच्या काचांची तोडफोड, संगणकाचंही नुकसान

बुलडाणा येथील बसस्थानकावर अनेक वेळा दारुडे धिंगाणा घालत असतात. पण आज एका दारुड्याने तर कहरच केला.

बुलडाणाच्या बसस्थानकावर दारुड्याचा अडीच तास धिंगाणा, चौकशी कक्षाच्या काचांची तोडफोड, संगणकाचंही नुकसान
बुलडाणाच्या बसस्थानकावर दारुड्याचा अडीच तास धिंगाणा, चौकशी कक्षाच्या काचांची तोडफोड
| Edited By: | Updated on: Jul 19, 2021 | 9:02 PM
Share

बुलडाणा : बुलडाणा येथील बसस्थानकावर अनेकवेळा दारुडे धिंगाणा घालत असतात. पण आज एका दारुड्याने तर कहरच केला. तब्बल अडीच तास त्याचा धिंगाणा सुरू होता. त्याच्यापुढे फक्त महामंडळाचे कर्मचारीच नव्हे, तर पोलीस प्रशासनदेखील हतबल दिसून आले. या दारुड्याने चौकशी कक्षाच्या काचा फोडल्या. तसेच तेथील संगणकही फेकून दिले. त्यामुळे नियंत्रण कक्षातून चालणारे काम बऱ्याच वेळ थांबले होते. दारुड्याचा हा धिंगाणा पाहण्यासाठी बसस्थानकावर मोठी गर्दी जमली होती.

दारुच्या नशेत पत्नीला मारहाण करत धिंगाणा

बुलडाणा शहरातील मिलिंद नगर भागात राहणारा 55 ते 60 वर्षीय सुरेश अवसरमोल आपल्या बायकोला हतेडी या गावी बसने सोडण्यासाठी बुलडाणा बसस्थानकावर आला होता. यावेळी तो दारुच्या नशेत होता. काही कारणावरून सुरेश आणि त्याच्या बायकोमध्ये वाद झाला. यावेळी सुरेशने आपल्या बायकोला बसस्थानकावरच मारहाण केली. ही मारहाण पाहून काही लोक वाद सोडविण्यासाठी गेले. तर सुरेशने त्यांनाही शिवीगाळ केली. त्यामुळे काही लोकांनी सुरेशला मारहाण केली.

नियंत्रण कक्षाच्या काचा फोडल्या

यानंतर सुरेश रागाच्या भरात दिसेल त्याला शिवीगाळ करत नियंत्रण कक्षासमोर आला. त्याने तिथेच धिंगाना घालत नियंत्रण कक्षाच्या काचा फोडल्या. तसेच तिथले कम्प्युटर सुद्धा फेकून दिले. बसस्थानकावर हा धिंगाणा सुरू असताना बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात घटनेची माहिती देण्यात आली. काही वेळातच पोलीस कर्मचारी बसस्थानकावर पोहोचले आणि त्यांनी सुरेश अवसरमोलला समजविण्याचा प्रयत्न केला.

पोलिसात गुन्हा दाखल

नियंत्रण कक्षासमोर उभारण्यात आलेल्या रॅलिंगमध्ये हैदोस घालणाऱ्या सुरेशला काही युवकांच्या मदतीने बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण सुरेश कोणालाही जुमानत नव्हता. तो युवकांच्या तावडीतून सुटून पुन्हा रेलिंगमध्ये जाऊन बसला. तो पुन्हा धिंगाणा करू लागला. जवळपास दोन तास सुरेशचा बसस्थानकावर धिंगाणा सुरूच होता. याप्रकरणी पोलिसात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. एसटी महामंडळाचे झालेले नुकसान देण्यास सुरेशच्या नातेवाईकांनी आश्वासन दिले असल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा : चौकशीला सहकार्य नाही, पोलिसांवरच थेट हल्ले, मुजोर नायजेरिन ड्रग्स माफियांचं करायचं काय? NCB अधिकाऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.