खडसेंना पुढील सुनावणीपर्यंत अटक करणार नाही; ईडीची कोर्टाला माहिती

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी त्यांच्या विरोधात ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, या मागणीसाठी मुंबई हायकोर्टात याचिका केली आहे. (ed will not arrest eknath khadse till next hearing date)

  • सुधाकर काश्यप, टीव्ही 9 मराठी, डिजीटल टीम
  • Published On - 18:43 PM, 25 Jan 2021
खडसेंना पुढील सुनावणीपर्यंत अटक करणार नाही; ईडीची कोर्टाला माहिती
eknath khadse

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी त्यांच्या विरोधात ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, या मागणीसाठी मुंबई हायकोर्टात याचिका केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी झाली. सुनावणी पूर्ण होऊ न शकल्याने आता पुढील सुनावणी 28 जानेवारी रोजी होणार आहे. दरम्यान, तो तोपर्यंत आपण खडसे यांना अटक करण्याची कारवाई करणार नाही, अस ईडीच्या वकिलांनी हायकोर्टाकडे स्पष्ट केलं.त्यामुळे एकनाथ खडसे यांना 28 जानेवारी पर्यंत दिलासा मिळाला आहे. (ed will not arrest eknath khadse till next hearing date)

एकनाथ खडसे यांच्या विरोधात ईडीने ECIR दाखल केला आहे. खडसे यांच्या विरोधात पुण्यातील बंड गार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता. मंत्री असताना खडसेंनी कोट्यवधी रुपयांची जमीन लाटल्याचा त्यांच्यावर आरोप झाला होता. याबाबत गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास पुणे एसीबीने केला होता. यानंतर तपास झाल्यावर याबाबत गुन्हा घडला असल्याचं आढळून येत नसल्याने एसीबीने क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. आता याच प्रकरणाचा ईडीने तपास सुरू केला आहे. याप्रकरणी ईडीने खडसे यांची चौकशीही केली. मात्र, त्यांना चौकशीसाठी पुन्हा यावं लागेल, अस सांगण्यात आलं होतं. यामुळे ईडी आपल्याला अटक करू शकते, असं खडसे यांना वाटल. यामुळे त्यांनी मुंबई हायकोर्टात आपल्या विरोधात ईडीने दाखल केलेला ECIR रद्द करावा या मागणीसाठी याचिका केली आहे. आज त्यावर सुनावणी झाली.

ईडीचा दावा

यावेळी ईडीतर्फे अॅडिशनल सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी युक्तीवाद केला. ईडीने ECIR दाखल केला आहे. हा चौकशीचा भाग आहे. हा काही गुन्हा नाही. ईडीला चौकशीला बोलवायचा अधिकार आहे. समन्स पाठवलं म्हणजे तो व्यक्ती आरोपी आहे असं होतं नाही. असा युक्तिवाद अनिल सिंग यांनी केला.

खडसेंच्या वकिलाचा युक्तिवाद

त्यावर खडसे यांचे वकील आबाद पोंडा यांनी युक्तिवाद केला. कस्टम, फेमा जसा कायदा आहे तसाच मनी लॉन्ड्रिंग हा सुद्धा कायदा आहे. या कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीला बोलावता येत. समन्स पाठवलं म्हणून तो आरोपी होत नाही हेही खरं आहे. पण एखादा व्यक्ती तपासात सहकार्य करत नाही, या मुद्यावर ईडी एखाद्याला अटक करू शकते. तशी कायद्यात तरतूद आहे. याच मुळे आम्ही ECIR रद्द करण्याची मागणी केली आहे, असा युक्तिवाद अॅड. पोंडा यांनी केला. दरम्यान, कामकाजाची वेळ संपल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली. तसेच ईडीकडून पुढील सुनावणीपर्यंत खडसेंना अटक न करण्याची माहिती कोर्टाला देण्यात आल्याने खडसे यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. (ed will not arrest eknath khadse till next hearing date)

 

संबंधित बातम्या:

खडसेंवरील गुन्हा रद्द होणार?; आज कोर्टात सुनावणी

भोसरी भूखंड प्रकरणात नोटीस, 30 डिसेंबरला ईडी कार्यालयात हजर राहणार, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया

एकनाथ खडसे यांना कोरोना, खासगी चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह

भोसरी भूखंड प्रकरणी खडसेंची ईडी चौकशी, तारीख आणि वेळ ठरली

(ed will not arrest eknath khadse till next hearing date)