अर्धवट जळालेली तरुणी, बाजूला कपड्यांची बॅग आणि सायकल, मृतदेहाजवळच्या चिठ्ठीने संशय वाढवला

अकोला शहरजवळील यावलखेड शिवारात एका सतरा ते अठरा वर्षीय तरूणीचा मृतदेह जळालेल्या स्थितीत आढळलाय. (akola young girl dead body half burnt)

अर्धवट जळालेली तरुणी, बाजूला कपड्यांची बॅग आणि सायकल, मृतदेहाजवळच्या चिठ्ठीने संशय वाढवला
सांकेतिक फोटो

अकोला : अकोला शहरजवळील यावलखेड शिवारात एका सतरा ते अठरा वर्षीय तरूणीचा मृतदेह जळालेल्या स्थितीत आढळलाय. अर्धवट जळालेल्या स्थितीत मृतदेह आढळल्यामुळे परिसरात तणावाची स्थिती आहे. मृतदेहाशेजारी कपड्यांची बॅग, सायकल आणि चिठ्ठी मिळाल्यामुळे ही हत्या की आत्महत्या याबाबत तर्क लावले जात आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत तरुणी निंबी मालोकार येथील रहिवाशी आहे. (Eighteen  year old young girl half burnt dead body found in Akola)

चिठ्ठीमध्ये आईवडिलांची माफी

मिळालेल्या माहितीनुसार तसेच तरुणीचा मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत आढळल्यामुळे गावात खळबळ उडाली. या प्रकाराची माहिती होताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. यावेळी पोलिसांना मृतदेहासोबत एक चिठ्ठी सापडली आहे. या चिठ्ठीमध्ये ‘आता माझ्या लग्नासाठी खर्च करावा लागणार नाही’, असं लिहलंय. तसेच, या चिठ्ठीमध्ये आई-वडिलांची माफी मागत आत्महत्या करीत असल्याचं नमूद करण्यात आलंय.

कपड्यांनी भरलेली बॅग, सायकलीमुळे संशय वाढला

अकोला तालुक्यातील यावलखेड येथील एका शेतात या 18 वर्षीय तरुणीचा अर्धवट जळालेल्या स्थितीत मृतदेह सापडला. या मृतदेहाशेजारच्या चिठ्ठीत आता लग्नासाठी खर्च करावा लागणार नाही, असं लिहलेलं आहे. प्राथमिक दृष्टीकोनातून या तरुणीने आत्महत्या केल्याचं दिसत असलं तरी मृतदेहाशेजारी अनेक संशयास्पद वस्तू सापडल्या आहेत. तरुणीच्या मृतदेहाशेजारी कपड्यांनी भरलेली एक बॅग आढळली आहे. तसेच रस्त्याच्या कडेला एक सायकल उभी असल्याचे पोलिसांना आढळले आहे. मृतदेहाशेजारी या साऱ्या गोष्टी सापडल्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आहे. ही तरुणी यावलखेड शिवारात कशी आली?, तिला जाळले की स्वत: जाळून घेतलं?, असे अनेक प्रश्न पोलिसांसमोर उभे राहिले आहेत.

दरम्यान, तरुणीच्या मृतदेहाशेजारी कपड्यांची बॅग, सायकल आणि चिठ्ठी आढळल्यामुळे अनेक तर्क लावले जात आहेत. या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ यांच्यासह स्थानिक पोलीस करीत आहे.

इतर बातम्या :

100 छापे, 102 दिवस पाठलाग, वेशांतर, रुमला लॉक लावून वास्तव्य, बाळे बोठेच्या अटेकमागील थरार

बलात्काराच्या आरोपीला 20 वर्ष कारावास, पोलिसांनी नराधमाला कोर्टातून दारु पार्टीला नेलं

आता संयम नाही, जगाला गुड बाय करण्याची वेळ आली, सचिन वाझे यांचं धक्कादायक व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस

(Eighteen  year old young girl half burnt dead body found in Akola)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI