विरारमध्ये माथेफिरुचा घरात घुसून कुटुंबावर हल्ला करुन आत्महत्येचा प्रयत्न, पाच जण जखमी

विरारच्या खाणीवडे गावात एका माथेफिरु तरुणाने घरात घुसून कुटुंबावर (Youth Attack On A Family) प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

विरारमध्ये माथेफिरुचा घरात घुसून कुटुंबावर हल्ला करुन आत्महत्येचा प्रयत्न, पाच जण जखमी
प्रातिनिधिक फोटो

विरार : विरारच्या खाणीवडे गावात एका माथेफिरु तरुणाने घरात घुसून कुटुंबावर (Youth Attack On A Family) प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात पाच जण जखमी झाले आहेत. इतकंच नाही तर माथेफिरु तरुणाने हल्ल्यानंतर स्वत:ला बाथरुममध्ये बंद करुन हाताची नस कापून घेऊन स्वत:लाही जखमी करुन घेतले आहे. स्थानिक गावकऱ्यांंनी माथेफिरुला सुरक्षित पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सध्या याबाबत विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून पोलीस तापासानंतर या हल्ल्याचे कारण स्पष्ट होणार आहे. (Virar Youth Attack On A Family And Tried To Suicide Five Injured).

नेमकं काय घडलं?

विरारच्या खाणीवडे गावात आज सकाळी 9 ते 10 च्या सुमार एक माथेफिरु तरुण एका घरात घुसला. घरात घुसून त्याने कुटुंबावर हल्ला केला. माथेफिरु तरुणाच्या हल्ल्यात 5 जण जखमी झाले आहेत. तर माथेफिरु तरुणानेही स्वत:च्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. हल्ल्याचं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेला नाही.

खाणीवडे गावातील राजेश कमलाकर तरे यांच्या कुटुंबावर हा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात तरे यांच्या दोन मुली, 2 पाहुणे आणि भावाजयी असे पाच जण जखमी झाले आहेत. यातील एक मुलगी गंभीर जखमी आहे.

तरे यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीचे दोन दिवसांपूर्वीच निधन झाल्याने दुखवट्यासाठी घरी पाहुणे आले होते. आज सकाळी तरे हे दुखवटा असणाऱ्या घरी गेले होते. तर त्यांच्या स्वत:च्या घरी त्यांच्या दोन मुली आणि बाहेरगावावरुन आलेले रमेश आणि रेखा तरे हे घरी होते.

सकाळी 9 ते 10 च्या सुमारास 22 ते 24 वयोगटातील एका अनोळखी तरुणाने काही कळण्याच्या आताच घरात घुसून पहिले मुलीवर धारदार हत्याराने हल्ला करायला सुरुवात केली. हल्ल्याची घटना लक्षात येताच घरातील रमेश आणि रेखा तरे यांनी तात्काळ त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांच्यावरही हत्याराने वार केले. त्यानंतर राजेश यांच्या भावजयी अंजली तरे यांनी तात्काळ दार उघडून आरडाओरडा केला असता त्याच्यावर ही वार करण्यात आला आहे.

स्थानिक नागरिक जमा होत असल्याचे पाहून माथेफिरु तरुणाने स्वत:ला त्यांच्याच घरातील बाथरुममध्ये बंद करुन, हाताची नस कापून स्वत:लाही जखमी केले आहे. पण, लोकांनी पोलिसांना तात्काळ बोलावून त्याला विरार पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. सध्या विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन, या हल्ल्याचा तपास सुरु आहे

Virar Youth Attack On A Family And Tried To Suicide Five Injured

संबंधित बातम्या :

नोकरीच्या बहाण्याने अधिकाऱ्याकडून शरीरसुखाची मागणी, लातुरातील प्रकरणात नवा ट्विस्ट

अनुकंपा तत्त्वावर शिक्षिकेच्या नोकरीसाठी शरीरसुखाची मागणी, लातुरात अधिकाऱ्यावर गुन्हा

Published On - 2:07 pm, Sat, 13 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI