AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाप रात्री शेतात झोपायला गेला, मुलगा सकाळी चहा घेऊन गेला; जे समोर दिसलं त्याने…

शेतात झोपायला गेलेल्या एका शेतकऱ्याची अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा शेतकरी रात्री शेतात झोपायला म्हणून गेला होता. सकाळी जेव्हा त्याचा मुलगा शेतात गेला तेव्हा ही धक्कादायक घटना उघड झाली.

बाप रात्री शेतात झोपायला गेला, मुलगा सकाळी चहा घेऊन गेला; जे समोर दिसलं त्याने...
farmer killedImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 21, 2023 | 9:49 AM
Share

चंदीगड : कुणाचं मरण कधी आणि कुठे येईल याची काही शाश्वती नाही. मृत्यूला केवळ निमित्त लागतं. तुम्ही घराबाहेर पडता. पण परत याल याची काही शाश्वती नसते. कारण काळ कधी कुणावर घाला घालेल याची काही शाश्वती नसते. एका गरीब शेतकऱ्याच्या बाबतही असंच घडलंय. दिवसभर काबाड कष्ट केल्यानंतर तो रात्री शेतात झोपण्यासाठी गेला. परत आलाच नाही. आली ती त्याची बॉडी. या धक्कादायक घटनेने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे रडून रडून हाल होत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

हरियाणाच्या पलवलच्या घरोट गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. एका शेतकऱ्याचा झोपेतच खून केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच हथीनचे डीएसपी सुरेश भडाना यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेतली. घरोट येथील रहिवासी पुष्पेंद्र यांनी पोलिसांकडे ही तक्रार केली होती. पुष्पेंद्र याच्या म्हणण्यानुसार, त्याचे वडील प्रल्हाद नेहमी शेतात झोपायला जातात. त्यानुसार सोमवारी रात्री 11 वाजता ते घरातून शेतात झोपायला गेले. मंगळवारी सकाळी जेव्हा मी वडिलांसाठी चहा घेऊन शेतात गेलो तेव्हा त्याचे वडील खाटेवर मृतावस्थेत असल्याचं आढळून आलं. कुणी तरी त्यांचा गळा कापल्याने खाटेवर रक्ताचे सडे पडले होते.

कुटुंबीयांचा रास्ता रोको

प्रल्हाद यांच्या शरीरावर प्रचंड जखमा होत्या. पोलिसांना या घटनेची माहिती दिली गेली, त्यानुसार पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह पलवल येथील नागरिक रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. या हत्येमुळे प्रल्हाद याचे नातेवाईक संतप्त झाले. त्यांनी मिडकौला महामार्गावर आंदोलन केलं. ठिय्या आंदोलन करत त्यांनी रस्ता रोको केला. त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली होती.

आरोपींचा शोध नाही

पोलिसांनी कुटुंबीयांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू केला आहे. मात्र, आरोपींचा अजून शोध लागलेला नाही. तसेच प्रल्हादची हत्या का करण्यात आली? त्यामागे काय कारण आहे? याचाही शोध लागलेला नाही. शिवाय प्रल्हादची गावातील कुणाशीच दुश्मनी नसल्याची माहिती समोर आल्याने त्याच्या हत्येचा उलगडा करणं पोलिसांसमोर आव्हान बनलं आहे.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी