यवतमाळमध्ये कुख्यात ड्रग्स तस्कर महिलेसह 4 जणांना अटक; तब्बल 1 क्विंटल गांजा जप्त

विवेक गावंडे

| Edited By: |

Updated on: Aug 18, 2021 | 10:49 PM

जिल्ह्यातील नेर तालुक्यातील झोंबाडी (बाळेगाव) येथे काल (17 ऑगस्ट) मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून गांजा तस्करी करणाऱ्या महिलेसह चार जणांना अटक केली.

यवतमाळमध्ये कुख्यात ड्रग्स तस्कर महिलेसह 4 जणांना अटक; तब्बल 1 क्विंटल गांजा जप्त
YAVATMAL DRUG
Follow us

यवतमाळ : जिल्ह्यातील नेर तालुक्यातील झोंबाडी (बाळेगाव) येथे काल (17 ऑगस्ट) मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून गांजा तस्करी करणाऱ्या महिलेसह चार जणांना अटक केली. त्यांच्याकडून तब्बल 31 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यत आला. यातील एक आरोपी पसार होण्यात यशस्वी झाला. नेर तालुक्यात एवढ्या मोठ्या स्तरावर गांजाच्या तस्करी केली जात असल्यामुळे येथे खळबळ उडाली आहे. पथकाने दिलेल्या माहीतीनुसार ही जिल्ह्यातील 5 वर्षातील सर्वात मोठी कारवाई आहे. (female cannabis smuggler and other four accused arrested in yavatmal)

कुख्यात गांजातस्कर महिला येत असल्याची मिळाली माहिती 

नेर तालुक्यात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जात आहे. या गांजातस्करीचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांनी तयारी केली होती. याच गांजातस्करीबाबत पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. मिळालेल्या माहीतीनुसार सुलतानपूर येथील कुख्यात गांजातस्कर महिला गांजा देण्यासाठी झोंबाळी येथे येत असल्याचे पोलिसांना समजले.

एकूण 12 पोत्यांत गांजा भरला

त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे पोलीस निरक्षक प्रदीप परदेशी व सहाय्यक पोलीस निरक्षक विवेक देशमुख यांनी कारवाई केली. त्यानंतर एलसीबी पथकाने काल रात्री 10 वाजता एक ईनोव्हा घरासमोर पकडली. यावेळी गांजातस्कर महिलेही बेड्या ठोकण्यात आल्या.  पथकाने इनोव्हा कार व घराची झडती घेतली असता तब्बल 1 क्विंटल 90 किलो गांजा पकडला केला. हा गांजा एकूण 12 पोत्यांत भरण्यात आला होता. पकडण्यात आलेल्या गांजाची एकूण किंमत 22 लाख 50 हजार आहे. तर जप्त करण्यात आलेल्या ईनोव्हाची किंमत 9 लाख रूपये आहे.

31 लाख 50 हजारांचा ऐवज पोलिसांनी घेतला ताब्यात

या कारवाईत 31 लाख 50 हजारांचा ऐवज गुन्हे शाखेने ताब्यात घेतला आहे. यात एका महिलेसह याशीन अली मूजफ्फर अली, मो. साहील मो. अकील, फईम करीम शेख ईत्यादींना पोलिसांनी अटक केली. तर घटनास्थळावरून खलीद शेख उर्फ गूड्डू लूकमान शेख हा पसार होण्यात यशस्वी ठरला. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर अमली पदार्थ कायद्यानूसार कलम 20, 22 ,25, 29 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.

इतर बातम्या :

पत्नीला सिगरेटचे चटके, अघोरी प्रयोगाने छळ, अखेर पुण्याचे प्रसिद्ध उद्योजक गायकवाड पिता-पुत्रांना बेड्या, पोलिसांची मोठी कारवाई

दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई, आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा मुख्य सूत्रधार दिल्लीत जेरबंद

रॅगिंग की मानसिक अस्थैर्य, नाशिकमधील डॉक्टरच्या संशयास्पद मृत्यूचं नेमकं कारण काय?

(female cannabis smuggler and other four accused arrested in yavatmal)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI