रॅगिंग की मानसिक अस्थैर्य, नाशिकमधील डॉक्टरच्या संशयास्पद मृत्यूचं नेमकं कारण काय?

मिळालेल्या माहितीनुसार मृत विद्यार्थी डॉक्टर स्वप्नील शिंदे याने काही महिन्यापूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तसेच या विद्यार्थी डॉक्टरवर मानसोपचारदेखील सुरु होते. तर दुसरीकडे आमच्या मुलाचा मृत्यू हा रॅगिंगमुळेच झाला आहे, असा आरोप मृत डॉक्टरच्या नातेवाईकांनी केला आहे.

रॅगिंग की मानसिक अस्थैर्य, नाशिकमधील डॉक्टरच्या संशयास्पद मृत्यूचं नेमकं कारण काय?
NASHIK DOCTOR
Follow us
| Updated on: Aug 18, 2021 | 5:34 PM

नाशिक : आडगाव मेडिकल कॉलेजमध्ये एका विद्यार्थी डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. डॉक्टर स्वप्नील शिंदे असं या मयत डॉक्टरचं नाव आहे. या मृत्यूप्रकरणाशी निगडीत आता नवनवी माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत विद्यार्थी डॉक्टर स्वप्नील शिंदे याने काही महिन्यापूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तसेच या विद्यार्थी डॉक्टरवर मानसोपचारदेखील सुरु होते. तर दुसरीकडे आमच्या मुलाचा मृत्यू हा रॅगिंगमुळेच झाला आहे, असा आरोप मृत डॉक्टरच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणामध्ये एक सुसाईड नोटदेखील आढळून आली आहे. या सुसाईड नोटमध्ये मला काही वरिष्ठ मुलींचा त्रास होता असं नमुद करण्यात आलंय. (nashik doctor was tortured by his senior girl or was he mentally ill what is exact cause of his death)

दोन मुलींच्या रॅगिंगमुळे डॉक्टरची आत्महत्या

मृत विद्यार्थी डॉक्टर गायनॅकॉलॉजीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. मृत स्वप्निल याची दोन मुलींनी सतत रॅगिंग करण्याचा प्रयत्न केला केला. त्यामुळे या सगळ्या प्रकाराला घाबरल्यामुळे आमच्या मुलाने आत्महत्या केली आहे, असा आरोप मृत डॉक्टरच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच रॅगिंग करणाऱ्या दोन मुलींसह कॉलेज प्रशासनावर गुन्हा दाखल करावा अशी मागणीदेखील यावेळी मृत विद्यार्थी डॉक्टरच्या नातेवाईकांनी केली आहे.

विद्यार्थी डॉक्टरवर मानसोपचार सुरु होते, यापूर्वी आत्महत्या करण्याचा प्रयत्न 

तर दुसरीकडे कॉलेज प्रशासनाने सर्व आरोप फेटाळले आहेत. मृत्यू झालेल्या विद्यार्थी डॉक्टरला आम्ही वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे. या डॉक्टरवर मानसोपचार सुरू होते. मानसिक स्थिती ठीक नसल्याने डॉक्टर असलेल्या विद्यार्थ्याच्या आईला आम्ही डॉक्टरसोबत हॉस्टेलमध्ये राहण्याची परवानगी दिली होती, अशी माहिती कॉलेज प्रशासनाने दिली आहे.

नेमकं सत्य काय आहे ते लवकरच बाहेर येईल

दरम्यान या घटनेनंतर मृत डॉक्टरच्या नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणाचा तपास नाशिक पोलीस करत असून, नेमकं काय सत्य आहे ते लवकरच बाहेर येईल असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

इतर बातम्या :

VIDEO : बाईकवर तिघं आले, दोघांच्या हातात बंदूक, ज्वेलर्समध्ये शिरताच मोठा गदारोळ, सीसीटीव्हीत थरार कैद

पिस्तूल आणि जिवंत काडतुसे मुंबईत विकायला आणल्या, मध्यप्रदेशच्या तस्करांना मुंबई पोलिसांनी घेरलं आणि…

आतल्या वेदनांची जखम, नैराश्याने घात, ‘छावा’ संघटनेचा तालुकाध्यक्ष, वैयक्तिक आयुष्यातील संघर्षापुढे हार, टोकाचं पाऊल

(nashik doctor was tortured by his senior girl or was he mentally ill what is exact cause of his death)

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.