विकृत डिलीव्हरी बॉयचे लिफ्टमध्ये नको ते उद्योग, फिजीओथेरपिस्टला ..

विकृत डिलीव्हरी बॉयने लिफ्टमध्ये नको ते उद्योग केल्याचा अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हायप्रोफाईल सोसायटीमध्ये एका रुग्णावर उपचार करण्यासाठी आलेल्या महिला डॉक्टरचा त्या डिलीव्हरी बॉयने लिफ्टमध्ये विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.

विकृत डिलीव्हरी बॉयचे लिफ्टमध्ये नको ते उद्योग, फिजीओथेरपिस्टला ..
Follow us
| Updated on: Jun 17, 2024 | 12:39 PM

विकृत डिलीव्हरी बॉयने लिफ्टमध्ये नको ते उद्योग केल्याचा अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हायप्रोफाईल सोसायटीमध्ये एका रुग्णावर उपचार करण्यासाठी आलेल्या महिला डॉक्टरचा त्या डिलीव्हरी बॉयने लिफ्टमध्ये विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक म्हणजे एका प्रसिद्ध फुड पार्सल कंपनीत कार्यरत असलेल्या डिलिव्हरी बॉयने हा प्रकार केला. त्या महिला डॉक्टरने मात्र न घाबरता त्या नराधमाला प्रतिकार केला पण लिफ्ट उघडताच तो नराधम तेथून पळून गेला. यशवंत धोत्रे असे या विकृत तरुणाचे नाव असून मानपाडा पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अखेर बेड्या ठोकल्यात. मात्र यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून एकच खळबळ माजली आहे.

वयोवृद्ध रुग्णावर उपचारांसाठी आल्या पण…

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्व परिसरातील एका हाय प्रोफाईल सोसायटीत हा भयानक प्रकार घडला. त्या सोसायटीमधील एका वयोवृद्ध रुग्णावर फिजिओ थेरपीची ट्रीटमेंट सुरू आहे. गेल्या काही दिवसापासून एक महिला डॉक्टर त्या रुग्णाच्या घरी येते. दोन दिवसांपूर्वी रात्री आठ वाजच्या सुमारास महिला डॉक्टरने तिची फिजीओथेरपी संपवली आणि सातव्या मजल्यावरून खाली उतरण्यासाठी ती लिफ्टमध्ये शिरली. मात्र सहावा मजला येताच लिफ्टचं दार उघडलं आणि एका प्रसिद्ध फूड पार्सल कंपनीच्या डिलीव्हरी बॉयने लिफ्टमध्ये प्रवेश केला. त्यानंतर लिफ्टचं दार बंद होताच त्या तरूणाने समोरील महिला डॉक्टरशी अंग लगट करुन गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला.

अवघ्या काही तासांच आरोपीला ठोकल्या बेड्या

अचानक झालेल्या या प्रकारामुळे ती महिला डॉक्टर प्रथम घाबरली पण तिने त्याचा जोरदार प्रतिकार केला. तिने तातडीने लिफ्टचे ग्राऊंड फ्लोअरचे बटन दाबले. लिफ्ट खाली आली आणि दार उघडलं, तेवढ्यात त्या नराधमाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्या महिला डॉक्टरने त्याला रोखण्यासाठी त्याच्या शर्टाची कॉलर पकडण्याचा आणि त्याला थांबवण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र त्या तरूणाने तिच्या हाताला जोरदार झटका दिला आणि तेथून पळ काढत तो पसार झाला. त्यानंतर पीडित महिला डॉक्टरने तातडीने मानपाडा पोलीस ठाणे गाठलं आणि तक्रार दाखल केली. या घटनेची गंभीर दखल घेत मानपाडा पोलिसांनी अवघ्या काहीत तासांतच आरोपी धोत्रे याचा शोध घेत त्याला बेड्या टाकला. तो डोंबिवली पूर्वेचाच रहिवासी असल्याचे समजते. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. मात्र एका महिला डॉक्टर सोबत झालेल्या या गैरकृत्यामुळे बरीच खळबळ माजली असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

अखेर डिस्चार्ज अन् सैफ पहिल्यांदाच आपल्या चाहत्यांसमोर...बघा VIDEO
अखेर डिस्चार्ज अन् सैफ पहिल्यांदाच आपल्या चाहत्यांसमोर...बघा VIDEO.
पालकमंत्रीपद वाटपावरून आता राष्ट्रवादीत धुसफूस, दादांचे मंत्री नाराज
पालकमंत्रीपद वाटपावरून आता राष्ट्रवादीत धुसफूस, दादांचे मंत्री नाराज.
गुलाबी शाल, बुके अन्..दादांकडे बीडच पालकमंत्रीपद, पंकजाताईकडून अभिनंदन
गुलाबी शाल, बुके अन्..दादांकडे बीडच पालकमंत्रीपद, पंकजाताईकडून अभिनंदन.
सैफ आता सेफ! चाकू हल्ल्यानंतर अभिनेत्याला 6 दिवस उपचारानंतर डिस्चार्ज
सैफ आता सेफ! चाकू हल्ल्यानंतर अभिनेत्याला 6 दिवस उपचारानंतर डिस्चार्ज.
BEED : खंडणीची मागणी, तो CCTVपाहिला? कराडसह सर्व आरोपी एका फ्रेममध्ये
BEED : खंडणीची मागणी, तो CCTVपाहिला? कराडसह सर्व आरोपी एका फ्रेममध्ये.
बीडमध्ये चालंलय काय? मुलीचा HIV ने मृत्यू झाल्याची अफवा अन्...
बीडमध्ये चालंलय काय? मुलीचा HIV ने मृत्यू झाल्याची अफवा अन्....
दावोस दौऱ्यात चिमुकल्याकडून देवाभाऊंचं कौतुक, पुन्हा येईन म्हटलं होत..
दावोस दौऱ्यात चिमुकल्याकडून देवाभाऊंचं कौतुक, पुन्हा येईन म्हटलं होत...
पुण्यात दुर्मीळ आजार; दरवर्षी १ लाखांत एक बाधित, 'ही' लक्षणं दिसताच...
पुण्यात दुर्मीळ आजार; दरवर्षी १ लाखांत एक बाधित, 'ही' लक्षणं दिसताच....
बीडच्या 13 सरपंच, 418 सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका, कारण नेमक काय?
बीडच्या 13 सरपंच, 418 सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका, कारण नेमक काय?.
एकनाथ शिंदे पुन्हा का नाराज? दरे गावाला का गेले?; मोठं कारण आलं समोर
एकनाथ शिंदे पुन्हा का नाराज? दरे गावाला का गेले?; मोठं कारण आलं समोर.