AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिर्डी अपघात प्रकरण, पाळणा चालक आणि मालकावर पोलिसांत गुन्हा दाखल

शिर्डीत रामनवमी निमित्त उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवानिमित्त साईसंस्थान प्रसादालयासमोर यात्रा भरली होती. या यात्रेत दुर्घटना घडल्याने उत्सवाला गालबोट लागले आहे.

शिर्डी अपघात प्रकरण, पाळणा चालक आणि मालकावर पोलिसांत गुन्हा दाखल
शिर्डीत जत्रेत पाळणा तुटल्याने दुर्घटनाImage Credit source: TV9
| Updated on: Apr 03, 2023 | 4:13 PM
Share

शिर्डी / मनोज गाडेकर : साईसंस्थानच्या प्रसादालयासमोरील लावण्यात आलेल्या‌ पाळण्याचा ट्रॉलीचा एक पाळणा अचानक तुटला. खाली पाळण्यात बसण्यासाठी उभे असलेल्या नागरिकांवर हा तुटलेला पाळणा पडला. या अपघातात चार जण जखमी झाले. दुर्घटनेत ज्योती किशोर साळवे, किशोर पोपट साळवे यांच्या पायांना मोठी गंभीर दुखापत झाली. याशिवाय 14 वर्षाच्या मुलीच्या डोक्याला जखम झाली तसेच प्रविण अल्हाट हा तरुणही जखमी झाला होता. आता या प्रकरणी पाळणा चालक आणि मालक यांच्यावर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे रामनवमी उत्सवाला गालबोट लागलंय.

जागा मालक आणि पाळणा चालकावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल

रामनवमी उत्सवातील यात्रेत पाळण्याचा अपघात घडल्याने चार जण जख्मी झाले होते. या प्रकरणी पाळणा चालक आणि मालकावर शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पाळणा चालवण्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. याप्रकरणी जागा मालक शिवाजी भोसले, पाळण्याचा चालक हसन सय्यदसह जागा मालक रमेश गोंदकर, किशोर गोंदकर, विजय गोंदकर यांच्यावर भादवि कलम 279, 336, 337, 338 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत चार जण जखमी झाले असून एकाची प्रकृती अद्यापही चिंताजनक असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

रुग्णांवर मोफत उपचार करण्याच्या सूचना

जखमींना तातडीने संस्थानच्या साईबाबा रूग्णालयात हलवण्यात आले. रूग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश ओक, उपसंचालक डॉ. प्रितम वडगावे तातडीने अपघात कक्षात दाखल केले. त्यांनी रूग्णांवर पूर्णपणे मोफत उपचार करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. शिर्डीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनीही आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी आणि नंतर रूग्णालयात धाव घेतली.

रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.