AI तंत्राच्या मदतीने तब्बल पाच कोटींची फसवणूक, फेस स्वॅपिंगच्या मदतीने भयानक घोटाळा

एआय तंत्राच्या मदतीने आता तुमच्या जवळच्या व्यक्तीचा आवाज आणि चेहरा तयार करून सायबर भामटे लुबाडणूक करीत असल्याचे उघडकीस येत आहे. त्यामुळे कोणी तुमच्याकडे मदत मागितली तर दहा वेळा खातरजमा करा..

AI तंत्राच्या मदतीने तब्बल पाच कोटींची फसवणूक, फेस स्वॅपिंगच्या मदतीने भयानक घोटाळा
ai_fraudImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: May 24, 2023 | 3:35 PM

नवी दिल्ली : आर्टीफिशियल इंटेजिजन्स ( AI ) चे तंत्रज्ञान जेवढे उपकारक आहे तेवढेच हानीकारक देखील आहे. जीवनाला एआय तंत्राने सध्या व्यापले आहे. त्यामुळे आपल्याला लेख, कविता, आदी मजकूर तयार करण्यास मदत होत आहे. तसेच त्याचा गैरवापरही करणारे देखील वाढले आहेत. अलिकडेच चोरट्यांनी एकाला त्याच्या मित्राचा चेहरा धारण करीत तब्बल पाच कोटींना लुबाडले असल्याचे उघडकीस आले आहे. वेळीच पिडीतानो पोलीसांकडे धाव घेतल्याने काही प्रमाणात तरी लुटलेली रक्कम परत मिळविण्यास यश आले आहे.

चीनमध्ये एक भयानक सायबर घोटाळा उघडकीस आला आहे. एका व्यक्तीला त्याचा मित्राच्या चेहऱ्याचा वापर करीत मदत मागत 5.15 कोटींना फसविल्याचे उघडकीस आले आहे. चोरट्याने अत्याधुनिक डीपफेक तंत्राचा वापर केला. एआय तंत्राचा वापर करीत एक बनावट व्हिडीओ कॉल करीत अडचणीत असून पैशाची मागणी केली. स्कॅमरने डीपफेक तंत्राचा वापर करीत एका व्यक्तीला आपल्या खात्यात पैसे वळविण्यास भाग पाडले. स्कॅमरने एआय पॉवर्ड फेस स्वॅपिंग तंत्राचा वापर केला. आणि पिडीत व्यक्तीच्या जवळच्या मित्राचे रुप धारण केले. पोलीसांनी सांगितले की चोरट्याने व्हिडीओ कॉल करीत मित्राच्या चेहऱ्याचा वापर करीत त्याच्याकडून 4.3 मिलीयन युआन ( सुमारे पाच कोटी रूपये ) ट्रान्सफर करण्यास सांगितले.

पीडीत व्यक्ती एआयच्या मायाजालात अडकला. त्याने मित्र अडचणीत सापडला आहे, समजून मागचा पुढचा विचार न करता त्याने दिलेल्या अकाऊंट नंबरवर पैसे पाठवून दिले. जेव्हा त्याच्या मित्राने सांगितले की आपण असे पैसे मागितलेलेच नाहीत तेव्हा आपण फसविले गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. पोलीसांनी बऱ्यापैकी पैसे परत मिळविण्यात यश मिळविले असून उर्वरित पैसे मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

एआयच्या मदतीने आवाजाचा क्लोन

एआयच्या मदतीने लुटले जाण्याची ही पहिलीच घटना नसून याआधीही गेल्या महिन्यात एआयच्या मदतीने एका तरूणीच्या आवाजाचा क्लोन बनवून तिच्या आईकडून खंडणी उकळल्याचे प्रकरण घडले होते. एरीझोनातील एक महिलेला अज्ञातांनी कॉल करून तिच्या मुलीचे अपहरण झाल्याचे सांगितले. त्यानंतर मुलीचा आवाज ऐकवून दहा लाख डॉलरची मागणी केली गेली. प्रत्यक्षात तिची मुलगी सहीसलामत होती.

Non Stop LIVE Update
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.