मोबाईलवर एक मॅसेज आला, त्यातील ऑफर पाहून तो खूश झाला, पण त्याचा हा आनंद फार काळ टिकू शकला नाही, कारण…

पार्ट टाईम जॉबची ऑफर देत फसवणुकीची प्रकार हल्ली मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अशा प्रकारच्या मॅसेजवर विश्वास ठेवत फसवणुकीच्या घटनांना बळी पडू नये असे आवाहन पोलिसांकडून वारंवार केले जात आहे.

मोबाईलवर एक मॅसेज आला, त्यातील ऑफर पाहून तो खूश झाला, पण त्याचा हा आनंद फार काळ टिकू शकला नाही, कारण...
जेष्ठ नागरिकाला एकटे गाठत भररस्त्यात लुटलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 05, 2023 | 5:27 PM

डोंबिवली : सायबर गुन्हेगार फसवणुकीचे नवनवीन फंडे अवलंबत असतात. फसवणुकीसाठी गुन्हेगारांची मोडस ऑपरेंडी पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत. हल्ली जॉब ऑफर करत फसवणूक करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. अशीच एक फसवणुकीची घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. पार्ट टाईम जॉबची ऑफर देत एका व्यावसायिकाला साडे चार लाखांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. मंदार मोरेश्वर जाधव असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी व्यावसायिकाच्या फिर्यादीवरुन विष्णुनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींवरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

काय आहे मोडस ऑपरेंडी?

डोंबिवलीत राहणाऱ्या मंदार जाधव या 38 वर्षीय व्यावसायिकाच्या मोबाईलवर एक मॅसेज आला. या मॅसेजमध्ये पार्टटाईम जॉबची ऑफर देण्यात आली होती. मॅसेजमध्ये दिलेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्रामवरील पोस्ट लाईक आणि सबस्क्राईब केल्यास प्रतिदिन 2000 ते 5000 रूपये मिळतील, असे सांगण्यात आले होते. यानंतर टेलिग्रामवर एक ग्रुप बनवून त्याचा फिर्यादीला फायदा मिळवून दिला.

फिर्यादीला 4,78,00 रुपयांचा गंडा

यानंतर ऑनलाईन टास्क पूर्ण करण्यास सांगितले. या टास्कच्या नावाखाली विविध बँक खात्यावर एकूण 4,78,000 रूपये भरण्यास भाग पाडून आर्थिक फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी मंदार जाधव याने विष्णुनगर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद नोंदवली. या प्रकरणी डोंबिवलीत विष्णुनगर पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात कलम 66 (क) (ड) अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक खंदारे करत आहेत.

हे सुद्धा वाचा

हल्ली अशा प्रकारे मॅसेज पाठवून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे अशा मॅसेजपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.