एटीएम कार्डची अदलाबदल करून ज्येष्ठांना गंडा; नाशिक पोलिसांचा हरियाणाच्या भामट्यांना धुळ्यात इंगा

एटीएम कार्डची अदलाबदल करून ज्येष्ठ नागरिकांना गंडा घालणाऱ्या हरियाणाच्या भामट्यांना नाशिक पोलिसांनी थेट धुळ्यात जावून इंगा दाखवला आहे.

एटीएम कार्डची अदलाबदल करून ज्येष्ठांना गंडा; नाशिक पोलिसांचा हरियाणाच्या भामट्यांना धुळ्यात इंगा
नाशिक पोलिसांनी धुळ्यात जावून हरियाणाच्या भामट्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
Follow us
| Updated on: Nov 02, 2021 | 4:53 PM

नाशिकः एटीएम कार्डची अदलाबदल करून ज्येष्ठ नागरिकांना गंडा घालणाऱ्या हरियाणाच्या भामट्यांना नाशिक पोलिसांनी थेट धुळ्यात जावून इंगा दाखवत बेड्या ठोकल्या आहेत.

शंकर आगलावे (वय 66) यांनी या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. आगलावे हे 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास नाशिकरोड येथील दुर्गा गार्डनजवळील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. तेव्हा तिथे दोन भामटे आले. त्यांनी आगलावे यांच्या एटीएमचा पिन नंबर त्यांच्या अपरोक्ष चोरून पाहिला. त्यानंतर त्यांना बोलण्यात गुंगवून ठेवत त्यांच्या एटीएम कार्डचीही अदलाबदल केली. त्यातून जवळपास 32000 हजार रुपये लंपास केले. याप्रकरणी आगलावे यांच्या तक्रारीवरून उपनगर पोलीस ठाण्यात 182/2021 भादवि 420, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी तपास करा, अशा सूचना पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी दिल्या होत्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश भामरे यांनी तपास सुरू केला. तेव्हा त्यांना संशयित धुळ्यात असल्याचे समजले. त्यांनी संशयितांच्या शोधार्थ धुळे गाठले. धुळे शहर पोलिसांची मदत घेऊन विजयुकमार पालाराम राजपूत (वय 35, रा. प्रशांत कॉलनी, हसी रोड, बरवाला, जि. हिसार, हरियाणा) आणि सुनीलकुमार धुपसिंग राजपूत (वय 32, रा. प्रशांत कॉलनी, हसी रोड, बरवाला, जि. हिसार, हरियाणा) यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली. तेव्हा त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींची 3 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्यांनी आगलावे व्यतिरिक्त आणखी किती ज्येष्ठांना गंडा घातला आहे, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. यात फसवणुकीची अनेक प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

बँकेतून काढलेले दोन लाख पळवले

बँकेतून दोन लाखांची काढलेली रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची घटना नाशिकमधील शालिमार भागात घडली आहे. रेहाना रफिक शेख (वय 55, रा. शिवाजीरोड, शालिमार) या आपल्या पतीसह बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये पैसे काढण्यासाठी आल्या होत्या. त्यांनी जवळपास दोन लाखांची रक्कम बँकेतून काढली. पैसे आपल्याजवळच्या पिशवीत ठेवले. दोघेही बँकेतून बाहेर पडताच मोटारसायकलवर आलेले चोरटे रेहाना यांच्या हातातील पैशाची पिशवी हिसकावून पसार झाले. शेख दाम्पत्याने चोर, चोर अशी आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत चोरटे बेपत्ता झाले होते. याप्रकरणी रेहाना शेख यांच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Fraud of senior citizens by exchanging ATM cards; Nashik police arrested two criminals at Dhule)

इतर बातम्याः

प्रारूप मतदारयादी जाहीर, नाशिक जिल्ह्यात 45 लाख 50 हजार मतदार; 5 जानेवारी रोजी अंतिम यादी होणार प्रसिद्ध

कोणताही शत्रू शुद्र नसतो, पंकजांचे नाशिकमध्ये सूचक वक्तव्य, त्यांच्या मनात सल आहे तरी काय?

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.