कोल्हापुरात दोन गँगमध्ये तुंबळ हाणामारी, तीन गाड्यांची तोडफोड, आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथकं रवाना

जिल्ह्यातील इचलकरंजी येथील जय भवानी गावभाग परिसरामध्ये दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या हाणामारीमध्ये तीन गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

कोल्हापुरात दोन गँगमध्ये तुंबळ हाणामारी, तीन गाड्यांची तोडफोड, आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथकं रवाना
ICHALKARANJI CRIME

कोल्हापूर : जिल्ह्यातील इचलकरंजी येथे दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या हाणामारीमध्ये तीन गाड्यांचे मोठे नुकसान झाले. या घटनेमुळे इचलकरंजी भागामध्ये सध्या भीतीचं वातावरण पसरलेलं असून दोन्ही गँगमधील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचेी पथकं रवाना झाली आहेत. (freestyle war and clash between two gang in kolhapur ichalkaranji)

गँग वॉरमुळे तीन गाड्यांचे नुकसान

मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील इचलकरंजी येथे दोन गँगमध्ये शुल्लक कारणामुळे तुफान हाणामारी झाली. या हाणामारीमध्ये तीन गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शहरातील भरवस्तीत झालेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातवारण निर्माण झाले आहे.

पत्रकारांना रिपोर्टिग करण्यापासून रोखलं

शहरातील दोन्ही गँगमध्ये वाद उफळल्याचे समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच दोन्ही गँगच्या गाड्या जप्त केल्या. दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाल्याचे समजताच पत्रकारदेखील घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, पोलिसांनी पत्रकारांना या प्रकरणाचे शूटिंग तसेच फोटो काढताना रोखले.

आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना

पोलीस घटनास्थळी दाखल होताच दोन्ही टोळीतील गुंड पसार झाले आहेत. या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. तसेच इंचलकरंजीमध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन्ही गँगमधील दोषींवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

लग्नाला विरोध केल्यानं मुलीच्या आईचाच केला खून  

दरम्यान,  11 सप्टेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यात आणखी एक धक्कादायक घटना घडली. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातल्या आल्याचीवाडी इथं एका माथेफिरूने लग्नाला विरोध केल्यानं मुलीच्या आईचाच खून केला होता. लता परीट या शेतात कामासाठी गेल्या असता तिथं त्यांचा खून करण्यात आला होता. आजरा पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाची चक्र फिरवत आरोपी गुरुप्रसाद माडभगत याला अटक केली असून तपास सुरु केला होता. लता परीट यांचा मृतदेह शवविच्छेदन करुन पोलिसांनी संबंधित महिलेच्या ताब्यात दिल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. घटनेची माहिती कळताच परिसरातील ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

इतर बातम्या :

कारला धडक देत रिक्षातील चौघांचा राडा, मुंबईत बिझनेसमनला गाडीत टाकून पळवून नेण्याचा प्रयत्न

बॉडी बिल्डर मनोज पाटील आत्महत्येचा प्रयत्न प्रकरण, हायकोर्टाचा साहिल खानला दिलासा

Aurangabad Crime:  9 महिन्यात 62 गुन्ह्यांची उकल करण्यात श्वानांची मदत, औरंगाबाद पोलीस दलातील प्रशिक्षित श्वानांची कामगिरी  

(freestyle war and clash between two gang in kolhapur ichalkaranji)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI