राजस्थानमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, तिघांविरोधात गुन्हा दाखल

पीडित मुलगी आणि गुन्ह्यातील मुख्य आरोपी शेजारी आहेत. मुख्य म्हणजे बलात्कार प्रकरणातील प्रमुख आरोपीही अल्पवयीन आहे. दोघेही एकमेकांचे शेजारी असून एकूण तीन जणांनी पीडितेवर बलात्कार केला.

राजस्थानमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Nov 16, 2021 | 9:19 PM

बारन : राजस्थानमध्ये सतत अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना उघडकीस येत आहेत. कायदे कितीही कडक केले तरी मुलींवरील अत्याचार रोखण्यास सरकार आणि पोलीस अपयशी ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. अशीच अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची आणखी एक घटना पुन्हा एकदा बारा जिल्ह्यात मंगळवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन बारन जिल्हा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी अल्पवयीन

पीडित मुलगी आणि गुन्ह्यातील मुख्य आरोपी शेजारी आहेत. मुख्य म्हणजे बलात्कार प्रकरणातील प्रमुख आरोपीही अल्पवयीन आहे. दोघेही एकमेकांचे शेजारी असून एकूण तीन जणांनी पीडितेवर बलात्कार केला. आरोपीने 13 नोव्हेंबर रोजी पीडित अल्पवयीन मुलीला कारमधून एका पडीक निवासी ठिकाणी नेले. तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने त्याच्या अन्य दोन मित्रांनाही फोन करुन बोलावले. त्यांनीही तिच्यावर बलात्कार केला.

पीडितेच्या जबाबावरुन गुन्हा दाखल

याप्रकरणी पीडित मुलीच्या जबाबावरुन सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई करीत आहेत. पोलीस या घटनेचा अन्य पैलूंवरुनही तपास करीत आहेत. बारनचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय स्वर्णकर यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास महिला संशोधन अधिकारी राकेश शर्मा यांच्याकडे देण्यात आला आहे. आता अल्पवयीन मुलीचे 164 जबाब घेण्यात येणार आहेत.

राजस्थानमध्ये सर्वाधिक बलात्कार एनसीआरबीच्या अहवालात खुलासा

राजस्थानमध्ये मुली सर्वाधिक असुरक्षित आहेत. गेल्या महिन्यात नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB)ने सादर केलेला डेटा याची पुष्टी करतो. 2020 मध्ये देशात सर्वाधिक बलात्काराच्या घटना राजस्थानमध्ये आहेत, तर उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थानमध्ये एका वर्षात 5,310 बलात्काराचे गुन्हे दाखल झाले, तर उत्तर प्रदेशात 2769 गुन्हे दाखल झाले. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर मध्य प्रदेश (2,339) आणि महाराष्ट्र (2,061) आहेत.

राजस्थानमधील एकूण बलात्काराच्या घटनांपैकी 1,279 पीडित अल्पवयीन आणि 4,031 प्रौढ आहेत. अर्ध्याहून अधिक प्रकरणांमध्ये आरोपी हे कुटुंबीय, मित्र, शेजारी किंवा इतर ओळखीचे आहेत. राज्यात अनुसूचित जातीच्या सदस्यांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्येही वाढ झाली आहे. 2018 मध्ये राज्यात 4,607 प्रकरणे नोंदवण्यात आली होती, जी 2019 मध्ये 6,794 आणि 2020 मध्ये 7,017 झाली. (Gang rape of a minor girl in Rajasthan, Charges were filed against the three)

इतर बातम्या

मुलीने प्रेमविवाह केला म्हणून संतापलेल्या बापाचे क्रूर कृत्य, आधी बलात्कार मग हत्या

चाइल्ड पोर्नोग्राफी : देशातील 14 राज्यांत सीबीआयचे छापे; महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.