पोलीस भरतीची परीक्षा देण्यासाठी गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार, दुष्कृत्य केल्यानंतर चालत्या कारमधून फेकले

बलात्कार केल्यानंतर तरुणांनी पीडितेला चालत्या कारमधून कोसिकलन महामार्गाच्या कडेला फेकून दिले. रस्त्यारुन जाणाऱ्या काही लोकांनी रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडलेल्या तरुणीला पाहिले.

पोलीस भरतीची परीक्षा देण्यासाठी गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार, दुष्कृत्य केल्यानंतर चालत्या कारमधून फेकले
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Nov 24, 2021 | 11:24 PM

उत्तर प्रदेश : पोलीस अधिकारी भरतीची परीक्षा देण्यासाठी गेलेल्या तरुणीवर चालत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उत्तर प्रदेशमधील मथुरा येथे घडली आहे. बलात्कार केल्यानंतर तरुणीला चालत्या कारमधून फेकून आरोपींनी पलायन केले. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

आग्रा येथे पोलीस भरतीची परीक्षा देण्यासाठी गेली होती तरुणी

पीडित तरुणी ही आग्रा येथे पोलीस अधिकारी पदाची परीक्षा देण्यासाठी गेली होती. परीक्षा दिल्यानंतर तरुणी आग्रा येथून कोसिकलन येथे जाण्यास निघाली. परीक्षा होईपर्यंत संध्याकाळ झआली होती. संध्याकाळी घरी परतण्यासाठी तरुणाला कोणतेच वाहन मिळत नव्हते. त्यामुळे तरुणीने समोरुन येणाऱ्या कारला हात दाखवत लिफ्ट मागितली. कारमध्ये आधीच तीन-चार तरुण बसले होते. तरुणी या कारमध्ये बसली. आग्र्याहून दिल्ली आग्रा राष्ट्रीय महामार्गावर कार येताच तरुणांनी तरुणीसोबत छेडछाड सुरु केली. तरुणीने छेडछाडीला विरोध करताच अज्ञात तरुणांनी तिला मारहाण केली. त्यानंतर तरुणांनी तिच्यासोबत सामूहिक बलात्कार केला.

बलात्कार केल्यानंतर कारमधून फेकले

बलात्कार केल्यानंतर तरुणांनी पीडितेला चालत्या कारमधून कोसिकलन महामार्गाच्या कडेला फेकून दिले. रस्त्यारुन जाणाऱ्या काही लोकांनी रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडलेल्या तरुणीला पाहिले. त्यानंतर लोकांनी तरुणीच्या घरच्यांना याबाबत कळविले. घरच्या लोकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तरुणीला रुग्णालयात दाखल केले. यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात हजर होत तक्रार दाखल करीत प्रकरणाची चौकशी सुरु केली.

पीडितेच्या भावाने याबाबत बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. तरुणीसोबत झालेल्या दुष्कर्म झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून पीडितेची वैद्यकीय चाचणी सुरु आहे. लवकरात लवकर गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक करण्यात येईल, असे एसपी देहात श्रीचंद्र यांनी सांगितले. (Gang-rape of a young woman who went to Uttar Pradesh to appear for a police recruitment exam)

इतर बातम्या

ACB च्या छाप्यात कृषी विभागातील बड्या अधिकाऱ्याकडून 7 kg सोनं, 15 lakh रोख जप्त!

आधी आठ वर्षीय चिमुकलीवर सामूहिक बलात्कार, वेदनेने रडत होती म्हणून गळा दाबला, वाचा नेमकं काय घडले?

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.