AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरुण गवळींना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायलयाचा मोठा निर्णय

अरुण गवळी यांना लवकरच जेलमध्ये परतावे लागणार आहे. त्यामुळे आता नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.

अरुण गवळींना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायलयाचा मोठा निर्णय
| Updated on: Jul 31, 2024 | 1:52 PM
Share

Supreme Court on Gangster Arun gawli : नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्याप्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी उर्फ डॅडी याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. यानंतर अरुण गवळी यांच्या सुटकेबाबत चार आठवड्यात निर्णय घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य शासनाला दिले होते. त्यानंतर राज्य शासनाच्या गृह विभागाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आता सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी पार पडली. यात अरुण गवळी यांना कोणताही दिलासा मिळणार नाही. त्यांना पुन्हा जेलमध्ये परतावे लागेल, असे आदेश सर्वोच्च न्यायलयाने दिले आहे.

अरुण गवळी हे सध्या जामिनावर बाहेर आहेत. त्यांनी जामिनाची मुदत वाढवून मिळावी, यासाठी अर्ज केला होता. आता त्यांच्या जामिनाप्रकरणी सर्वोच्च न्यायलयात सुनावणी पार पडली. यात अरुण गवळी यांना कोर्टाने कोणताही दिलासा दिलेला नाही. याप्रकरणी अरुण गवळींना पुन्हा एकदा पॅरोल देण्यास सुप्रीम कोर्टाने मनाई केली आहे. यामुळे अरुण गवळी यांना लवकरच जेलमध्ये परतावे लागणार आहे. त्यामुळे आता नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

अरुण गवळी यांना हत्येच्या आरोपात जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सध्या ते नागपूरमधील मध्यवर्ती कारागृहात आहेत. 2006 मध्ये जारी केलेल्या एका शासनाच्या परिपत्रकानुसार शिक्षेत सूट देण्यासाठी गवळी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी उच्च न्यायालयाने एप्रिल महिन्यात राज्य शासनाला चार आठवड्यात निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. राज्य शासनाने दिलेल्या कालावधीत कोणताही निर्णय घेतला नाही. यानंतर 8 मे रोजी याप्रकरणी राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण दाखल झाल्याने उच्च न्यायालयाने राज्य शासनाला चार आठवड्याचा अतिरिक्त कालावधी दिला.

आता याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान अरुण गवळी यांना कोणताही दिलासा मिळणार नाही. त्यांना पुन्हा जेलमध्ये परतावे लागेल, असे आदेश सर्वोच्च न्यायलयाने दिले आहेत. यामुळे आता याप्रकरणी नोव्हेंबर महिन्यात पुन्हा सुनावणी होणार आहे. त्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

काय आहे कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरण ?

शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या खून प्रकरणात अरूण गवळी यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. ते सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. ही घटना 2 मार्च 2007 रोजी घडली होती. कमलाकर जामसंडेकर यांचे त्यांच्या भागातील सदाशिव सुर्वे नावाच्या इसमासोबत प्रॉपर्टीवरुन वाद सुरु होता. सदाशिवनेच गवळीच्या हस्तकांमार्फत ही सुपारी दिली होती. त्यानंतर अरुण गवळीने या सुपारीची प्रताप गोडसेला जबाबदारी दिली होती. 2 मार्च रोजी कमलाकर जामसंडेकर यांची हत्या करण्यात आली.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.