मध्यरात्री सरकारी वसीतीगृहामध्ये घुसून मुलीचा विनयभंग, आरोपीने फोनही चोरला
नागपूरात महिला वसतीगृहामध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. दोन आरोपी मध्यरात्री वसतीगृहामध्ये शिरले आणि त्यांनी एका मुलीचा विनयभंग केला आहे. नेमकं प्रकरण काय जाणून घ्या...

नागपूरात एक खळबळजनक घटना घडली आहे. सरकारी ओबीसी मुलींच्या वसतीगृहात पहाटे तीन वाजता दोन आरोपी शिरले. या आरोपींनी एका मुलीच्या रुममध्ये जाऊन तिचा विनयभंग केला. त्यानंतर त्यांनी तिचा मोबाईल चोरला आणि तेथून पसार झाले. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींना लवकरात लवकर शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
22 तारखेला घडली घटना
ही धक्कादायक घटना नागपूरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत २२ तारखेला पहाटे घडली आहे. एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींच्या शोधासाठी तीन पथकं रवाना केली गेली आहेत.
वाचा: सुंदर मुलगी द्यायची ऑफर, हॉटेलच्या खोलीत लाळ गाळत पोहोचायचे लोक; मग वकील, पोलिस आणि…
आरोपीचा शोध सुरु
नागपूरातील आयसी चौकातील ज्या सरकारी वसतीगृहात हा धक्कादायक प्रकार घडला, त्या वसतीगृहात मुलींच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, मुलीच्या खोलीच्या दाराला कुंडी नाही. तसेच वसतीगृहात पुरेशा प्रमाणात सुरक्षा गार्डही नाहीत. २२ तारखेच्या घटनेनं वसतीगृहातील सर्व मुली हादरलेल्या आहेत. त्यांना आपल्या सुरक्षेचा काळजी वाटत आहे. पीडित विद्यार्थ्यांनीने सांगीतलं आपबिती.
६४ मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न
या ओबीसी वसतीगृहात ६४ मुली राहतात. या मुलींना आता आपल्या सुरक्षेची काळजी वाटत आहेत. एमआयडीसी पोलीसांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन, आरोपींचा शोध सुरु केला. आरोपींच्या शोधासाठी तीन पथकं रवाना केली आहेत. परिसरातील सर्व सीसीटीव्हींचा शोध घेतला जात आहे. जेणे करुन आरोपींची ओळख पटेल.
पोलिसांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेतले असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगाने तपास सुरू केला आहे. तक्रारीनुसार, पोलिसांनी वसतिगृह परिसरातील काही संशयितांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच, वसतिगृहातील कर्मचारी आणि इतर रहिवाशांचे जबाब नोंदवले जात आहेत. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.
