AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परीक्षेला निघाली पण डोक्यात वेगळंच टेन्शन … ट्रेनमधील कर्मचाऱ्यामुळे विद्यार्थीनीची भीतीने उडाली गाळण !

आरोपी सफाई कर्मचारी हा लखनऊ स्टेशनवरून हाजीपूर स्टेशनपर्यंत तरुणीला त्रास देत होता. अखेर मुझफ्फरपूर रेल्वे स्थानकावर त्याला पकडण्यात आले. या काळात तरुणीने तब्बल १२ तास भीतीच्या छायेखाली प्रवास केला.

परीक्षेला निघाली पण डोक्यात वेगळंच टेन्शन ... ट्रेनमधील कर्मचाऱ्यामुळे विद्यार्थीनीची भीतीने उडाली गाळण !
| Updated on: Sep 30, 2023 | 3:52 PM
Share

मुझफ्फरपूर | 30 सप्टेंबर 2023 : महिलांविरोधात गुन्ह्याच्या (crime news) घटना वाढताना दिसत असून आता चालत्या ट्रेनमध्येच एक मुलीची छेड काढत तिला त्रास दिल्याचा प्रकार समोर आला आहे. ही मुलगी गरीब रथ एक्स्प्रेसने (train journey) जालंधरहून बिहारमधील मोतिहारी येथे परीक्षेसाठी बसली होती. मात्र ट्रेनमध्ये तैनात असलेल्या सफाई कर्मचाऱ्याने तिची छेड काढली. लखनऊ स्टेशन ते हाजीपूरपर्यंत तो तिला त्रास देत होता. यामुळे त्या तरूणीने तब्बल १२ तास भीतीच्या छायेखाली प्रवास केला. अखेर मुझफ्फरपूर रेल्वे स्थानकावर त्याला अटक करण्यात आली.

काय आहे संपूर्ण प्रकरण ?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरूणी जालंधरमध्ये एएनएमचा अभ्यास करते. आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी ती तिच्या मैत्रिणीसोबत मोतिहारी येथे जात होती. यासाठी त्या दोघी जालंधर-सहरसा गरीब रथ एक्स्प्रेसमधून प्रवास करत होत्या. सगळं काही ठीक होतं, पण ट्रेन लखनऊ येथे पोहोचताच गाडीतील एका सफाई कर्मचाऱ्याची पीडित मुलीवर नजर पडली आणि त्याने तिला त्रास देण्यास, छेड काढण्यास सुरूवात केली. सौरभ शर्मा असे आरोपीचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील पिनाहाट पोलीस स्टेशन हद्दीतील अर्जुनपूर गावचा रहिवासी असल्याचे समजते. तो उत्तर रेल्वेच्या फिरोजपूर विभागात साफसफाई करणाऱ्या कंपनीत काम करतो.

मुलीने कथन केला भयावह अनुभव

त्या तरूणीने सांगितले की, ती गरीब रथ एक्सप्रेसच्या जी-वन कोचमधून प्रवास करत होती. बुधवारी सकाळी 5:15 वाजता जालंधर स्टेशनवरून ती मैत्रीणीसह ट्रेनमध्ये चढली. रात्री नऊच्या सुमारास ट्रेन लखनऊ येथे पोहोचल्यावर पीडित तरूणी वरच्या बर्थवरून खाली उतरली आणि तिने मोबाईल चार्जिंगसाठी लावला. तेवढ्यात आरोपी सफाई कर्मचारी चेथे पोहोचला आणि त्याने तरूणीचा चार्जिंगला लावलेला फोन काढून टाकला.

त्यानंतर तो मुलीचा नंबर मागू लागला. पण ती काहीच बोलली नाही, ना नंबर दिला, यामुळे तो मुलीला आणखी त्रास देऊ लागला. एवढेच नव्हे तर तो खाद्यपदार्थ घएऊन वारंवार तिच्याकडे यायचा आणि ते घेण्यासाठी तिच्यावर जबरदस्ती करायचा. त्याचा त्रास सतत सुरूच होता. यामुळे पीडितेला रात्रभर झोप लागली नाही. रात्रभर तो तिला त्रास देतच होता.

अशी झाली अटक

अखेर सकाळ झाल्यानंतर एका पोलिसाची नजर त्या कर्मचाऱ्यावर पडली. तो काय वागतोय याकडे त्यांचं लक्ष गेलं. तेव्हाच पीडित तरूणीने आणि इतर प्रवाशांनीही त्याच्याबद्दल तक्रार केली. त्यानंतर मुझफ्फरपूर रेल्वे एसपींना माहिती देण्यात आली. दरम्यान, काही प्रवाशांनी सौरभला पकडले. मुझफ्फरपूर जंक्शनवर पोहोचताच त्याला जीआरपीच्या ताब्यात देण्यात आले. जीआरपी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर मुलगी मोतिहारी येथे परीक्षेसाठी निघून गेली.

रेल्वे पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ कारवाई केली. आणि मुझफ्फरपूर जंक्शन येथून आरोपी सौरभला अटक केली. एफआयआर नोंदवून पुढील कारवाई करण्यात येत आहे, असे रेल्वे पोलिसांनी सांगितले.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.