Goldman Sachin Shinde murder case | तीन आरोपी जेरबंद, गोल्डमॅनच्या हत्येमागचं गूढ उलगडणार?

वेली तालुक्यातील गोल्डमॅन सचिन नानासाहेब शिंदे (Goldman Sachin Shinde  याचा हत्येप्रकरणी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. (Goldman Sachin Shinde murder case)

Goldman Sachin Shinde murder case | तीन आरोपी जेरबंद, गोल्डमॅनच्या हत्येमागचं गूढ उलगडणार?
प्रातिनिधक फोटो
Follow us
| Updated on: Feb 12, 2021 | 8:16 AM

पुणे : वेली तालुक्यातील गोल्डमॅन सचिन नानासाहेब शिंदे (Goldman Sachin Shinde)  याच्या हत्येप्रकरणी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. लोणीकंद पोलिसांनी फक्त 48 तासांत तीन संशयितांना ताब्यात घेतले. सचिन किसन शिंदे (वय ३२), प्रथमेश उर्फ सनी कुमार शिंदे (वय 20), रोशनकुमार शमशेर साहू उर्फ गौंड (वय 20) अशी अटक केलेल्या तीन आरोपींची नावं आहेत. (Goldman Sachin Shinde murder case, three Accused arrested)

हत्येसाठी वापरलेलं हत्यार जप्त

पुण्यातील लोणीकंद ग्रामपंचायतीसमोर गोल्डमॅन सचिन शिंदे याची 9 फेब्रुवारी रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गोळ्या झाडल्यानंतर आरोपी तेथून काही क्षणांत फरार झाले होते. या प्रकरणानंतर पुण्यात तसेच लोणीकंद परिसरात खळबळ उडाली होती. मारेकरी फरार असल्यामुळे त्यांनी लवकरात लवकर अटक करुन या प्रकरणाचा तपास करण्याचे आव्हान येथील पोलिसांसमोर होते. त्यांनतर पोलिसांनी आपल्या तपासाला वेग देत अवघ्या 48 तासांत तीन आरोपींचा छडा लावला. या तिन्ही आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी सचिन शिंदे, प्रथमेश उर्फ सनी शिंदे, रोशनकुमार साहू उर्फ गौंड या तीन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याडून हत्येसाठी वापरण्यात आलेली बंदुकही पोलिसांनी जप्त केली आहे.

हत्येसाठी मित्रांची मदत

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासातून आरोपींनी गोल्डमॅनच्या हत्येसाठी आपल्या मित्रांची मदत घेतल्याचे समोर आले आहे. आरोपींना मदत करणाऱ्या मित्रांचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी आरोपींना अटक केली असली तरी, गोल्डमॅनच्या हत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. आरोपींना अटक केल्यामुळे या प्रकरणाचा लवकरच छडा लागण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

गोल्डमॅनची हत्या कशी झाली?

सचिन शिंदे हा 9 फेब्रुवारी रोजी दुपारी लोणीकंद येथे एटीएमसमोर आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत उभा होता. यावेळी अॅक्टिव्हा गाडीवरुन दोन जण चौकात आले. त्यांनी योग्य संधी साधत सचिन शिंदेच्या डोक्यात गोळ्या झाडल्या. त्यानंतर ते प्रचंड वेगात तिथून फरार झाले. या गोळीबारानंतर सचिन शिंदे प्रचंड रक्तबंबाळ झाला होता. जास्त रक्तस्त्राव झाल्याने तो जमिनीवर कोसळला होता. त्यानंतर जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे सचिनचा मृत्यू झाला होता.

संबंधित बातम्या :

दुचाकीवरुन दोनजण आले, गोल्डमॅनवर दिवसाढवळ्या भर चौकात गोळीबार, आरोपी फरार, वाचा थरार

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात सत्य का लपवताय? ठाकरे सरकारला फडणवीसांचा सवाल

व्हॅलेंटाईन वीकमध्येच प्रियकरानं संपवलं जीवन, प्रेयसीला बेड्या!

(Goldman Sachin Shinde murder case, three Accused arrested)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.