65 वर्षांच्या आजीचा कुऱ्हाडीने वार करून नाशिकमध्ये खून; काम कर म्हटल्याने नातवाचा राग अनावर

आजी नातवाचे नाते म्हणजे दुधावरच्या सायीसारखे म्हटले जाते. मात्र, या नात्याला काळीमा फासणारी घटना नाशिक जिल्ह्यात घडली असून, केवळ आजीच्या बोलण्याला कंटाळून एका नातवाने तिचा निर्घृण खून केला आहे.

65 वर्षांच्या आजीचा कुऱ्हाडीने वार करून नाशिकमध्ये खून; काम कर म्हटल्याने नातवाचा राग अनावर
पारिबाई शेवरे, आजी.


नाशिकः आजी नातवाचे नाते म्हणजे दुधावरच्या सायीसारखे म्हटले जाते. मात्र, या नात्याला काळीमा फासणारी घटना नाशिक जिल्ह्यात घडली असून, केवळ आजीच्या बोलण्याला कंटाळून एका नातवाने तिचा निर्घृण खून केला आहे.

या घटनेची सविस्तर माहिती अशी की, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसलूमधील वायघोळपाडा येथे लक्ष्मण शेवरे हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांची आई पारिबाई शेवरे ही नातू कृष्णाला अनेकदा काही तरी कामधंदा करत जा, असे सांगायची. मात्र, कृष्णा आपल्या आजीच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचा नाही. त्याचे आपले रोजचे रुटीन सुरू होते. पण, आजीला त्याचे रिकमटेकडे फिरणे आवडायचे नाही. ती त्याला त्याच्या वडिलांना मदत करत जा, असे सारखे म्हणायची. कृष्णा काही केल्या हे मनावर घ्यायचा नाही. तेव्हा आजींनी कृष्णाला चांगले वळण लावण्यासाठी म्हणून एकदम कडक भाषेत उपदेश केला. शिवाय तू काम करत नाहीस, वेडा आहेस, अशा तिखट शब्दांत त्याचे कान टाचले. आजीचे हे कटू बोल कृष्णाला आवडले नाहीत. त्याचा राग अनावर झाला. त्या रागाच्या भरात त्याने आजी पारिबाईच्या तोंडावर, गळ्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करून तिचा निर्घृण खून केला. या घटनेत आजीचा जागीच मृत्यू झाला. पारिबाई यांचा मुलगा लक्ष्मण यांनी कृष्णाविरोधात हरसूल पोलीस ठाण्यात खुनाची तक्रार नोंदवली आहे. दरम्यान, गेल्या दिवसांमध्ये नाशिक जिल्ह्यात खून, चोरी, लूटमार असे गुन्हे वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक सायंकाळच्या वेळी एकटे घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर पोलिसांचा वचक राहिला नाही, पोलीस हेल्मेट सक्तीमध्ये व्यस्त असल्याचा आरोप नाशिककरांकडून केला जात आहे.

अवघ्या वीस रुपयांसाठी खून
नाशिकच्या पंचवटीमध्ये अवघ्या 20 रुपयांसाठी आरोपीने गळा चिरुन मजुराची हत्या केल्याचा प्रकार नुकताच उघड झाला आहे. संशयित आरोपी पंडित गायकवाड उर्फ लंगड्या याने बिडी पिण्यासाठी फिरस्ता असलेल्या मजुराकडे 20 रुपये मागितले. त्याने पैसे न दिल्याचा राग आल्याने आरोपीने त्याच्या गळ्यावर वार करून त्याची निर्घृण हत्या केली. संशयित आरोपी पंडित गायकवाडला पंचवटी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जुना आडगाव नाक्यावरील राम रतन लॉज खाली ही घटना घडली. यामुळे पोलिस खातेही हादरून गेले होते.

इतर बातम्याः

Gold Special: खणखणीत परतावा देणारा हुकमी नाणं म्हणजे बावनकशी सोनं, कसं ते जाणून घेऊयात!

नाशिकमधले दादासाहेब फाळके स्मारक कात टाकणार; दिग्दर्शक नितीन देसाई अन् मंत्राज स्पर्धेत

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI