‘ममता माझी झाली नाही, तर…’ लग्नाच्या घरात रक्ताची होळी, WhatsApp मुळे भावोजी-मेहुणीमधलं सिक्रेट ओपन
बुधवारी रात्री उशिरा सगळे साईं जलाराम सोसायटीतील घरी एकत्र होते. ती भावाच्या लग्नाची शॉपिंग करण्यासाठी आलेली. भाऊ आणि आई सोबत होते. ते आपल्या मोठ्या मुलीच्या घरी थांबले होते. त्यावेळी अचानक संदीपने एक डिमांड ठेवली आणि मग रक्ताची होळी.

तारीख 8 ऑक्टोंबर 2025. गुजरातच्या सूरत शहरात एक व्यक्ती आपल्या घरातच रक्ताची होळी खेळला. याला कारण ठरली त्याची सनक, नको ती इच्छा. त्याला आपल्या 20 वर्षाच्या मेहुणीसोबत लग्न करायचं होतं. त्याला पत्नी आणि तीन मुलं आहेत. पण तरीही त्याच्या मनात मेहुणी भरली. तो तिला घाणेरडे व्हिडिओ पाठवायचा. अश्लील मेसेज करायचा. त्याला असं वाटायचं की, मेहुणी लग्नाला तयार होईल. पण मेहणुीच्या मनात त्याच्याबद्दल अशी कुठलीही भावना नव्हती. तिच्या मनात त्याच्यासाठी फक्त भावोजीच स्थान होतं.
ती भावाच्या लग्नाची शॉपिंग करण्यासाठी सूरतला आलेली. भाऊ आणि आई सोबत होते. ते आपल्या मोठ्या मुलीच्या घरी थांबले होते. त्याचवेळी अचानक 8 ऑक्टोंबर रोजी भावोजीने अचानक एक डिमांड सगळ्यांसमोर ठेवली. बोलला, मला मेहुणीसोबत लग्न करायचय. हे ऐकून सगळेच सुन्न झाले. वाद वाढला, भांडणं झाली. भावोजीने रागाच्या भरात मेहुणी आणि मेहुण्याची हत्या केली. सासू त्याने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झाली. पोलिसांनी आरोपीला अटक केलीय. चौकशीत अनेक हादरवून टाकणारे खुलासे झाले आहेत.
कल्पना नव्हती इथे आपला शेवट असेल
पटेल नगरमधील साई जलाराम सोसायटीत संदीप घनश्याम गौड पत्नी वर्षा आणि तीन मुलांसोबत राहत होता. संदीपचा मेहुणा निश्चय अशोक कश्यप बहिण ममता कश्यप आणि आई शकुंतला देवी 4 ऑक्टोंबर रोजी लग्नाची शॉपिंग करण्यासाठी प्रयागराजहून सूरतला आले. लग्नाच्या खरेदीसाठी आपण इथे आलोय. पण आपला इथे शेवट होईल याची कश्यप कुटुंबाला अजिबात अपेक्षा नव्हती. बुधवारी रात्री उशिरा सगळे साईं जलाराम सोसायटीतील घरी एकत्र होते. त्यावेळी संदीपने मेहुणा आणि सासूसमोर मेहुणीसोबत दुसऱ्या लग्नाचा प्रस्ताव ठेवला. बोलला, मला मेहुणी बरोबर लग्न करायचय.
मी माझ्या दीदीला फसवू शकत नाही
जावयाच्या तोंडून हे ऐकून सासू सुन्न झाली. तुम्ही हे काय बोलताय? असं सासू म्हणाली. त्यावर संदीप बोलला, ममता माझी झाली नाही, तर दुसऱ्या कोणाचीच होणार नाही. त्यावर ममता बोलली, मी माझ्या दीदीला फसवू शकत नाही. मी तुमच्यासोबत लग्न करणार नाही. त्यावरुन कुटुंबात मोठा वाद झाला. याच दरम्यान संदीपने चाकू उचलला व मेहुणा निश्चय कश्यप, मेहुणी ममता आणि सासू शकुंतला यांच्यावर वार केले. संदीपच्या हल्ल्यात मेहुणा आणि मेहुणीचा जागीच मृत्यू झाला. सासूला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे तिच्यावर उपचार सुरु आहेत.
संदीप आणि मेहुणीचे WhatsApp चॅट तपासले
पोलिसांनी आरोपी संदीपला उधना रेल्वे स्टेशन येथून अटक केली. पोलिसांनी संदीप आणि मेहुणीचे WhatsApp चॅट तपासले. ते पाहून पोलीसही हैराण झाले. संदीप बऱ्याचदा मेहुणीला अश्लील मेसेज करायचा आणि व्हिडिओ पाठवायचा. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
