AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘जीने के लिए सोचाही नहीं, दर्द सवारने होगे’ गाणं गात व्हिडीओ बनवला, नंतर अल्पवयीन तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

नैराश्यात जावून अवघ्या 16 वर्षीय अल्पवयीन तरुणाने आत्महत्या केली आहे. तो आत्महत्येमागील कारण सांगून गेला नाही. मात्र, त्याच्या मृत्यूनंतर तो सोडून गेलेल्या काही गोष्टी आपल्याही मनाला चटका लावतील अशाच आहेत (Gujarat Vadodara minor youth attempt suicide).

'जीने के लिए सोचाही नहीं, दर्द सवारने होगे' गाणं गात व्हिडीओ बनवला, नंतर अल्पवयीन तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Jun 09, 2021 | 10:25 PM
Share

गांधीनगर : कोरोना संकटामुळे सर्वत्र नकारात्मक वातावरण आहे. मात्र, आपल्याला या नकारात्मकतेतून बाहेर पडायला हवं. अर्थात हे मोठं आव्हान आहे. पण ते करणं आज जास्त आवश्यक आहे. विशेष म्हणजे आपल्याला फक्त स्वत:ला मोटिवेट करायचं नाहीय तर आपल्या आजूबाजूच्या नागरिकांनामध्ये उत्साह आणि सकारात्मकता भरायची आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून आपलं ते कर्तव्य आहे. कारण नैराश्यातून अनेक लोक आत्महत्या करताना दिसत आहेत. गुजरातचं बडोदा शहरदेखील आज आत्महत्येच्या एका घटनेने हादरलं आहे. नैराश्यात जावून अवघ्या 16 वर्षीय अल्पवयीन तरुणाने आत्महत्या केली आहे. तो आत्महत्येमागील कारण सांगून गेला नाही. मात्र, त्याच्या मृत्यूनंतर तो सोडून गेलेल्या काही गोष्टी आपल्याही मनाला चटका लावतील अशाच आहेत (Gujarat Vadodara minor youth attempt suicide).

आई-वडील मजूर

बडोद्याच्या सनफार्म रोड येथील परिसरात संबंधित अल्पवयीन तरुण राहत होता. त्याचे आई-वडील दोघं मजुरीचं काम करतात. तो स्वत: एका ज्वेलर्सच्या दुकानात काम करायचा. संपूर्ण कुटुंब मेहनत करत होतं. त्याचे आई-वडील नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. त्यांना वाटलं त्यांचा मुलगाही कामावर गेला असेल. पण संध्याकाळी घरी आल्यानंतर त्यांनी जे बघितलं त्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण ज्याच्यासाठी ते झटत होते, संघर्ष करत होते, परिस्थितीशी लढत होते त्याच काळजाच्या तुकड्याने आत्महत्या केली (Gujarat Vadodara minor youth attempt suicide).

मुलाच्या आत्महत्येनंतर आई-वडील आणि परिसरातील नागरिकांना धक्का

मुलाला घरात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केलेल्या परिस्थितीत बघितल्यानंतर आई-वडिलांनी हंरबडा फोडला. त्यांच्या रडण्याचा ओरडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे नागरिक घरात आले. यावेळी त्यांनादेखील या गोष्टीचा धक्का बसला. थोड्याच वेळात आत्महत्येची बातमी संपूर्ण परिसरात समजली. अनेक लोक मृतकाच्या आई-वडिलांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न करत होते. या घटनेबाबत पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठलं.

पोलिसांच्या हाती महत्त्वपूर्ण व्हिडीओ

पोलिसांनी तपास केल्यानंतर अल्पवयीन तरुणाच्या मोबाईलमधील एक व्हिडीओ त्यांच्या हाती लागला. मुलाने आत्महत्या करण्याआधी मोबाईलमध्ये एक व्हिडीओ तयार केला होता. या व्हिडीओत तो ‘मासूम’ या हिंदी चित्रपटातील ‘तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूं’ हे गाणं गाताना दिसत आहे. हा व्हिडीओ त्याने आत्महत्या करण्याआधीच बनल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी त्याचा मोबाईल आणि इतर वस्तू तपासासाठी ताब्यात घेतल्या आहेत.

तरुणाने नेमकी आत्महत्या का केली?

दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांना देखील धक्का बसला आहे. एक 16 वर्षाचा तरुण कुणालाही कोणताही मागमूस न लागू देता आत्महत्या करतो. त्याच्या आतमध्ये सुरु असलेल्या आक्रोशाची तो त्याच्या आई-वडिलांनाही थांगपत्ता लागू देत नाही. विशेष म्हणजे तो आत्महत्या करण्याआधी ‘जीने के लिए सोचाही नहीं दर्द सवारने होगे’ असं गीत मोबाईलमध्ये तयार करतो. त्याच्या याच व्हिडीओतून तो भयानक नैराश्यात होता हे लक्षात येतंय. पण त्याने नेमकी आत्महत्या का केली? याचा तपास पोलीस करत आहेत.

संबंधित बातमी : मोठी बातमी: दम्याच्या त्रासाला कंटाळून चांदी व्यापाऱ्याची आत्महत्या 

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.