नाशिक : पोलीस आयुक्तालय हद्दीत असलेल्या अंबड पोलीस ठाणे ( Ambad Police ) सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्याचे कारण म्हणजे अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत नव्हे पाठीमागेच मोठा गुटख्याचा ( Gutkha ) साठा सापडला आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात चर्चा होऊ लागली असून अंबड पोलीसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे ज्या व्यवसायिकाकडे हा गुटखा सापडला त्याच व्यवसायिकावर यापूर्वी अनेकदा कारवाई ( Crime News ) झाली आहे. त्यामुळे अंबड पोलिसांचा कारभार चर्चेचा विषय ठरत आहे. नुकतीच करण्यात आलेली कारवाईत तब्बल साडेतीन लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.