Student Murder | वर्गात शिक्षिकेसमोरच बारावीच्या विद्यार्थ्यांची हमरी-तुमरी, अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या

Student Murder | वर्गात शिक्षिकेसमोरच बारावीच्या विद्यार्थ्यांची हमरी-तुमरी, अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या
बेळगावमध्ये भररस्त्यात पतीकडून पत्नीची धारदार शस्त्राने वार करत हत्या
Image Credit source: टीव्ही9

हरीसिंह पुरा गावातील संस्कार भारती खासगी शाळेत गुरुवारी बारावीच्या विद्यार्थ्यांचं प्रॅक्टिकल सुरु होतं. सकाळी नऊ वाजता परीक्षा सुरु होणार होती. यावेळी बारावीतील दोघा विद्यार्थ्यांमध्ये अचानक वाद सुरु झाला.

अनिश बेंद्रे

|

Mar 25, 2022 | 12:57 PM

चंदिगढ : भर वर्गातच एका विद्यार्थ्याने दुसऱ्याची हत्या (Student Murder) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हरियाणाच्या कर्नालमधील (Karnal Haryana) हरीसिंह पुरा गावात एका खासगी शाळेत ही घटना घडली. शिक्षिका वर्गात शिकवत असतानाच एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्यावर चाकूने वार (Knife Attack) केले. या हल्ल्यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. क्षुल्लक कारणावरुन दोघांमध्ये गेल्या काही दिवासांपासून वाद सुरु असल्याचं बोललं जातं. गुरुवारी दोघांमध्ये पुन्हा वादावादी झाली, त्याचं पर्यवसन हत्येत झाल्याचं उघडकीस आलं आहे.

काय आहे प्रकरण?

हरीसिंह पुरा गावातील संस्कार भारती खासगी शाळेत गुरुवारी बारावीच्या विद्यार्थ्यांचं प्रॅक्टिकल सुरु होतं. सकाळी नऊ वाजता परीक्षा सुरु होणार होती. यावेळी बारावीतील दोघा विद्यार्थ्यांमध्ये अचानक वाद सुरु झाला. वाद इतका विकोपाला गेला, की आरोपी विद्यार्थ्याने दुसऱ्याची चाकू भोसकून हत्या केली.

विद्यार्थी-शिक्षिकेच्या उपस्थितीतच हल्ला

हा प्रकार घडला त्यावेळी शिक्षिका वर्गात शिकवत होत्या, तर अन्य विद्यार्थीही उपस्थित होते. मात्र एकाने दुसऱ्यावर चाकूने वार करण्यास सुरुवात करताच वर्गात एकच गोंधळ उडाला. हत्येनंतर आरोपी विद्यार्थी घटनास्थळावरुन पसार झाला.

जखमी विद्यार्थ्याचा मृत्यू

वर्गात रक्तबंबाळ अवस्थेतील विद्यार्थ्याला पाहून शाळेच्या परिसरात एकच खळबळ उडाली. गंभीर जखमी विद्यार्थ्याला घरौंडा येथील आरोग्य केंद्रात नेण्यात आलं. डॉक्टरांनी तिथून त्याला कर्नालला नेण्यास सांगितलं. मात्र तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं.

पूर्ववैमनस्यातून खून

पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांनी प्राथमिक तपासात लावला आहे. हत्येनंतर गावात तणावपूर्ण शांतता पसरली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून पुढील तपास सुरु केला आहे. पोलिसांनी गावात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे.

संबंधित बातम्या :

दारुच्या नशेत बाप-लेकाची भांडणं, मुलाकडून 70 वर्षीय पित्याची हत्या

संपत्तीच्या हव्यासातून आईचा शेतात खून, बाप-लेकाला आजन्म कारावास

मित्राच्या मदतीने बापाची हत्या, आईची पोलिसात तक्रार, बारा तासात दोघे गजाआड

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें