Sangli Murder | दारुच्या नशेत बाप-लेकाची भांडणं, मुलाकडून 70 वर्षीय पित्याची हत्या

शिवाप्पा पुजारी यांना दारु पिण्याचे व्यसन होते. बुधवारी रात्री शिवाप्पा पुजारी हे दारु पिऊन आले होते. यावेळी मुलगा मल्लिकार्जुन आणि वडील शिवाप्पा यांच्यात वाद झाला.

Sangli Murder | दारुच्या नशेत बाप-लेकाची भांडणं, मुलाकडून 70 वर्षीय पित्याची हत्या
सांगलीत मुलाकडून वृद्धाची हत्याImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 25, 2022 | 11:51 AM

सांगली : मुलाने जन्मदात्या वडिलांची हत्या (Father Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सांगली जिल्ह्यातील (Sangli Crime) जत तालुक्यातील सोनलगी येथे हा प्रकार घडला. किरकोळ कारणातून मुलाने वृद्ध पित्याचा खून केल्याचा आरोप आहे. पोटच्या मुलानेच जन्मदात्याचा खून केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. शिवाप्पा चंद्राम पुजारी असं खून झालेल्या वृद्धाचे नाव आहे.ते 70 वर्षांचे होते. ही घटना गुरुवारी पहाटे घडली होती. या प्रकरणी संशयित आरोपी मल्लिकार्जुन शिवाप्पा पुजारी (वय 32 वर्ष) याला पोलिसांनी अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?

शिवाप्पा पुजारी यांना दारु पिण्याचे व्यसन होते. बुधवारी रात्री शिवाप्पा पुजारी हे दारु पिऊन आले होते. यावेळी मुलगा मल्लिकार्जुन आणि वडील शिवाप्पा यांच्यात वाद झाला.

हा वाद मिटवण्यासाठी गावातील काही जणांनी मध्यस्थी करण्याचेही प्रयत्न केले. मात्र दोघेही मद्यधुंद अवस्थेत असल्याने ते कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. रात्रभर या दोघात वाद सुरु होता.

मुलाची वडिलांना धक्काबुक्की

शेवटी मुलगा मल्लिकार्जुन यांनी वडिलांना धक्काबुक्की केली. यामध्ये वडील शिवाप्पा घराच्या बाजूला असलेल्या पत्र्यावर पडले. यातच शिवाप्पा यांचा मृत्यू झाला.

घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी भेट दिली. नवले यांनी कसून तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

Father Murder | मित्राच्या मदतीने बापाची हत्या, आईची पोलिसात तक्रार, बारा तासात दोघे गजाआड

Wardha Crime | संपत्तीच्या हव्यासातून आईचा शेतात खून, बाप-लेकाला आजन्म कारावास

 तीन आठवड्यांपासून बेपत्ता, पालघरमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा कुजलेला मृतदेह सापडला

Non Stop LIVE Update
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.