सांगलीच्या तासगावमधील रहस्यमय खुनाचा उलगडा, पती-पत्नीस बेड्या, नेमकं प्रकरण काय?

सांगलीच्या तासगाव येथे जेसीबी मालक हरी पाटील यांचा निर्घृण खून करून मृतदेह विहिरीत टाकून देण्यात आला होता. या रहस्यमय खुनाचा उलघडा स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने केला आहे (husband and wife arrest in Sangli tasgaon murder case).

सांगलीच्या तासगावमधील रहस्यमय खुनाचा उलगडा, पती-पत्नीस बेड्या, नेमकं प्रकरण काय?
सांगलीच्या तासगावमधील रहस्यमय खुनाचा उलगडा, पती-पत्नीस बेड्या, नेमकं प्रकरण काय?
शंकर देवकुळे

| Edited By: चेतन पाटील

Jun 15, 2021 | 10:07 PM

सांगली : सांगलीच्या तासगाव येथे जेसीबी मालक हरी पाटील यांचा निर्घृण खून करून मृतदेह विहिरीत टाकून देण्यात आला होता. या रहस्यमय खुनाचा उलघडा स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने केला आहे. जेसीबीवरील ऑपरेटर आणि त्याच्या पत्नीस अटक करण्यात आली आहे. अनैतिक संबंधातूनच हा खून झाल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले होते. तसेच  मृतदेह दोन दिवस घरी ठेवून मग विल्हेवाट लावण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे (husband and wife arrest in Sangli tasgaon murder case).

नेमकं प्रकरण काय?

भिलवडी ते तासगाव रस्त्यालगत असलेल्या शेतातील विहरीत 10 जून रोजी एक मृतदेह आढळला होता. विहीरीत मतदेह हा काळ्या रंगाच्या प्लास्टिकमध्ये गुंडाळलेला होता. पोलिसांनी मृतदेहाला विहिरीतून बाहेर काढलं तेव्हा त्या मृतदेहाच्या डोक्यावर गंभीर जखमा होत्या. याप्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयित आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यासह एलसीबीच्या पथकास सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार एलसीबीने वेगवेगळी पथके तयार करून संशयितांचा शोध घेण्यात येत होता (husband and wife arrest in Sangli tasgaon murder case).

मृतकाची ओळख कशी पटली?

पोलिसांकडून सांगलीसह सातारा, कोल्हापूर, सोलापूर, कर्नाटक, चडचण, अथणी या ठिकाणी मृताची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर तांत्रिक माहितीच्या अधारे तासगाव नगरपालिकेच्या ठिकाणी जेसीबीचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी चौकशी केली असता मृतक हा मंगसुळी (कर्नाटक) येथील रहिवासी असल्याचे समोर आले. मंगसुळी येथे पथकाने चौकशी केली असता जेसीबी मालकाचे नाव हरी पाटील असल्याची ओळख पटली. तो गायब असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवली.

पोलिसांनी आरोपीला कसं पकडलं?

पोलिसांना जेसीबीवरील ऑपरेटर सुनील राठोड हाही पसार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याचा शोध घेवून ताब्यात घेण्यात आले. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. मृत हरी पाटील हा राठोड याच्या पत्नीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा त्याने केला. यातूनच दोघांमध्ये वाद झाला, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली.

या घटनेनंतर सुनील याने जेसीबीवरील काम सोडले. त्यानंतर 8 जून रोजी मृतक हरी हा सुनील याला बोलविण्यासाठी गेला. त्यानंतर पूर्वीच्या वादातून राठोड पती-पत्नी यांनी मिळून हरी पाटील याच्या डोक्यात खोरे घालून त्याचा खून केला. त्यानंतर संशयित दोघांनी त्याचा मृतदेह दोन दिवस घरातच ठेवला. त्यानंतर भिलवडी ते तासगाव रस्त्यावरील एका विहिरीत तो मृतदेह टाकून दिला. मृतदेहाची ओळख पटू नये, यासाठी काळ्या प्लॉस्टिकच्या कागदात मृतदेह गुंडाळला. त्यानंतर गोनपाटाच्या किलतानास दोरी बांधून मृतदेह विहिरीत टाकून देण्यात आला, अशी धक्कादायक माहिती आरोपीने पोलिसांना दिली.

हेही वाचा : लॉकअप तोडून कुख्यात दरोडेखोर पळाला, पोलिसांना चकवा देत महाराष्ट्रभर हिंडला, अखेर मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें