तू माझा छळ करतो, मी आता दुसरे लग्न करेन, पत्नीच्या धमकीनंतर पतीचं भयानक कृत्य

लग्नानंतर काही महिन्यांनी त्या दोघांमध्ये छोट्या-छोट्या कारणाने खटके उडू लागले. (Husband Attack Wife in Nagpur)

तू माझा छळ करतो, मी आता दुसरे लग्न करेन, पत्नीच्या धमकीनंतर पतीचं भयानक कृत्य
Crime-News
Follow us
| Updated on: Feb 23, 2021 | 8:19 PM

नागपूर : पत्नीच्या धमकीनंतर संतप्त झालेल्या पतीने भर रस्त्यातच पत्नीवर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. यावेळी पत्नीने आरडाओरड केल्याने आजूबाजूचे नागरिक जमा झाले. यामुळे सुदैवाने पत्नीचा जीव वाचला आहे. याप्रकरणी आरोपी सूर्यकांत शाहू याला बजाजनगर पोलिसांनी अटक केली आहे. (Husband Attack Wife in Nagpur)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सूर्यकांत शाहू याचा दोन वर्षापूर्वी इशिता उईकेसोबत प्रेमविवाह झाला होता. मात्र लग्नानंतर काही महिन्यांनी त्या दोघांमध्ये छोट्या-छोट्या कारणाने खटके उडू लागले. इशिताचा मानसिक आणि शारिरिक छळ व्हायला लागल्यानंतर ती कंटाळून माहेरी निघून गेली. या दरम्यान त्या दोघांमध्ये अधून मधून संपर्क व्हायचा. रविवारी इशिता सूर्यकांतसोबत फोनवर बोलत होती. त्यावेळी इशिताने तू माझा शारीरिक आणि मानसिक छळ करतो. मी आता दुसरे लग्न करेन, अशी धमकी दिली. यानंतर त्या दोघांमध्ये वाद झाला.

यानंतर संतापलेल्या सुर्यकांतने इशिता कामावरुन घरी जात असताना रात्री 11 वाजता लक्ष्मीनगर भागात तिला गाठले. यानंतर तिच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात इशिताच्या हनुवटीवर, हातावर आणि पोटावर गंभीर जखमा झाल्या. तिने आरडाओरड केल्याने सुदैवाने तिचा जीव वाचला.

इशिताला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तर सुर्यकांतला पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. मात्र क्षुल्लक कारणावरून घडलेल्या या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

(Husband Attack Wife in Nagpur)

संबंधित बातम्या : 

रवी पुजारीला 14 दिवसांची पोलीस कोठडी, आतापर्यंत काय काय घडलं?

डोंबिवलीच्या हिंमतवाल्या आजी, 80 वर्षांच्या वृद्धेचा हिसका, मंगळसूत्रचोराची धूम

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.