डोंबिवलीच्या हिंमतवाल्या आजी, 80 वर्षांच्या वृद्धेचा हिसका, मंगळसूत्रचोराची धूम

डोंबिवलीतील मिलाप नगर परिसरात एका बंगल्याचा आवारात 80 वर्षांच्या आजींना ढकलून (Dombivali Chain Snatching Case) मंगळसूत्र खेचण्याचा प्रयत्न झाला मात्र तो फसला.

  • अमजद खान, टीव्ही 9 मराठी, कल्याण-डोंबिवली
  • Published On - 14:25 PM, 23 Feb 2021
डोंबिवलीच्या हिंमतवाल्या आजी, 80 वर्षांच्या वृद्धेचा हिसका, मंगळसूत्रचोराची धूम
Dombivali Chain Snatching

डोंबिवली : डोंबिवलीत 80 वर्षांच्या आजीबाईंच्या मंगळसूत्र हिसकावून घेण्याचा प्रयत्न करण्यात (Dombivali Chain Snatching Case) आला आहे. मात्र, अद्याप याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे (Dombivali Chain Snatching Case).

नेमकं प्रकरण काय?

डोंबिवलीतील मिलाप नगर परिसरात एका बंगल्याचा आवारात 80 वर्षांच्या आजींना ढकलून मंगळसूत्र खेचण्याचा प्रयत्न झाला मात्र तो फसला. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेची तक्रार केल्यानंतरही गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

Dombivali Chain Snatching

Dombivali Chain Snatching

सोमवारी (22 फेब्रुवारी) सकाळी 80 वर्षांच्या सुहासिनी परांजपे आणि त्यांचे 85 वर्षांचे पती शरदचंद्र परांजपे हे आपल्या बंगल्याचा आवारात बागकाम करीत होते. त्यावेळी स्कुटरवरुन आलेल्या एका व्यक्तीने काही वेळ त्यांचा घरासमोर येऊन पाहणी केली. त्यानंतर बंगल्याचे कंपाऊंडचे बंद गेट उघडून आत येऊन गळ्यातील मंगळसूत्र खेचण्याचा प्रयत्न केला.

परंतु त्याला आजींनी विरोध केला असता त्या चोरट्याने आजींना ढकलून देऊन पळ काढला. त्यानंतर शरदचंद्र परांजपे यांनी तात्काळ त्याचा पाठलाग केला. परंतु सदर चोरटा स्कूटरवरुन पळून गेला.

Dombivali Chain Snatching

Dombivali Chain Snatching

पोलिसांकडून अद्याप गुन्हा दाखल नाही?

या घटनेत सुदैवाने या वृध्द महिलेला खरचटण्या पलीकडे गंभीर दुखापत झाली नाही. सदर घटना बाजूचा बंगल्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून मानपाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार केली असून अद्याप या प्रकरणी कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नाहीये.

Dombivali Chain Snatching Case

संबंधित बातम्या :

Ulhasnagar | महिलेला कारची धडक, चालकाकडून चक्कर येऊन पडल्याचा बनाव, CCTV मुळे अपघाताचा खुलासा

पुण्यात पार्किंगमध्ये चोरांचा चाकूहल्ला, कारचालकाने स्वतःच्या रक्तानेच जमिनीवर लिहून ठेवलं…

नागपुरात ड्रग्ज तस्करीच्या रॅकेटचा भांडाफोड, दोघांना अटक, पावणे सहा लाखांचे ड्रग्ज जप्त